एखादे पद मलाही द्या हो!
माणसाची ओळख आता माणूस म्हणून उरलेली नाही,तो कुठल्या तरी पदावर असला तरच त्यास प्रतिष्ठा आहे. हजारों प्रकारची बिरुदे प्रतिष्ठेची बनली आहेत. कोणते तरी बिरुद असल्याशिवाय आपणास कुणी ओळखते की नाही,अशी शंका आता येऊ लागली आहे. […]
विविध विषयांवरील वैचारिक लेखन
माणसाची ओळख आता माणूस म्हणून उरलेली नाही,तो कुठल्या तरी पदावर असला तरच त्यास प्रतिष्ठा आहे. हजारों प्रकारची बिरुदे प्रतिष्ठेची बनली आहेत. कोणते तरी बिरुद असल्याशिवाय आपणास कुणी ओळखते की नाही,अशी शंका आता येऊ लागली आहे. […]
फार गंभीर बनून जगू नका. हे विश्वकरोडों वर्षापासून आहे. कित्येक आले आणि गेले. कुणावाचून कुणाचे काही थांबत नाही. जे व्हायचे ते होत राहणार आहे. तुम्हाला विचारुन काही घडणार नाही. […]
‘ज्या देशाचा नागरिक सुजाण आहे, तो देश समृद्ध आहे.’ या वाक्याने मी लेखाची सुरुवात करीत आहे. त्यातील शब्दांची संकल्पना अशी आहे. नागरिकः सृष्टीमधील घटक सजीव व निर्जीव या प्रकारांमधे विभागता येतात. सजीवांचे वनस्पती व प्राणी यात वर्गीकरण करता येते. प्राण्यांचे मनुष्य व इतर प्राणी असे भाग पाडता येतात. ‘मनुष्य’ या प्राण्याचे पुढील भेद देश, समाज यानुसार […]
भारतामध्ये व्यंगचित्र कलेची फार मोठी परंपरा आहे. १०० वर्षांहून अधिक काळ आपल्या देशात वर्तमानपत्रे व नियतकालिकांमध्ये व्यंगचित्रे, हास्यचित्रे प्रकाशित होत आहेत. पारतंत्र्याच्या काळात राजकीय विषय व समाज प्रबोधन यासाठी ह्या माध्यमाचा प्रामुख्याने उपयोग केला जात असे. मात्र त्या काळात छपाईचे तंत्र फारसे प्रगत नव्हते. […]
२५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी जाहीर झाली. वृत्तपत्रांवर सेन्सॉरशीप आली. कोणतीही बातमी, लेख छापण्याच्या आधी तो मजकूर माहिती खात्याच्या अधिकाऱ्यांना दाखवून मंजूर करून घेणे बंधनकारक झाले. जे अधिकारी वृत्तपत्रात सरकारचे लेख छापून यावेत म्हणून संपादकांच्या मागे पुढे अजिजी करायचे त्यांच्याकडेच जाऊन संपादकांना आपण उद्या जे काही छापणार आहोत ते तपासून घेण्याची वेळ आली. त्यामुळे वृत्तपत्रसृष्टीत त्यावेळी मोठा असंतोष निर्माण झाला. […]
भारत सरकारने आयपीसी सीआरपीसी आणि एव्हिडन्स ऍक्ट मध्ये बदल करून स्वातंत्र्याचे स्वराज्यात रूपांतर करण्याची पावले उचलण्यास सुरुवात केलेली आहे. आता आपण ज्ञानेश्वर माऊलींना त्यांनी मागितलेले पसायदान देण्याची मानसिक आणि कायदेशीर तयारी सुरू केलेली आहे असे मला वाटते. ज्ञानेश्वर माऊलींचे पसायदान हे नागरीकांनी भारत सरकार कडून पूर्ण करून घेण्याच्या नागरी आधिकारांची आणि सुविधांची शॉर्टलिस्टच आहे. […]
डायनासोरहून कितीतरी पटीने मोठा भीमकाय भ्रष्टाचार धावताधावता थांबला. तरी तो बराच पुढे आलेला होता. त्याच्या पायांना लाखो अश्वांचा वेग मिळालेला होता, तर अनेक हत्ती सामावतील एवढे मोठे पोट झालेले होते. स्वतःला आवरायला, सावरायला त्याने बराच वेळ घेतला. नंतर जागच्या जागी उभे राहून मोठ्या कष्टाने त्याने मान वळवली. […]
विज्ञानाची प्रगती, वैद्यकीय उपचार, लोकात आरोग्याविषयी निर्माण झालेली सजकता यामुळे आयुर्मान वाढले आहे. तथापि, वृद्धापकाळात अनेक समस्या निर्माण होत आहेत. सर्व समस्यांना तोंड देण्याची अनेकांच्या मनाची तयारी झालेली नसते. त्यांचे एक कारण म्हणजे मागच्या पिढीतील त्यांचे आईवडील एवढे जगलेले नसतात. दुसरे आपली मुले चांगली आहेत आणि ती वृद्धापकाळात आपली व्यवस्थित काळजी घेतील. या भाबड्या समजुतीत अनेक असतात. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions