नवीन लेखन...

एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक

पोलीस दलात एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची १९९५ मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली. प्रदीप शर्मा यांच्यासोबत त्यांना गु्न्हे अन्वेषण शाखेत काम सुरू केले. दया नायक हे शर्मा यांच्या एन्काउंटर पथकात होते. दया नायक यांनी १९९६ मध्ये पहिला एन्काउंटर केला. त्यांनी जवळपास ८० गुंडाचे एन्काउंटर केले आहेत. […]

गोपाळराव बळवंतराव कांबळे ऊर्फ जी कांबळे

अशा नावामध्ये एक नांव अग्रणी तळपत होते, आपल्या जादूभरी रंगभोर आविष्काराने सर्वानाच आकर्षीत करीत होते, ते म्हणजे गोपाळ बळवंत कांबळे अथवा ज्यांची सुपारीचीत सही आपणाला नितांत सुंदर अशा बॅनरवर दिसत असे, ते ‘ जी. कांबळे ‘ या रंगसम्राटाचे ! […]

भाजप नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र विधिमंडळ भारतीय जनता पक्षाने त्यांची नेतेपदी निवड केल्याने ते महाराष्ट्र राज्याचे २०१४ पासून २०१९ पर्यंत ते मुख्यमंत्री होते. महाराष्ट्रात भाजपचा पहिला मुख्यमंत्री बनण्याची किमयाही त्यांनी साधली होती. फडणवीस हे चंद्रपूर जिल्ह्यातील मालगुजार कुटुंब. त्यांची भरपूर शेती आजही आहे. […]

बाजीप्रभू देशपांडे

एक भव्य दिव्य व्यक्तिमत्त्व चांद्रसेनिय कायस्थांचा हा ढाण्यावाघ. साऱ्या महाराष्ट्राला वीररत्न बाजीप्रभू देशपांडे या नावाने परिचित असलेलं नाव अत्यंत वजनदार असलेले नाव. […]

सत्यजित रे यांची बायको

चित्रपट जगप्रसिद्ध बंगाली दिग्दर्शक सत्यजित रे यांची पत्नी बिजोया रे तिने आपल्या वयाच्या ८४ व्या वर्षी आपल्या आठवणी लिहायला सुरुवात केली. त्या २००३ ते २००४च्या दरम्यान ‘देश’ या बंगाली मासिकातून ३७ भागात क्रमशः प्रकाशित झाल्या. नंतर त्या पुस्तकरूपात बाजारात आल्या. […]

सूत्रसंचालक व लेखक डॉ. सुनील देवधर

डॉ. सुनील देवधर यांनी आकाशवाणीत ३८ वर्षे काम केले. ते आकाशवाणी पुणे केंद्रातून सहायक संचालक पदावरून निवृत्त झाले. त्यांचा निवेदक ते सहायक संचालक या पदापर्यंतचा प्रवास एका हळव्या मनाचा कवी, कलाकार म्हणून जितका परिचित आहे, तितकेच त्यांची कणखर व्यक्ती म्हणूनही वेगळी ओळख आहे. […]

लक्ष्मीनारायण सुब्रह्मण्यम उर्फ एल सुब्रह्मण्यम

लक्ष्मीनारायण सुब्रह्मण्यम हे कुशल व्हायोलिन वादक म्हणून जगद्विख्यात आहेत. कर्नाटक शैली आणि पाश्चिमात्य शैली दोन्हींवर त्यांचं प्रभुत्व आहे. वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी त्यांनी लोकांसमोर आपली कला सादर करून आपल्या कुशलतेची चुणूक दाखवून दिली होती. एम.बी.बी.एस डॉक्टर असलेल्या एल. सुब्रह्मण्यम यांच्या दोनशेहून अधिक रेकॉर्डस् प्रसिद्ध झाल्या आहेत. […]

नामवंत प्रसूतीतज्ज्ञ डॉ. अरविंद संगमनेरकर

महाराष्ट्रातील नामवंत प्रसूतीतज्ज्ञ, शतायुषी या मराठीतील सर्वाधिक खपाच्या दिवाळी अंकाचे संपादक आणि उत्तम लेखक डॉ. अरविंद संगमनेरकर यांनी पन्नास वर्षांहून अधिक काळ प्रसूतीतज्ज्ञ म्हणून काम केले. त्यांनी महाराष्ट्र आणि राज्याबाहेरील आरोग्य शिबिरांमध्ये सहभागी होऊन दोन लाखांहून अधिक महिलांची आरोग्य तपासणी केली. […]

रोजगार हमी योजनेचे जनक वि. स. पागे

ग्रामीण भागातील ‘रोजगार निर्मिती’ या क्षेत्रात देशातील इतर राज्यांना आदर्शकृत ठरलेल्या महाराष्ट्राच्या रोजगार हमी योजनेचे जनक आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापतिपद अठरा वर्षे सांभाळणारे ज्येष्ठ गांधीवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक, तत्त्वचिंतक विठ्ठल सखाराम तथा वि. स. पागे यांच्या अभ्यासू व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू होते. […]

रशियाचे माजी पंतप्रधान व्हिक्टर चेनोमिर्दिन

व्हिक्टर चेनोमिर्दिन हे रशियामध्ये आणि रशियन भाषा बोलल्या जाणाऱ्या देशांमध्ये ओळखले जायचे ते त्यांच्या भाषेच्या बेधडक वापरामुळे! त्या भाषेचे व्याकरण, त्याची सुबोधता आणि त्याची शैली या सर्वांना ओलांडून ते बोलत राहायचे. बऱ्याचदा अनाकलनीय वाटणारे, कानावर सहसा न पडणारे असे शब्दप्रयोग ते वापरत, त्यामुळे ते आता काय बोलणार, असा प्रश्न पडे. तथापि ते लोकप्रिय बनले ते त्यांच्याकडे […]

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..