नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

माजी सरन्यायाधीश पी एन भगवती

नागरिकांना शिक्षेविरोधात दाद मागण्याचा अधिकार असल्याचा निवाडा उच्च न्यायालयांनी दिला असताना व सर्वोच्च न्यायालयाकडूनही त्याच निकालाची अपेक्षा असताना भगवती यांनी नागरिकांच्या या अधिकाराविरोधात निकाल दिला. हा निकाल तेव्हा वादग्रस्त ठरला होता. […]

ब्रिटीश वैद्यक जेम्स पार्किन्सन

१८१७ साली ब्रिटीश वैद्यक जेम्स पार्किन्सन यांनी प्रथम या आजाराची स्थिती लोकांच्या नजरेस आणून दिली ‘पार्किन्सन रोग’ ह्या या आजाराचा शोध लावणाऱ्या जेम्स पार्किन्सन याच्या नावाने हा आजार ओळखला जातो. […]

ज्येष्ठ बालसाहित्यिक दत्ता टोळ

२००२ साली नगरमध्ये भरलेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. मुलांमध्ये वाचनाची आवड वाढावी, यासाठी दत्ता टोळ यांनी पालिकेच्या शाळांमध्ये १५० बालवाचनालये सुरू केली. […]

सिनेसंगीताच्या सुवर्णयुगाचे प्रतिनिधी अमीन सायानी

अमीन सायानी यांचा पूर्ण परिवार स्वातंत्र्यसंग्रामाशी जोडला गेला होता. महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल आणि मौलाना आझाद हे चार प्रमुख नेते त्यांच्या परिवाराला व्यक्तिश: ओळखत होते त्यांच्या वडिलांचे काका रहेमतुला सायानी साहब गांधीजींचे निकटचे स्नेही होते. […]

‘जनकवी’ पी सावळाराम

पी. सावळाराम यांना ‘जनकवी’ ही उपाधी देताना कुसुमाग्रजांना नेमके काय अभिप्रेत होते, हे त्यांनी पुढील शब्दांमध्ये व्यक्त केले आहे..‘ पी. सावळाराम त्यांच्या रसपूर्ण आणि भावगर्भ गीतांच्या द्वारा महाराष्ट्रातील असंख्य घरांपर्यंत- नव्हे, घरातल्या स्वयंपाकघरांपर्यंतही पोहोचले आहेत. खानदानी दिवाणखान्यापासून गोरगरीबांच्या ओटी-ओसरीपर्यंत सर्वत्र या नावाचा संचार झाला आहे. नागरवस्तीच्या वेशीवरच ते थांबले नाहीत. ग्रामीण भागातील झोपडय़ांत आणि चावडी-चव्हाटय़ावरही त्यांचे स्वागत झाले आहे. […]

बुंदेलखंडचा महाराजा छत्रसाल बुंदेला

बुंदेलखंडचा महाराजा छत्रसाल बुंदेला यांचा जन्म ४ मे १६४९ रोजी झांशीजवळ ककर-कचनय गावामध्ये झाला. छत्रसाल राजाने बुंदेलखंडला शक्तिशाली राज्य बनवले होते. छतरपूर नगर छत्रसालनेच वसवले होते. त्यांची राजधानी महोबा होती. ते धार्मिक स्वभावाचे होते. छत्रसाल यांना बुंदेलखंडचे शिवाजी म्हणून ओळखले जायचे. छत्रसाल यांच्या वडिलांचे नाव होते बुंदेला वीर चंपतराय. त्यांनी १७ व्या शतकाच्या तिसऱ्या दशकात ओरछा […]

ट्रिक फोटोग्राफी व स्पेशल ईफेक्ट्सचे जनक बाबूभाई मिस्त्री

आपल्या हिंदू संस्कृतीतील ‘पौराणिक’ ग्रंथातील प्रत्येक कथेचा पाया हा चमत्कारावरच रचला गेला आहे. देवांचे अवतार, प्रकटदृश्ये, त्यांची दैवीरूपे हा सर्व भाग काल्पनिक असला तरीही त्याला मूर्तरूप दिलं ते ‘बाबूभाई मिस्त्रीं’नी. […]

प्रसिद्ध वैशाली आणि रूपाली हॉटेलचे मालक जगन्नाथ शेट्टी

वयाच्या १७ व्या वर्षी १९४९ साली जगन्नाथ शेट्टी पुण्यात आले आणि हॉटेल वैशाली मध्ये काम करण्यास सुरूवात केली. हॉटेल आपलं स्वत:चं असल्यासारखं ते मेहनत घेऊन काम करत होते. पहाटे पासुन ते रात्री उशीरापर्यंत हॉटेलमध्ये सर्व कामं ते पाहात असत.त्यांनी १९५१ मध्ये ‘कॅफे मद्रास’ हे रेस्टॉरंट सुरू केले. त्यानंतर मद्रास हेल्थ होम व वैशाली हॉटेल सुरू केले. […]

हार्मोनिअम, ऑर्गन वादक आदित्य ओक

आदित्य ओक यांनी अनेक कार्यक्रमांमध्ये उल्लेखनीय सहभाग नोंदवला आहे, तसंच अनेक चित्रपटांचं संयोजनही केलं आहे. ‘बालगंधर्व’सारख्या चित्रपटाचं संगीत संयोजन केले आहे. […]

गायक नंदेश उमप

लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्याबरोबर वयाच्या आठव्या वर्षी नंदेश रंगमंचावर गायला उभा राहिला. परिणामी ‘ये दादा आवार ये…’ म्हणणाऱ्या कोळणीपासून ते ‘नाय बा किस्ना असून उपकाल, संगत तुजी नाई बली ले’ म्हणणाऱ्या पेंद्याच्या बोबड्या गवळणीपर्यंत लोकशाहिरांची गायकी नंदेशने सहीसही उचलली. […]

1 100 101 102 103 104 392
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..