सोशल मीडियाचा काळा ‘फेस’!
सोशल मीडियाचं हे जग जितकं आभासी तितकंच असत्याच्या धाग्यांनी विणलेलं असल्याचं वास्तव समोर येत असल्याने भविष्यात अधिक जबाबदारीने या माध्यमाचा वापर करावा लागणार आहे. […]
विविध विषयांवरील वैचारिक लेखन
सोशल मीडियाचं हे जग जितकं आभासी तितकंच असत्याच्या धाग्यांनी विणलेलं असल्याचं वास्तव समोर येत असल्याने भविष्यात अधिक जबाबदारीने या माध्यमाचा वापर करावा लागणार आहे. […]
व्हाट्सॲप, ट्विटर, फेसबूक यामुळे दुरदूरची माणसं जोडली गेली हे खरं असलं तरी जवळच्या माणसांमधला संवाद तुटला. शेजारी असलेल्या माणसांशी सरळ बोलून संवाद साधण्यापेक्षा दूरवर असलेल्या कुठल्यातरी (बऱ्याचदा अनोळखी) माणसाशी टायपील संवाद साधण्याच्या प्रयत्नात आपण सारेच असतो. हल्ली यात तरुण, प्रौढ किंना वय झालेले असा भेद नसतो. घरोघरी हेच दृष्य दिसतं. कुटूंबातील सर्व वयाचे सदस्य आपापल्या मोबाईलमधे डोकं घालून आणि कानात इअरफोनचे बोळे खुपसून तिसऱ्याच कुठल्यातरी व्यक्तीशी संवाद साधत बसलेले दिसणं आता आम बात है.. […]
आजकाल मी हिरवे निशाण पाहूनच पाण्यासोबत वापरणारे सर्व पदार्थ घेतो. हे छोटे-छोटे उपाय करून आपण किती तरी कोटी पाणी रोज जास्त प्रदूषित होण्यापासून वाचवू शकतो. या शिवाय रोग-राई पासून हि स्वत:ला वाचवू शकतो. याचाच अर्थ एक तीर दोन निशाणे. […]
आपल्या प्रत्येकाचे आयुष्य म्हणजे शेवटच्या क्षणापर्यन्त सोडवायची एक प्रश्नपत्रिका असते.या प्रश्नपत्रिकेसाठी अमुक एक विशिष्ठ असा विषय नसतो वा कसल्याही स्वरूपाचा अभ्यासक्रम आखलेला नसतो.प्रत्येकाची प्रश्नपत्रिका जरी वेगवेगळी असली तरी काही असे प्रश्न असतात कि ते एकमेकांच्या मदतीने सोडवावे लागतात..आणि तशी आपल्याला मोकळीकही दिलेली असते..काही काळाची मर्यादा घालून.आपण तेवढ्या निर्धारित वेळेत सोबत्यांच्या साथीने त्या प्रश्नांना सामोरे जायचे असते.काही […]
आम्हाला सांगण्यात आले कि राम वनवासातून आयोध्येत याच दिवशी परत आले म्हणून आपण गुढ्या तोरणे उभारतो. पण निषिद्ध असलेल्या बांबूवर ,कडू लिंबाचा पाला लावून ,पालथा तांब्या हे सर्व अशुभ एकत्रित करून “गुढी उभारली जाते हा काय आनंदोत्सव आहे ? खुद्द आयोध्येत अथवा उत्तरेकडील कुठल्याही राज्यात अशी गुढी उभारली जात नाही . […]
आज आपण कामगारविषयक जो कायदा वाचत आहोत त्या कायद्याचा प्रणेता लेनिन होता हे सध्या किती कर्मचा-यांना माहित आहे? सेवानिवृत्ती नंतर मिळणारे फायदे , ज्यात प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युईटी याचा समावेश होतो आणि त्यावर करही लागत नाही हे पण कामगार संघटना आणि त्यांच्या मागण्यांवर तत्कालीन सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने झालेले आहे. या कामगार संघटना जगभर लेनिन आणि त्याच्या कॉम्रेड्सच्या प्रेरणेतून उभ्या राहिल्या आहेत. […]
‘महिला दिन’ प्रत्यक्ष साजरा करा अथवा करूं नका, पण समाजातील पुरुष व स्त्री या दोन्ही घटकांनी ‘fair treatment’ चा मंत्र सदैव ध्यानात ठेवणें मात्र गरजेचें आहे. तोच समाजसुधारणेचा गाभा आहे. […]
मराठी माणसाला भांडल्याशिवाय काहीच मिळालेलं नाही हा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिन्दवी स्वराज्यापासून ते मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रापर्यंत मराठी जनांनी सर्व भांडूनच मिळवलंय. फक्त दुर्दैव येवढच, की आता मराठी भाषेसाठी स्वत:ला मराठी म्हणवणाऱ्या लोकांशीच भांडायची वेळ आली आहे. […]
‘वैज्ञानिक दृष्टीकोन’ हा हल्ली वाक्प्रचार म्हणून वापरला जातो असं माझं मत आहे. आपल्याला न पटलेल्या गोष्टींवर हा वाक्प्रचार एखाद्याच्या तोंडावर फेकून मारला, की मग पुढची चर्चाच खुंटते. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions