सध्याच्या निवडणूकीत भाजपावर एक आरोप सतत होत आहे की भाजपा ३७० विषयावर प्रचार करतोय. ३७० चा आणि महाराष्ट्राचा काय संबंध?? “तुम्ही केलेल्या कामावर बोला”, “विकासाच्या मुद्यावर बोला”, “तुम्ही पुन्हा निवडणून आल्यावर काय करणार यावर बोला” अशा अनेक गोष्टी विरोधक आणि काही पत्रकारांकडून उपस्थित होत आहेत. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ३७० आणि महाराष्ट्राचा संबंध […]
मी हे करु शकते, मला हे जमेलच किंवा हे असच घडेल, अशी अंतर्मनातुन येणारी शाश्वती म्हणजेच आपल्या आतुन येणारा आवाज….आपल्या अंतर्मनातल आत्मविश्वास….क्रूती घडवण्याआधी निकालासाठी रचलेला सकारात्मक द्रुष्टिकोन…….म्हणजेच आत्मविश्वास. […]
प्रमाण, लिखित भाषा वेगळी आणि बोली भाषा वेगळी. आपलीच बोली शुद्ध आणि त्यांची (म्हणजे नक्की कोणा कोणाची आणि कुठली कुठली) अशुद्ध, हे असं कसं ? नुकसान, नुसकान कीं लुस्कान ? चिकटवणे कीं चिटकवणे ? बादली कीं बालदी ? यांतलं शुद्ध अशुद्ध आपण कोण ठरवणार ? आपल्याला तो अधिकार आहे कां ? […]
एकाग्रतेने मनाची स्थिरता वाढते आणि स्थिरता वाढल्यामुळे मन एकचित्त होउन हाती घेतलेल्या कार्यामध्ये आपले आपसुकच चिंतन वाढते आणि जेव्हा चिंतन वाढते तेव्हा नैसर्गिकरित्या आपाल्याला खुप सार्या वेगवेगळ्या कल्पना आपोआपच सुचतात. ज्यामुळे कामाची गती वाढते, त्या कामामध्ये कोणतीही अडचण येत नाही. आणि हाती घेतलेले काम खुप सुंदर पद्धतीने पार पाडले जाते. ही जी एकाग्रता आहे ती प्रत्ये़कामध्ये […]
लेखक – प्रा. विनायक आंबेकर, पुणें ः न्यूज़ चॅनेलवरील चर्चा ऐकुन आणि कॉंग्रेसी व शरद पवारांसारख्या इतर धुर्त नेत्यांची विधाने ऐकुन मोदींचे खरंच काही चुकत तर नाही ना ? या विचाराने मनातून गोंधळलेल्या देशभक्त सर्वसामान्य नागरीक बंधू भगिनींसाठी एक विस्तृत स्पष्टीकरण […]
तसे पाहिले तर आपण जन्माला एकटे येतो आणि जाणार पण एकटेच असतो. त्यामुळे मैत्री अमर असते, जीवास जीव देणारी असते ह्या सर्व बोलायच्या गोष्टी असतात. कोणाचेच आयुष्य कोणावाचून थांबत नसते. हेच सर्व प्रकारच्या संबंधांना लागू आहे. त्यात कौटुंबिक, सामाजिक, व्यावहारिक आणि व्यावसायिक संबंधातही असे कप्पे करून जगल्यास आयुष्य सुखकर होते. […]
काही महिन्यांपूर्वी एका भावाशी चॅट करत होते. थोडा disturbed होता तो. त्यामुळे सांगत होता, की “ताई, तुझ्याशी बोलून नेहमी खूप positive वाटतं. तू प्लीज माझ्यासाठी रोज एक good morning मेसेज टाकशील? खूप मदत होईल त्याची मला..” […]
काही वर्षांपूर्वी “डे “संस्कृती भारतात नव्हती. जेव्हा “गिफ्ट वस्तुंच्या कंपन्या व ग्रिटिंग कार्ड कंपन्या ” आपल्या देशात आल्या तेव्हापासून हे “डे “च खूऴ डोक्यात शिरलय. चॉकलेट डे,वेलेंटाईन डे, रोज डे वगैरे. या दिवसांत करोडोंची उलाढाल या कंपन्या करताहेत. आज अशी अवस्था आहे कि मुलांना गणपती, गोकुळाष्टमी कधी आहे हे सांगाव लागते पण हे “डे ” मात्र ते पक्के लक्षात ठेवतात. […]
“काश्मीर पर्यटना साठी नको!” अशी मागणी जर काश्मीर मधल्या नागरिकांनी केली तर..? ही चळवळ मला थोडी अशीच वाटली, कारण जे ‘गंगा’खेड गंगेवरच्या “विधी” साठी ओळखले जाते, गंगाखेडची ४०% इकॉनॉमी ही ‘गंगे वरच्या विधी’ वर अवलंबून आहे तिथेच देहदान चळवळ फोफावत आहे! एखादे देहदान झाले की त्या घरचे लोकं गंगेकडे फिरकणार सुद्धा नाहीत.!!!! […]
आपल्या नेहमीच्या जीवन प्रवासात अश्या बर्याचश्या घट्ना घड्तात ज्यामुळे आपले विचार निर्माण होतात तर बहुतेकदा आपले विचार अति होऊन एका ठरविक पातळीचे उल्लंघन होते आणि त्या विचारांमधुन स्थिती निर्माण होते. अश्या विचारांवर चर्चा, चर्चेतुन विषय, विषयांचा अभ्यास, अभ्यासातुन ग्रहण आणि जे ग्रहण केले ते ज्ञान म्हणजे “निरंजन”! […]