’हसणे’ ही एक उपजत, अफ़लातुन कला आहे. ती कुणी कुणाला शिकवत नसते, आणि शिकवता ही येत नसते. नैसर्गिक स्मितहास्यातून व्यक्तिमत्त्व उलगडत जातं. आपल्या हास्यशैलीवरून अनेकदा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक सहज अंदाज समोरच्या व्यक्तीला येत असतो. कोणत्याही प्रसंगात हसणे म्हणजे त्या प्रसंगाला तुमच्याकडून येणारी दाद समजली जाते, तो तुमचा रिस्पॉन्स असतो. […]
माणसांच्या विकासात इतरांचा वाटा असतो, हे खरेच आहे आणि या वाट्याबद्दल प्रत्येकाने कृतज्ञ असायलाच हवे. परंतू मनामध्ये ही कृतज्ञता बाळगत असतांनाच माणसाने आपल्या विकासासाठी आपला प्रयत्न, आपला विवेक, आपले ध्येय, आपले जीवनविषयक दृष्टिकोन इ. घटकांवरच अवलंबुन राहायला हवे. […]
सहजच म्हंटल जातं. “आमक्या कडे इतकं असून सुद्धा त्याला अजिबात Ego नाही”(पैसा, बुद्धी, सौदर्य, कला किंवा काहीही) म्हणजे इतरांपेक्षा कुणा कडे काही जास्त असेल तरच त्याला Ego ची मुभा असते का ? […]
प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी कृष्ण हवाच, या आशयाच्या पोस्ट या आधी वाचल्या सुद्धा असतील, जो मदत करतो, हात देतो, धीर देतो, अब्रू वाचवतो, शिष्टाई करतो, रण सोडून पळून जातो, रणांगणात हत्यार उचलत नाही, सारथी बनतो, सखी बनून खेळतो, खेळवतो….. […]
आत्म्याने आत्म्याचा केलेला आदर म्हणजे मर्यादा. ती आपल्या कामात, व्यवहारात, राहणीमानात असायला पाहिजे. मर्यादा हि सृष्टीने दिलेली संस्कृती आहे, ती सर्वांनी पाळायलाच पाहिजे….. […]
ज्या लोकांची ऐपत नव्हती त्यांनी पण गाडी घेतली आणि ज्यांची ऐपत असून गरज नसताना चार चार गाड्या पण घेऊन झाल्या आहेत . वाहन उद्योगाला लागलेली मंदी यामुळे टीका करणारे विचारवंत लोकहो जरा विचार करा की, ज्यांच्या कडे गाड्या नसतील त्यांनी आता त्यांच्याकडील जागा जमिनी किंवा स्वतः चे राहते घर विकून किंवा कर्ज काढून गाड्या घेतल्या पाहिजेत […]
लेखिका – उषा शशीकांत जोशी – बहिणाबाई किंवा बहिणाबाईंची गाणी ही मराठी भाषेतील अपूर्व निर्मिती आहे. लौकिक अर्थाने त्या अडाणी (अनपढ) निरक्षर होत्या. लेखन, वाचनाच्या संस्कारांची सुतराम ही शक्यताही नव्हती. त्यामुळेच त्यांच्या निसर्गदत्त प्रतिमेबद्दल आश्चर्य वाटावं इतकी त्यांची कविता, शब्द, वाक्य, ध्वनी, छंद, यमक, अनुप्रास अशा भाषेच्या नियमांमध्ये पूर्णपणे बसणारी आहे. खरोखर अलौकिक प्रतिमेचं देणं म्हणजे काय याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे बहिणाबाईंची कविता होय. […]
बाहेरची, ‘मी’ पणाच्या धुळीची पुटं घासून काढली तरच आतली, आपणच जीव ओतून घडवलेली व्यक्तिमत्त्वाची मूर्ती प्रकट होते, झळाळून उठते. काही लोकांना नैसर्गिक सौंदर्याची देणगी लाभलेली असते. काही आपल्या कामातून, व्यक्तिमत्त्वातून सौंदर्याला अर्थ प्राप्त करून देतात……. […]
नियती अनेक गाेष्टी घडवून आणते. तिघेही केंद्रात असते तर त्यांच्या निधनाचे हे धक्के सरकारसाठी सुरळीत कामकाजाच्या दृष्टीने समस्या हाेऊ शकले असते. पर्याय शाेधताना आणि गाडे रुळावर आणताना त्रास झाला असता. कुठल्या अंतस्थ शक्तीने त्यांना राेखले, हे परमेश्वर जाणाे. पण आपल्यामुळे देशाचे नुकसान हाेता कामा नये, याचा आदर्शपाठ या तिघांनीही घालून दिला. ताे नव्या पिढ्यांसाठी अनुकरणीय ठरेल. […]