नवीन लेखन...

विविध विषयांवरील वैचारिक लेखन

तुम्ही जे आहात, ते तुम्ही नाही आहात….

जर तुम्हाला एकाएकी खुप पैसे मिळाले तर तुम्ही तुमचे आयुष्य कसे बदलाल??  या प्रश्नाच उत्तर देताना जर तुमचा पहिला निर्णय नोकरी सोडून देईन असा असेल तर ही धोक्याची सूचना आहे हे लक्षात घ्या. अनेक यशस्वी लोकांची जेव्हा तुम्ही आत्मचरित्र वाचाल तेव्हा तुम्हाला कळेल, त्यांनी कामाची एवढी गोडी लावून घेतली होती की ते काम करताना त्यांना खूप मज्जा येत होती किंवा त्यांनी असे क्षेत्र निवडले ज्याची त्यांना आवड होती त्यामुळे ती काम त्यांनी मनापासून केली आणि हेच त्यांच्या यशाचे रहस्य होते. […]

झाले गेले विसरुन जावे, पुढे पुढे चालावे..!

आपल्या ऊर्जेचा आणि वेळेचा जास्तीत जास्त वापर आपण आपल्यात बदल घडवण्यात म्हणजे स्वतःला आधी पेक्षा चांगले बनवण्यात करायला हवा म्हणून झालेले गेलेले सगळे विसरुन जा आणि आयुष्याच्या वाटेवर पुढे सकारात्मक वाटचाल करा. […]

चहा ‘तो’ की ‘ती’?

‘तो’ चहा की ‘ती’ चहा, हा प्रश्न तसा माझ्या मनात नेहेमीच उभा असतो. अगदी ‘टू बी आॅर नाॅट टू बी’च्या धर्तीवर. कुणाला विचारावं, तर काय वेड लागलंय का माणसाला, अशा पद्धतीने बघण्याची भिती. पण धीर करुन काही दिवसांपूर्वी मी तो फेसबुकवरच्या माझ्या मित्रांना विचारायचं ठरवलं आणि लगेच विचारलाही. आणि त्या अवघ्या चार शब्दांच्या प्रश्नांवर घनघोर कमेंट्सही आल्या. […]

प्रसारमाध्यमातून झिरपणारी ‘नग्नता’

उदात्त प्रेम आज का निपजत नाही? पूर्वीची प्रेमगीते ही उदात्त होती, संस्कारक्षम होती, शरीर स्पर्शसुध्दा नव्हता. नग्नता मनाला शिवतही नव्हती. सौंदर्याचे आयाम इतके बदलले की केवळ नग्नतेच सौंदर्य शोधणं सुरु झाले. नग्नतेपलिकडेही काही सात्विक, सुंदर आहे, सत्य आहे, शिवासारखे आहे हे जाणवायला हवं तरच विकृती संस्कृतीवर मात करणार नाही. […]

महात्मा, मुन्नाभाई ते संजू

महात्मा गांधी आज अनेकांना हवे आहेत, अनेकांना नको आहेत. आऊटडेटेड माणसं व तत्वज्ञान आजच्या परिस्थितीत वापरुन तरुणांना काही संदेश देतांना आजच्या परिस्थितीत relevance, त्याचं दाखवता आलं तरी पुरेसं आहे. महात्मा आज बंदिस्त झाले आहेत. नोटात महात्मा, फोटोत महात्मा, मात्र प्रत्यक्ष जीवनात सगळा खोटाच व्यवहार. […]

‘नोटा’ वापरणारे कोण असतात? माझं मत..!

ज्यांना जो पक्ष आवडतो, त्याना मतदार मतदान करत असतो. काहीजण पक्ष कुठलाही असे, आपल्या जातीच्या उमेदवाराला मतदान करत असतो. अशांना देशापेक्षा जात महत्वाची वाटते. काही आपल्या धर्माच्या उमेदवाराला मतदान करत असतो. काही पक्षांची पारंपारीक मतं असतात, ती काही झालं तरी त्या पक्षाच्या उमेगवारालाच जातात . […]

‘नोटा’ : लोकशाहीच्या बळकटीकरणाकडे एक दमदार पाऊल..!

‘नोटा (None Of The Above)’ हा मतदान यंत्रावरील पर्याय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, मतदारांचा ‘नकाराधिकारा’चा हक्क मान्य करुन निवडणूक आयोगाने मतदारांना उपलब्ध करुन दिलेला प्रभावी पर्याय आहे. राजकीय पक्ष आणि त्यांनी निवडणूकांत उभे केलेले उमेदवार, यांना नाकारण्याचा मतदारांचा अधिकार म्हणजे मतदान यंत्रावरचा सर्वात शेवटी उपलब्ध करुन दिलेला NOTA हा पर्याय..! […]

इतिहासाच्या खांद्यावरचं वेडं वर्तमान..!!

बऱ्याच वर्षांनी मुंबई-गोवा रस्त्यावरून प्रवास केला. चार-पांच वर्षांपूर्वी या रस्त्यावरून अनेकदा प्रवास करत असे. तेंव्हा रस्त्याचं काम सुरु झालं होतं. सुरु झालं होतं म्हणजे पेपरमधे बातम्या वाचल्या होत्या. काही ठिकाणी, म्हणजे मुंबईच्या उंबऱ्यावरची रस्त्याच्या आजुबाजूच्या काही इमारती तोडलेल्या दिसतंही असत. रस्त्याला काही कळणारी आणि अनेक न कळणारी डायव्हर्जन्स काढली होती. सुखरुप प्रवासापेक्षा अपघाताचीच शक्यता जास्त होती. […]

राजकीय पक्षांच्या जाहिरनाम्यांचा अभ्यास आवश्यक

मागच्या जाहीरनाम्यातली कोणती आश्वासने व कामे पूर्ण केली, त्याचीही निवडणुकीपूर्वी जंत्री देण्याची राजकीय पक्षांवर सक्ती केली जावी. मागल्या सत्तर वर्षांतले विविध पक्षांचे जाहीरनामे आणि त्यापैकी पूर्तता झालेली आश्वासने व कामे, यांचा तौलनिक अभ्यास केला जावा. प्रचारात उखाळ्यापाखाळ्या काढण्यावर भर नसावा. जमलेल्या गर्दीला आपण नेमके काय करणार हे सांगावे. निवड्णुकीच्या काळात या वर चर्चा व्हावी ही अपेक्षा! […]

शिस्तीचा ढासळलेला बुरुज 

शाळा नावाचं मंदिर असो की, परमीटरुम, राजकारण्यांची शिफारस लागते, “अर्थ”  असल्याशिवाय शैक्षणिक संस्था मिळत नाहीत, विनाअनुदान, अनुदानित करण्यासाठी “अर्थ” आवश्यक आहे. विनाअनुदानाचे दुकान उघडण्याचे व त्याला अनुदान मिळवून घ्यायचे. राजकारणातल्या  अस्तित्वासाठी, तिकिट मिळवण्यासाठी, शैक्षणिक संस्था, साखर कारखाना, सहकारी संस्था, परमीटरुम, वर्तमानपत्र, खून, बलात्कार हा स्वतःच्या साम्राज्याचा भाग अनेकांना आवश्यक वाटायला लागला. […]

1 72 73 74 75 76 136
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..