नवीन लेखन...

विविध विषयांवरील वैचारिक लेखन

पायपुसणं

काथ्यापासून व मऊशार लोकरीपासून तयार केलेल्या, मध्यमवर्गीयांच्या अवाक्याबाहेरअसलेल्या त्या महागड्या तुकड्यांवर पाऊल ठेऊन त्यांना खराब करण्याआधी शंभरदा विचार करावा लागला असता. ही डोअरमॅट्स खरेदी करणारी मंडळी त्यांना खरंच दरवाज्यात ठेवत असतील की त्यांच्या सौंदर्याने प्रभावित होऊन त्यांचं कौतुकाने शो केसमधे प्रदर्शन मांडत असतील? दैनंदिन जीवनातील एखादी वस्तू इतकी आकर्षक असू नये की तिला वापरण्याची इच्छाच होऊ नये ! […]

मनाचा दगड आणि दगडातील जीवन

…भिती मनाचा दगड झाल्याची नाही, तर हा दगड समाजाचाच कपाळमोक्ष करील याची आहे. ती प्रक्रीया सुरू होण्यापूर्वीच हा दगड फोडला पाहीजे. दगडाच्या आतही जीवन असू शकतं हे रामदासस्वामींनी शिवरायांना दाखवून दिलं होतं. आता मात्र आपल्यालाच आपले रामदास स्वामी बनवून, स्वत:च्याच मनाचा दगड फोडून आतील जीवनाला वर आणायची कधी नव्हती येवढी गरज आज आहे. […]

देवळं आणि देव : तेंव्हा अन् आता

…जनावर काय नि देव काय, एकदा का माणसाळला, की मग तो पार ‘पाळीव’ होऊन त्याची सवय होते. आणि एकदा का सवय झाली, की मग त्याच्याबद्दलची भिती वाटेनाशी होते. देवाचं तेच झालंय. भिती नाहीशी झाली, आणि मग बरे कमी आणि वाईट जास्त असे सर्व व्यवहार देवाच्या साक्षीनेच केले जातात. क्वचितप्रसंगी अशा व्यवहारात देवाला भागिदार म्हणूनही घेतलं जाऊ लागलं. माणसाच्या माणूसकी प्रमाणे देवाची देवसकी गेल्यामुळे, देव भागीदार म्हणून खुशही होत असावा, हे त्याला भागिदार म्हणून घेतलेल्यांच्या होणाऱ्या उत्तरोत्तर प्रगतीवरून दिसतं, कारण त्या प्रगतीत भागिदार म्हणून देवाचा वाटाही वाढता असतो… […]

घराघरातले मन्मथ आणि हादरलेले आईबाबा…

मन्मथ. मुंबईत राहणारे आई वडील. दोघेही आयएएस अधिकारी. त्यांचा हा एकुलता एक मुलगा. घरात सांस्कृतिक वातावरण. आई-बाबा रोज त्याला सकाळी स्वत:सोबत फिरायला न्यायचे. एका आनंदी कुटुंबाच्या व्याख्येत चपखल बसणारे हे घर. त्या घरातल्या मन्मथने वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला. या घटनेने फक्त म्हैसकर कुटुंबच सुन्न झालेले नाही. ज्या कुणाला एक मुलगा […]

प्रमुख देवस्थानांची संपत्ती

एखाद्या पत्रकार अथवा सच्च्या समाजकारण्याने जर या सगळ्या मंदिरांचा आतापर्यंत फुकट मिळालेला पैसा अन गुंतवणूक बाहेर काढायचं ठरवलं तर जो आकडा समोर येईल तो Digest करायची आपल्या कोणात ताकद आहे का? […]

पद्य आणि मृत्युविचार : भाग ५ – अ / ११

शेक्सपियरचे ‘To be or not to be’ हें वाक्य प्रसिद्धच आहे ; तसेंच, ज्यूलियस सीझर नाटकामधील, ‘You too Brutus ; then fall Ceasar’ हें वाक्यही तितकेंच प्रसिद्ध आहे. अशी, मृत्यूच्या प्रत्यक्षाप्रत्यक्ष उल्लेखाची इंग्रजी नव्याजुन्या साहित्यातील बरीच उदाहरणें उद्धृत करतां येतील. […]

गटारी (?) अमावास्या

या दिव्याच्या अमावास्येला ‘गटारी’ अमावास्या कां म्हणतात, असा प्रश्न पडतो. ‘गटार’ हा शब्द इंग्रजीतून आला हें उघड आहे. याचा अर्थ असा की इंग्रजी राजवट सुरूं झाल्यानंतरच ‘गटारी’ अमावास्या असें नांव रूढ झालें असणार , म्हणजेच १८५७ नंतर, आणि बहुश: १९व्या शतकाच्या अखेरच्या काळात किंवा २०व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात. […]

1 97 98 99 100 101 136
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..