व्यक्तीचित्रे
या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..
सुप्रसिद्ध लेखक डॉ. शिवराम कारंथ
वयाच्या ९५ व्या वर्षी डॉक्टर कारंत यांनी पक्षांवर ‘ बर्डस ‘ पुस्तक लिहावयास घेतले होते. ते लिहूनही पूर्ण झाले होते परंतु ते त्यांच्या मृत्यूनंतर २००२ साली प्रकाशित झाले. […]
पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु देवदत्त दाभोलकर
शिक्षणक्षेत्रात मुलगामी विचार मांडणारे दाभोलकर हे स्वातंत्र्योत्तर सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील बिनीचे शिलेदार म्हणून ओळखले जात असत. […]
भारताचे भूतपूर्व सरसेनापती जनरल के एस थिमय्या
इंग्लंडमधील शाही सैनिकी महाविद्यालयात शिक्षण घेतल्यावर १९२६ साली हैदराबाद पायदळ रेजिमेंट (सध्याची कुमाउँनी) मध्ये राजादिष्ट अधिकारी म्हणून काम करण्यास सुरुवात केली. […]
सुप्रसिद्ध कवी दिलीप चित्रे
इंग्रजी वृत्तपत्रे आणि नियतकालिके यातून त्यांनी राजकीय , सांस्कृतिक विषयांवर खूप लेखन केले. दिलीप चित्रे यांनी चित्रकलेविषयी खूप लेखन केले आणि १९७८ साली ‘ गोदाम ‘ या चित्रपटाचे कथालेखन-दिग्दर्शन आणि संगीत दिग्दर्शनही त्यांनी केले. […]
सुप्रसिद्ध लेखक चंद्रकांत खोत
मुंबईच्या परळ-लालबागच्या वातावरणात वाढलेले खोत मालवणी मुलखातला ठसक्यात कुणाचाही मुलाहिजा न ठेवता बोलत असत. १९९५ नंतर ते अज्ञातवासात गेले होते. सुमारे १५ वर्षांनी ते प्रकट झाले तेव्हा त्यांच्या डोक्यावरील फरकॅप गायब झाली होती. […]
अभिनेते व नाटककार विष्णु हरी औंधकर
बालवयातच त्यांनी महाराष्ट्र नाटक मंडळीत स्त्रीपार्ट करण्यासाठी प्रवेश केला. तेथे त्यांनी ‘पुण्यप्रभाव’, ‘शिवसंभव’, ‘कांचनगडची मोहना’ इत्यादी नाटकांतून कामे केली. त्याच वेळेस दादासाहेब फाळके ‘राजा हरिश्चंद्र’ या चित्रपटाची निर्मिती करत होते. या चित्रपटात भूमिका करण्यासाठी ते नट मंडळी शोधत होते. त्यांच्या नजरेत औंधकर आले व त्यांनी औंधकर यांना आपल्या चित्रपटात भूमिका दिली. […]
ख्यातनाम मराठी कोशकार चिंतामणी गणेश कर्वे
‘मानवी संस्कृतीचा इतिहास’, ‘मराठी साहित्यातील उपेक्षित मानकरी’, ‘कोशकार केतकर’ असे ग्रंथ रचले. ज्ञानवंत, विचारवंत, व चिकित्सक अशा चिंतामणी गणेश कर्वे यांनी कोशनिर्मितीचे प्रचंड काम केले. महाराष्ट्रीय विद्वत्तेचा आदर्श म्हणून त्यांच्या शब्दकोशाकडे पाहिले जाते. […]
‘केएफसी’चे साम्राज्य उभारणारे कर्नल सँडर्स
१९६४ पर्यंत सँडर्स यांच्या ‘फ्राइड चिकन’ विक्रेत्यांच्या 600 फ्रँचायझीज होत्या. त्या वेळी त्यांनी आपली कंपनी ही 2 मिलियन डॉलर्सना विकली. जरी त्यांनी आपली कंपनी विकली तरी ते त्या कंपनीचे नेहमीच चेहरा राहिले. […]
ज्येष्ठ अभिनेते आणि नाटककार बबन प्रभू
फार्स किंवा प्रहसन या प्रकाराला मराठी रंगभूमीवर रुजवलं आणि गाजवलं नाहीतर प्रतिष्ठा मिळवून दिली ती अभिनेता-नाटककार बबन प्रभू यांनी. त्यांनी ‘झोपी गेलेला जागा झाला’, ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’, घोळात घोळ’ यासारखे अनेक फार्स लिहिले. […]