MENU
नवीन लेखन...

विविध विषयांवरील वैचारिक लेखन

बिगरशेती कर – जिसके हाथ मे लाठी उसकी भैस!

ठाण्यामध्ये बिगरशेती कर (Non Agriculture tax) ठाणे महानगर पालिकेच्या हद्दीत वसूल होतो आहे…हाच कर मुंबई, ठाणे सारख्या मोठ्या शहरात घेतला जाऊ नये या साठी भारतीय जनता पक्ष जेव्हा विरोधी पक्षात होता तेव्हा आघाडी सरकारला धारेवर धरत होता. […]

बचना है तो ऐ मेरे दोस्त, आओ खेले मेंढीकोट..

मुंबई शहरात विविध ठिकाणी दिसत असलेला हा संदेश नेमका कसला आहे आणि तो कोणी लिहिला आहे हे शोधून काढण हे तपास यंत्रणांच काम आहे व ते ते करतही असतील असं मी समजतो. याकडे आपलं लक्ष वेधून घेणं मला आवश्यक वाटलं, म्हणून हा लेखन प्रपंच. […]

इंडिया, भारत आणि हिंदुस्थान

आपल्या देशातील लोकसंख्येची स्थिती समुद्रातल्या हिमनगासारखी आहे. त्याचा एक दशांश भाग पाण्यावर असतो आणि नऊ दशांश भाग पाण्याखाली असतो. पाण्याबाहेरचा भाग म्हणजे इंडियात राहणारे लोक आणि पाण्याखालील नऊ दशांश भाग म्हणजे हिंदूस्थानात राहणारे लोकं
[…]

या देशाला सतत अत्यंत सबळ विरोधी पक्ष हवा

Financial Resolution and Deposit Insurance Bill या बिलाचे अत्यंत घातक परिणाम सर्व साधारण नागरिकांवर होण्याची शक्यता खूप अधिक आहे.या बिलाचे वैशिष्ठ असे आहे कि जर एखादी बँक मग ती सरकारी असो अथवा खासगी असो बुडत असेल तर त्या बँकेला ग्राहकांचे deposits चे पैसे बुडणारी बँक तारण्यासाठी वापरण्याचा अधिकार असणार आहे. […]

सधन असताना आरक्षण मागणे हे लाचारीच

आपला समाज सुदृढ आणि एकसंघ बनण्यासाठी, आरक्षण घेणाऱ्या समाजातील समजूतदार व्यक्तींनी या गोष्टीसाठी पुढाकार घेणं कधी नव्हे एवढं आज गरजेचं झालेलं आहे. ज्यांना आरक्षणाची खरंच गरज आहे, त्यांच्यासाठी ते तसेच पुढे चालू ठेवण्यास कोणाचीही काहीच हरकत नाही, मात्र परिस्थिती सुधारली की ते समंजसपणाने आपणहून सोडूनही द्यावी, हे श्री. शिंदेंची अपेक्षाही चुकीची आहे असं म्हणता येणार नाही. […]

मला कळलेले श्री गुरूदेव दत्त

‘डिजिटल’ हा शब्द आला, की त्याला जोडून ‘डाटा’ हा शब्द येतोच. ‘डिजिटल’ पद्धतीने साठा केलेल्या ज्ञानाला किंवा माहितीला ‘डाटा’ म्हणतात हे आता बहुतेक सर्वांनाच कळतं. ह्या ‘DATA’तच मला ‘DAT(T)A’ दिसतो. Data आणि Datta यातील साम्य मला हेच सांगते, की ‘दत्त’ म्हणजे ‘ज्ञान’..! […]

न्याय झाला, पण..!

मानवी क्रौर्याची परिसमा ओलांडणाऱ्या कोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरणातील तिन्ही दोषींना आज न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. कोपर्डी घटनेतील घृणास्पद विकृती आणि विक्षिप्तपणा बघितला तर या प्रकरणात फाशीशिवाय दुसरी शिक्षा योग्य नव्हती. अत्यंत निर्घृणपणे पीडित तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. कोपर्डी अत्याचार प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला. कोपर्डीतील पिढीतला न्याय मिळावा यासाठी लाखो […]

सिद्धी जगण्याची

खरं तर मला भिक किंवा भिकारी हे शब्द, कोणत्याही, कोणच्याही आणि कशाच्याही संदर्भात उच्चारायला किंवा लिहायलाही आवडत नाही. त्या ऐवजी मी ‘दान’ किंवा ‘दान मागणारा’ असा शब्दप्रयोग करायचा प्रयत्न करतो, परंतू ‘दान’ देवळाच्या आत आणि बाहेर, ते व्हाया ‘सुटे गिराण’ निवडणूकप्रसंगी देशाच्या सर्वोच्च नेत्यांपर्यंत, असे सर्वच वेळप्रसंगी मागत असतात. पुन्हा या दानाला, ती भिकच असली तरी, प्रसंगानुरून वेगवेगळी भारदस्त नांवंही असतात. त्यामुळे मला जे पुढे सांगायचंय, त्याचं नीट आकलन तुम्हाला होणार नाही, म्हणून या लेखापुरता मी ‘भिक’ आणि ‘भिक मागणे’ असे दोन्ही शब्दप्रयोग करणार आहे. […]

कीर्तनाची प्लास्टिक सर्जरी

शेगड्या, चुली जाऊन गॅस आला. बैलगाडी, घोडागाडी जाऊन बस रेल्वे विमानं आली. वायरचा फोन जाऊन मोबाईल आले, कॅसेट जाऊन CD आणि आता क्लाउड वरून डाउनलोड करणे सुरू झाले. इतके सारे बदल जवळजवळ दोन पिढ्यात आत्मसात झाले. मग असं असेल तर कीर्तन प्रवाचनांची आधुनिक काळाप्रमाणे प्लास्टिक सर्जरी करून आणि त्या नवीन रुपाला लोकमान्य करून सिनिअर सिटीझन क्लब मध्ये हळू हळू तरुण चेहरे दिसायला लागले तर ते भारतीय संस्कृतीसंवर्धनाच्या दृष्टीने चांगल ठरणार नाही का? […]

1 91 92 93 94 95 136
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..