नवीन लेखन...

विविध विषयांवरील वैचारिक लेखन

साधता संवाद..संपतील वाद… !

तंत्रज्ञानाचा सर्वात जास्त परिणाम कुटुंब व्यवस्थेवर होतॊय..काम शाळा नोकरी यामुळे आधीच वेळ मिळत नाही त्यातच तंत्रज्ञांच्या वापरामुळे नात्यातील संवाद कमी होतोय. त्यामुळे नातेसंबंध दृढ करण्यासाठी आता आपल्याला संवादाचे दरवाजे उघडावे लागतील. संवाद ही कला आहे. आपण काय बोलतो यावर नात्याचं भवितव्य अवलंबुन असतं. आपल्या बोलण्यानं एखाद्याला प्रेरणाही मिळू शकते किंवा एखाद्याचं मनही दुखू शकतं. […]

जातियवाद आणि युवा पिढीचा सहभाग

आजची युवा पिढी या जातीवादी चक्रव्युवात का अडकत चालली आहे याचे सर्वांगीण विश्लेषण होऊन त्यावर उपाय-योजना शोधण्याची जबाबदारी समाजातील जबाबदार व वैचारिक दृष्टीकोन ठेवणाऱ्या लोकांनी घेण्याची गरज आहे. […]

वेदकाळात ब्राह्मणवाद : एक पोकळ कल्पना

हल्ली वेद मानणार्यांवर ब्राह्मणवादाचा आरोप करण्याची FASHION च झालीय. जो तो उठतो आणि स्वत:ची पातळी, अभ्यास वगैरे काहीही न बघता असले बिनबुडाचे आरोप करीत सुटतोय. कदाचित तो त्यांचा स्वत:ला “पुरोगामी” ठरविण्याचा मार्ग असावा. पण माझ्यासारख्या संशोधकासाठी मात्र त्यांच्या आरोपात किती तथ्य आहे हे शोधणे, आणि तथ्य नसेल तर सत्य काय ते सर्वांसमोर मांडणे क्रमप्राप्त ठरते, म्हणून हा लेखनप्रपंच. […]

महात्मा गांधी यांना अनावृत्त पत्र

आदरणीय महात्माजी,  विसाव्या शतकातील एक श्रेष्ठ जगतवंद्य विभूती आपणांस मानले जाते. विलक्षण निर्भयता, नम्रता, कमालीची साधी राहणी, दीन-दलितांविषयी अथांग करुणा आणि शोषितांबद्दल सहानुभूती या गुणांचा संगम आपल्या ठिकाणी होता. तत्वज्ञान ही जीवनाबरोबर विकसीत होणारी गोष्ट आहे, हे आपल्या बाबतीत खरे आहे. नैतिकता हेच संस्कृतीचे अधिष्ठान, संयम व त्याग हाच तिचा आत्मा. सुखोपयोगी साधने वाढविण्याची संस्कृती सध्या निर्माण होत आहे. श्रमप्रतिष्ठेची पीछेहाट होत आहे. […]

मृत्यूपश्चातचे विधी – माझी भूमिका

मृत्यू हा अटळ आहे, त्याला पर्याय नाही , ती मनुष्य जीवनाची अनिवार्यता आहे. असे असले तरी एखाद्या व्यक्तीचा मृत्यू ही नक्कीच सुखावह घटना नाही. जवळच्या आप्ताचा, स्नेहीजनाचा मृत्यू अनुभविताना कोणत्याही सहृदय माणसाचे मन हेलावते, शोकमग्न होते. […]

जादुटोणाविरोधी कायदा व प्रसार माध्यमें

जादुटोणाविरोधी कायदा होऊनही अंधश्रध्दा कमी न होता वाढतच आहेत. नवीन जादू घेऊन नवीन बाबा अवतार घेतच आहेत.जादूटोणा विरोधी कायद्याने काही प्रमाणात नियंत्रण आले असेल, पण रोज अंधश्रध्देचे तण वाढतच आहे.प्रसारमाध्यमांची जादू ओसरली व वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवला तरच जादूटोणाविरोधी कायदा सक्षम होईल. […]

मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण..!

प्रत्येकजण आपल्याला आयुष्यात त्याच्या पद्धतीनुसार जगत असतो. आपल्याला मिळालेल्या आयुष्यावर खूपदा तो नाखूष असतो. तथाकथित सुखाचा सदरा मला का नाही मिळाला ? असा गैरसमज करून घेत आपण आपल्या आयुष्याला दोष देत बसतो. जगी सर्व सुखी असा कोण आहे? हा प्रश्न प्रत्येकाने मनाला विचारला कि उत्तर आपोआप समोर येते..! […]

लक्ष्मणरेषा श्रध्दा – अंधश्रध्देची

कार्यकारणभाव, विज्ञान यांकडे दुर्लक्ष करु नये. एखाद्या कथित ‘चमत्कारामागील कार्यकारणभाव समजला, की तो चमत्कार – “चमत्कार” राहत नाही, ती केवळ घटना ठरते. मात्र, आज हे होताना दिसत नाही… […]

प्रेमकथा : पूर्वीच्या आणि आजच्या 

प्रेमकथेमुळे भारतीय चित्रपट सृष्टीला कधीच मरण नाही. पूर्वीच्या चित्रपटातील प्रेमकथेला दर्दभरा साज होता. असंख्यांना भुरळ घालणार्‍या प्रेमकथांनी सामाजिक जीवनावर अधिपत्य गाजवायला सुरुवात केली आहे. आजच्या चित्रपटातील प्रेमकथा पाहून खर्‍या जीवनात त्यांना प्रत्यक्षात आणणे, एवढेच सामान्य ध्येय उराशी बाळगून जगतायेत आजचे तरुण.   […]

शिक्षणपध्दती समान, मूल्ये असमान

एकच शिक्षणपध्दती, एकच प्रतिज्ञा पुस्तकाच्या पहिल्या पानावर भारतभर असतांना मूल्यांमध्ये जमीन आसमानचा फरक का? काश्मीरमध्ये विद्यार्थी लष्करावर दगडफेक करतात, काही ठिकाणी देशद्रोह, काही ठिकाणी देशभक्ती झिरपते. काही ठिकाणी वैज्ञानिक दृष्टिकोन, काही ठिकाणी अंधश्रध्दा झिरपते, असे कां? […]

1 77 78 79 80 81 136
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..