नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

वसंत रांजणे

वेगवान गोलंदाजांपेक्षा फिरकी गोलंदाजीला खेळपट्ट्या अनुकूल असण्याच्या काळात अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून ख्यातनाम असलेले रांजणे यांनी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. रांजणे यांनी १९५६-५७ च्या मोसमात रणजी स्पर्धेतील पदार्पणाच्या सामन्यात त्यांनी सौराष्ट्राविरुद्ध एकाच डावात ३५ धावांमध्ये हॅटट्रिकसह नऊ बळी घेतले. द्रुतमध्यमगती गोलंदाज असलेल्या रांजणे यांनी या सामन्यात केवळ ७१ धावांमध्ये १३ बळी घेतले. […]

सेलेना गोमेज

सेलेना गोमेज ए. आर. रेहमानची खूप मोठी चाहती आहे.एका मुलाखतीत खुद्द सेलेनाने ही कबुली दिली.मी भारतीय संगीत मनापासून ऐकेते आणि ते मला आवडतेही. ए़ आऱ रेहमानचे संगीत मला सर्वाधिक आवडते़ त्याच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली तर मला प्रचंड आनंद होईल, बॉलिवूडसाठी गायलाही मला आवडेल,असे सेलेना म्हणाली.भारतीय संस्कृतीबद्दलही सेलेना बोलली. मला भारत आणि भारतातील हिंदू संस्कृती पूर्वापार आवडते. […]

आयझॅक मेरिट सिंगर

१८३९ मध्ये सिंगर यांनी पहिल्यांदा खडकात छिद्र पाडण्यासाठी मशीन बनवली.नंतर लाकूड आणि धातू कापण्यासाठी मशीन बनवली.दरम्यान १८५१ मध्ये त्यांना शिलाई मशीन बनवायची संधी मिळाली. त्यांनी ते मशीन फक्त दुरुस्तच केले नाही, तर आणखी चांगले मशीन बनवण्याचा संकल्प केला आणि केवळ ११ दिवसांच्या अथक परिश्रमानंतर ते बनवले आणि जगासमोर सादर केले.हे यंत्र सिंगर म्हणून ओळखले जाऊ लागले. […]

ट्रेंट बोल्ट

टेंट्र बोल्ट वयाच्या १७ व्या वर्षीच न्यूझीलंडचा सर्वात फास्ट शाळकरी बॉलर बनला होता. ट्रेंटचा मोठा भाऊ जोनो देखील फास्ट बॉलर. ट्रेंट डाव्या हाताने फास्ट बॉलिंग आणि उजव्या हाताने बॅटींग करतो. तर जोनो त्याच्या नेमकं उलटं. उजव्या हाताने बॉलिंग आणि डावखुरा बॅट्समन. बोल्टची प्रथम २००७ साली आधी भारताच्या दौऱ्यावर जाणाऱ्या न्यूझीलंड A टीममध्ये निवड झाली होती. त्यानंतर पुढच्या वर्षी तो अंडर १९ वर्ल्ड कप टीमचा सदस्य बनला. […]

गणितयोगी डॉ. श्रीराम अभ्यंकर

डॉ. श्रीराम अभ्यंकर यांना गणिताचे बाळकडू त्यांचे वडील शंकर अभ्यंकर यांच्याकडून मिळालेले होते. त्यांचे वडील हे मध्य प्रदेशातील उज्जन व ग्वाल्हेर येथे गणिताचे प्राध्यापक होते. डॉ. श्रीराम अभ्यंकर यांचा पुण्याशी अतूट संबंध होता. अनेकदा ते येथे त्यांच्या बंगल्यात वास्तव्यास असत व येथे आले की, मुलांना गोळा करून गणित शिकवण्याचा मोह त्यांना कधीच आवरत नसे. इतके त्यांचे गणितावर व अध्यापनावर प्रेम होते. […]

सूत्रसंचालक व लेखक डॉ. सुनील देवधर

डॉ. सुनील देवधर यांनी आकाशवाणीत ३८ वर्षे काम केले. ते आकाशवाणी पुणे केंद्रातून सहायक संचालक पदावरून निवृत्त झाले. त्यांचा निवेदक ते सहायक संचालक या पदापर्यंतचा प्रवास एका हळव्या मनाचा कवी, कलाकार म्हणून जितका परिचित आहे, तितकेच त्यांची कणखर व्यक्ती म्हणूनही वेगळी ओळख आहे. […]

लक्ष्मीनारायण सुब्रह्मण्यम उर्फ एल सुब्रह्मण्यम

लक्ष्मीनारायण सुब्रह्मण्यम हे कुशल व्हायोलिन वादक म्हणून जगद्विख्यात आहेत. कर्नाटक शैली आणि पाश्चिमात्य शैली दोन्हींवर त्यांचं प्रभुत्व आहे. वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी त्यांनी लोकांसमोर आपली कला सादर करून आपल्या कुशलतेची चुणूक दाखवून दिली होती. एम.बी.बी.एस डॉक्टर असलेल्या एल. सुब्रह्मण्यम यांच्या दोनशेहून अधिक रेकॉर्डस् प्रसिद्ध झाल्या आहेत. […]

नामवंत प्रसूतीतज्ज्ञ डॉ. अरविंद संगमनेरकर

महाराष्ट्रातील नामवंत प्रसूतीतज्ज्ञ, शतायुषी या मराठीतील सर्वाधिक खपाच्या दिवाळी अंकाचे संपादक आणि उत्तम लेखक डॉ. अरविंद संगमनेरकर यांनी पन्नास वर्षांहून अधिक काळ प्रसूतीतज्ज्ञ म्हणून काम केले. त्यांनी महाराष्ट्र आणि राज्याबाहेरील आरोग्य शिबिरांमध्ये सहभागी होऊन दोन लाखांहून अधिक महिलांची आरोग्य तपासणी केली. […]

रोजगार हमी योजनेचे जनक वि. स. पागे

ग्रामीण भागातील ‘रोजगार निर्मिती’ या क्षेत्रात देशातील इतर राज्यांना आदर्शकृत ठरलेल्या महाराष्ट्राच्या रोजगार हमी योजनेचे जनक आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापतिपद अठरा वर्षे सांभाळणारे ज्येष्ठ गांधीवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक, तत्त्वचिंतक विठ्ठल सखाराम तथा वि. स. पागे यांच्या अभ्यासू व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू होते. […]

आंबेडकरी नेते दादासाहेब रुपवते

ज्येष्ठ आंबेडकरी नेते आणि माजी मंत्री दादासाहेब_रुपवते यांचा जन्म २८ फेब्रुवारी १९२५ रोजी अकोले, अहमदनगर येथे झाला. दामोदर तात्याबा तथा दादासाहेब रुपवते यांचे प्राथमिक शिक्षण अकोलेत व पुढील शिक्षण नाशिकला झाले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ कॉलेजमधून पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले.प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत अर्थात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून दादासाहेब रुपवतेनी विद्यार्थी […]

1 2 3 392
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..