नवीन लेखन...

विविध विषयांवरील वैचारिक लेखन

कुटुंब आणि आजची स्त्री

कुटुंब आणि आजची स्त्री या विषयावर लेख लिहिताना प्रथंम एक गोष्ट मला आवर्जून नोंदवावीशी वाटते, ती म्हणजे या दोन्ही गोष्टी एकमेकांपासून वेगळ्या काढता येत नाहीत एवढ्या त्या एकरुप झालेल्या आहे. कुटुंबाची व्याख्या एकवेळ पुरुषाशिवाय पुरी करता येईलही, परंतू स्त्रीशिवाय ती पूर्णच होऊ शकत नाही. माझे मालवणीतून अर्थवाही कविता करणारे मालवण स्थित कविमित्र श्री. विनय सौदागर यांनी […]

रमी

पत्त्यांचे अनेक खेळ आहेत त्यात, रमी हा खेळ आपल्या जीवनाशी बराचसा निगडित आहे, म्हणून तो मला बाकीच्या पत्यांच्या खेळापेक्षा थोडा हटके वाटतो. या खेळात जीवनाची अनेक सूत्रे सापडतात. प्रत्येक खेळाडू यात पत्ते वाटतो….त्याला ते वाटावेच लागतात, याचा अर्थ त्याला जीवनाच्या सारीपाटात सूट नाही. जर हा खेळ पुढे सुरू ठेवायचा असेल तर, स्वतःची जबाबदारी प्रत्येकाला पार पाडावीच लागते. […]

बुलेट ट्रेनचा खरा चेहरा…!

हा प्रकल्प लालफीतशाहीत अडकला किंवा इतर प्राथमिकतांकडे दुर्लक्ष करून केवळ बुलेट ट्रेनचा उदो उदो केला गेला, तर इंडिया शायनिंगसारखी परिस्थिती ओढवू शकेल. गेल्या तीन वर्षांत मोदी सरकारने आजवर अशक्य वाटणाऱ्या अनेक गोष्टी शक्य करून दाखवल्या आहेत. २०२२ सालपर्यंत नवीन भारताचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर भारत-जपान मैत्रीची बुलेट ट्रेन एकही लाल सिग्नल न लागता पळवावी लागेल. […]

पद्मावती – भाग दोन आणि जास्त महत्वाचा

आज सकाळी मी पोस्ट केलेल्या ‘पद्मावती’ या लेखातील श्री. संजय लीला भन्सालींच्या वडीलांचा मी केलेला उल्लेख बहुसंख्यांना खटकला, हे चांगलं की वाईट हे नंतर ठरवू, पण माझ्या लेखातून माझ्याकडून ती चुक का ‘झाली’ हे सांगणं माझं कर्तव्य ठरतं. […]

पद्मावती

मला वाटतं, आपल्याला भन्सालींसारख्या नतद्रष्टांना धडा शिकवण्यासाठी, आपण त्यांच्या चित्रपटावर वा कलाकृतींवर अशी बंदीची मागणी न करता, असे चित्रपट आपण कोणी पाहायचेच नाहीत असं ठरवावं. लोकशाहीत कोणत्याही विषयावर चित्रपट काढायला किंवा भाष्य करायला बंदी नाही. याला अविष्कार स्वातंत्र्य असं म्हणतात. त्याच लोकशाहीत तो चित्रपट पाहायलाच हवा असंही बंधन नाही. मग आपल्या हातात हे घटनात्मक हत्यार असताना, आपण बंदीची मागणी का करतोय हे अनाकलनीय आहे. […]

एव्हरी क्लाऊड हॅज सिल्व्हर लायनिंग

… “मी, माझी बायको-मुले, झालंच तर भाऊ-बहिणी, भाचे-पुतणे, साडू-मेव्हणे खातील तुपाशी, समोरचे साले मरूदे उपाशी” ह बहुतेक सर्वांचंच ब्रिदवाक्य झालेल्या आताच्या काळात, श्री.अनिरुद्ध जोशींची, स्वत:च्या कष्टाच्या पैशांची तमा न बाळगता दुसऱ्याच्या हक्काचा पैसा मिळवून देण्यासाठीची ही निस्वार्थ धडपड, हल्लीच्या काळात अत्यंत दुर्मिळ आणि म्हणून जपण्यासारखी आहे. किळसवाण्या स्वार्थाचे नवनविन विक्रम रचले जात असताना, श्री. जोशींसारख्या व्यक्तीही याच समाजात आहेत, ही समाजासाठी खुप मोठी आशेची बाब आहे. मी आणि माझं’ या पलिकडे जग नसलेल्या, स्वार्थाच्या काळ्याकुट्ट ढगात हरवलेल्या आजच्या समाजात, श्री. जोशींसारखी व्यक्ती मला, त्या ढगाला असलेल्या सिल्व्हर लायनिॅगप्रमाणे वाटते. आणि मग ‘एव्हरी क्लाऊड हॅज सिल्व्हर लायनिंग’ या म्हणीची सत्यता पटते आणि जगायला नव्याने हुरूप येतो.. […]

शेतकरी आणि राजा

गार्डियन वृत्तपत्रात आलेल्या Andrew Brown यांच्या लेखाचा हा अनुवाद. यात गॉर्डन यांनी गुगलमुळे वृत्तपत्रांवर होणाऱ्या परिणामांची चर्चा केली आहे. […]

नोटबंदी….GST आणि GDP समिकरण….!!

“महागाई, मंदी आणि बेरोजगारीचा भस्मासुर उसळणार का…? ‘नोटाबंदी’ आणि ‘जीएसटीचा’ निर्णय घाईघाईत घेतल्यामुळे अर्थव्यवस्थेचा विकासदर आणखी खालावू शकतो, अशी भीती माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी व्यक्त केली होती.जीएसटी घाईघाईत लागू करण्यात आल्याने आता त्याचे विपरित परिणाम दिसायला लागले आहेत. […]

आली दिवाळी – धनत्रयोदशी

आज धनत्रयोदशी. पारंपारीक दिवाळीचा दुसरा दिवस. धनाची पूजा करण्याचा हा दिवस. दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरू झालेला कापणीचा हंगाम ओसरत आलेला असतो. शेतकऱ्याच्या खळ्यात धान्याच्या राशी लागलेल्या असतात. शेतकयांच्या नजरेतून खळ्यातल्या धान्याच्या राशी हेच त्यांचे धन..! ‘धान्य’ या शब्दातूनच ‘धन’ शब्दाचा जन्म झाला असावा, उगाच नाही ‘धन-धान्य’ हा जोडशब्द तयार झाला. आणि आज पैसा जे विनिमयाचं काम करतो, तेच काम पूर्वी ‘धान्य’ करायचं. म्हणजे बार्टर एक्स्चेंजच्या काळात धान्य हे महत्वाचं धन असायचं. […]

“नोटबंदि…एक हजाराची नोट’ – एक अनुभवकथन

लासलगावला दवाखाना चालवणाऱ्या डाॅक्टर मित्राला आलेला अनुभव,”नोटबंदि…एक हजाराची नोट.!खरंच विचार करणारी हि गोष्ट आहे. आपल्या देशात अजूनही गावागावात अशिक्षित, अडाणी तसेच आंगठे बहादूर लोक आहेत. कितीतरी स्वार्थी लोक या भोळ्या भाबड्या लोकांना आर्थिक व्यवहारात फसवतात. […]

1 92 93 94 95 96 136
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..