आम्ही व्यंगचित्रकार खरंतर `अल्पसंख्यांक’च! १३२ कोटीच्या देशात जेमतेम १४० व्यावसायिक व्यंगचित्रकार आहेत. मराठी व्यंगचित्रकारांची प्रतिभा, विनोदबुद्धी, कल्पकता वाखाणण्यासारखी असूनही आजकालच्या माध्यमांच्या रेट्यामुळे ही कलाच लुप्त होईल की काय ? अशी भीती वाटू लागली आहे. […]
हल्ली इच्छामरण-दयामरण या विषयावर बरीच चर्चा चालूं आहे. यावर भारत सरकार एक कायदा करणार आहे, आणि सरकारच्या ‘फॅमिली वेलफेअर डिपार्टमेंट’नें दीड वर्षांपूर्वी या विषयाबद्दल जनतेकडून मतें मागवली होती. वेळी मीही त्या डिपार्टमेंटला, माझ्या इंग्रजी लेखाद्वारें , माझें मत कळवलें होतें. […]
समाजातल्या मेजॉरिटीपेक्षा भिन्न असलेल्यांना बरेच कांहीं सोसावें लागतें, कारण समाजातील प्रथा, परंपरा या, केवळ मेजॉरिटीला ध्यानात घेऊन बनवलेल्या असतात. मात्र, अशा परंपरा भूभागसापेक्ष, संस्कृति-सापेक्ष व कालसापेक्ष असतात. काळाबरोबर जसजसा समाज बदलतो, तसतसे मान्यताप्राप्तीचे निकषही बदलतात.
‘LGBTQI’ कम्युनिटीला गेली अनेकानेक शतकें-सहस्त्रकें समाजरोष पत्करावा लागला आहे, अन्याय्य असा एक ‘डाग’ बाळगत जगावें लागलें आहे. जें कांहीं Natural ( पण मेजॉरिटीपेक्षा भिन्न) आहे, ते समाजानें, सरकारनें आणि न्यायपालिकेनें आजवर शिक्षापात्र गुन्हा मानलें होतें. मात्र, आतां सुप्रीम कोर्टानें या विषयावर पुनर्विचार करण्याचें ठरवलें आहे. त्यातून या कम्युनिटीला योग्य तो न्याय मिळेल, अशी आशा करायला हरकत नाहीं. […]
गर्भवती स्त्रियांब्दल सध्या अस्तित्वात असलेला कायदा पुरेसा आहे काय ? गर्भवी स्त्रियांना स्वयम्.निर्णयाचा अधिकार नको कां ? गर्भवती स्त्रियांच्या मनाचा, तसेंच त्यांच्या भविष्याचा विचार न केल्यास, त्यांच्यावर अन्याय होत नाहीं काय ? […]
सीता ते कैकेयी, शूर्पणखा ते मंदोदरी, अहिल्या ते तारा, सार्या स्त्रियांची स्थिती समाजात कुठेतरी ‘खालची’ असलेली दिसते. या लेखात, त्यांच्या एकूण-आयुष्याचें या बाबतीतील अल्प-विवेचन आहे. […]
शेवटी युग पाठक यांना अटक झाली. त्यांना पश्चाताप होत असावा, असं ते स्वत:हूनच पोलीसांसमोर हजर झाले त्यावरून वाटतं. श्री. युग पाठक यांना फारशी शिक्षा होऊ नये असं मला मनापासून वाटतं. कारण, पश्चाताप होणं हेच सर्वात मोठं प्रायश्चित आहे, असं आपलं अध्यात्मही सांगतं. श्री. युगजी पाठक गेले सततचे ९ दिवस या पश्चातााच्या आगीत होरपळले आहेत, येवढी शिक्षा त्यांना पुरेशी आहे. ‘शरण आलेल्याला मोठ्या मनाने माफ करावं’ हे ही भारतीय तत्वज्ञानाशी सुसंगतच आहे..! ’युग’परिवर्तन म्हणतात, ते बहुदा हेच असावं..!! […]
आज ज्या वीज आणि पाण्यासारख्या गोष्टींची पैशाच्या मस्तीत आपण काटकसर करत नाही त्या एक ना एक दिवस संपून जातील. ज्या माणसांना दुखावण्याबाबत स्वतःच्याच मस्तीत आपण काटकसर करत नाही ती माणसंदेखील एखाद दिवस आपल्याला किंवा जगाला सोडून जातील. हातात काय राहील याचा विचार करा बरं एकदा. मित्रांनो; काटकसर जिथे शक्य आहे तिथे करा. जितकी जास्त बचत कराल तितकं जीवन सुसह्य असेल. मग ती बचत पैशांची असो वा नात्यांची!! […]
वाहनांचा कर्कश्य आवाज ,धूर .वाहतूककोंडी यामुळे जनता आधीच त्रस्थ आहे.यात आता दिवसरात्र दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. सरकार नक्कीच धनदांडग्यांच्या दबावा खाली काम करते आणि नेत्यांना शहराचा बट्ट्याबोळ झाला तरी त्याची फिकीर नाही हेच असे निर्णय घेण्या मागील कारण असावे.
फेरीवाल्यांचा प्रश्न सुटला नाही आणि त्यात हे पुन्हा नवे संकट !!! […]
आपल्या देशात कधी काय चर्चेला येईल, त्याचा नेम नाही. आता कंडोम ही काय सार्वजनिक चर्चेची गोष्ट आहे? पण आमची त्यावरही चर्चा सुरू. आपल्याला अडचणीच्या असणाऱ्या गोष्टींवर बंदीची मागणी करायची आणि आपणच मिटक्या मारत बघत असलेल्या वा करत असलेल्या, परंतू समाजस्वास्थ बिघडवण्याची ताकद असलेल्या गोष्टींवर सोयीनुसार गप्प राहायचं, ही आपली दुटप्पी मानसिकता या निमित्ताने पुन्हा एकदा दिसून आली, इतकंच..!! […]