अक्कलकोटी येणारा प्रत्येक जीव हा लक्ष 84 योनींचा फेरा चुकवून अमरधामाला प्राप्त होतो. एवढे श्रेष्ठत्व या गांवाला स्वामी सत्तेने प्राप्त झालेले आहे. तेव्हा आपण आपला उध्दार करण्यासाठी तात्काळ अक्कलकोट जवळ करावे, असा संदेश स्वामीसुत देतात. […]
अखेर तो सुप्रीम कोर्टाचा मच्-अवेटेड् निकाल जाहीर झाला , की, ‘समलेंगिकता हा गुन्हा नव्हे’ .
( संदर्भ: बातम्या , लोकसत्ता दि. ७ सप्टे. २०१८ . टाइम्स ऑफ् इंडिया ७ सप्टें. २०१८, आणि इतर). आपण अनेकदा बोलतांना-लिहितांना, ‘दि कोर्ट इन इट्स् विज़डम्’ असा शब्दप्रयोग करतो, तो किती यथार्थ आहे, याची पुनश्च एकवार जाणीव झाली. […]
सुप्रीम कोर्टानें आज एक स्वागतार्ह व आशादायक गोष्ट केली , आणि ती म्हणजे ‘LGBTQI’ जनांबद्दलच्या आपल्याच आधीच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यांचें ठरवलें. […]
“नकारात्मक विचारांची माणसं मला आवडतात” हे वाक्य वाचून जर तुम्हाला मी विचित्र/विक्षिप्त वाटलो तर थोडं थांबा…… आता असा विचार करा, नकारात्मक विचारांचा सुद्धा कित्ती सकारात्मक पद्धतीने विचार केलाय या अवलीयाने….. […]
“मी” वर आपलं प्रचंड प्रेम असतं आणि ते असलंच पाहिजे! कधीकधी हे मी प्रेम मात्र घातक ठरतं, मी जेव्हा “मी” असतो नेमकं त्याच वेळी समोरच्याला “मी” कोण आहे? हे माहित नसतं, तो पाणउतारा करतो तेंव्हा माझ्यातला ‘मी’ कळवळून म्हणतो, मी काय असातसा वाटलो की काय ? हे फक्त दाब (दम) देण्यापूरतं विचारायचं असतं पण आपल्याला माहित असतं की तो आपल्याला ‘असातसा’च समजत असतो ! […]
“ऋतू पावसाळी, ऋतू माती आणि बियाण्याच्या प्रेमाची” गुणगुणत एक बियाणे मातीपाशी पोहचले. “चल, दूरहट, पावसाळी किडा.” काय झाले तुला, ओळखले नाही, मी तुझा अनादी काळापासूनचा प्रेमी. “कधी होता, आता नाही, आता मी शेजारच्या शेतातील मातीशी प्रेम करते”. हे चुकीचे आहे, मातीने बियाण्यावर प्रेम केले पाहिजे, अन्यथा सृष्टीचक्र भंगेल. वसंत येणार नाही. फुलांविना फुलपाखरू मरेल. गवत विना […]
जर गुरू, capable असेल, worthy असेल, तर त्याला ( मक्केतील ‘काबा’ प्रमाणें ) पवित्र मानावें , श्रेष्ठ मानावें, (त्याला वंदावें) . पण जर गुरू नाक़ाबिल असेल, ( ज्ञान अथवा आचार-विचारानें) capable नसेल, worthy नसेल, तर, (तौबा, तौबा!) , अशा गुरूपासून दूरच रहावें ! (तेंच श्रेयस्कर). […]
श्री. रामचंद्र शिवाजी कदम हे भारदस्त आणि भारतीय समाजाच्या संस्कारांचे पुतळे समजल्या जाणाऱ्या थोरांचं नांव आपल्या नांवात गुंफलेल्या महाशयांना आपण सांप्रत राम कदम या नांवाने ओळखतो. ‘नांवात काय आहे’ असं शेक्सपियर म्हणाला होता, याची या क्षणाला आठवण होते. प्रभु रामचंद्र हे स्वत:चं नांव आणि वडिलांचं नांव छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण करुन देणारं, याचं भान राम कदमांनी सोडलं व नांव काहीही असलं तरी त्यांची मूळ प्रवृत्ती रावण आणि मोगलांचीच आहे, याची त्यांनी पुन्हा एकदा प्रचिती दिली. […]
दोघांची विचारसरणी, आवड जरी वेगवेगळी असली तरीही एकमेकासाठी आपल्या आवडीला दोघांनी थोडीशी मुरड घातली व आपल्या सहचाऱ्याचा त्याच्या आवडी निवडीचा थोडा जरी विचार केला तरी त्यांचा संसार आनंदाने फुलून जातो. ऊलट प्रत्येकाने आपल्या मनाप्रमाणे वागायचे ठरवले तर जागोजागी आपणास एकतर विभक्त झालेली किंवा ओढूनताणून संसार चालवणारी जोडपी पहावयास मिळतील. […]
संपुर्ण रामायण वाचताना आपणास रामायणातील विविध व्यक्ती अगदी सुग्रीव, वाली, अंगद, नल,नील ही वानरसेना ईतकेच काय समुद्रावर सेतू बांधताना मदत करणारी खारोटी, जटायू पक्षी या प्रत्येकाला महत्व दिल्याचे दिसून येते. मात्र रामायण वाचताना कोठेच लक्ष्मण पत्नी ऊर्मिला या व्यक्तीला फारसे महत्व दल्याचे आढळत नाही.त्यामुळे ती कोणाच्याही लक्षात रहात नाही. […]