नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

पत्रकार अनंत दीक्षित

केसरीतून त्यांच्या पत्रकारितेची सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी कोल्हापूर ‘सकाळ’मध्ये काम पाहिले. कोल्हापूर ‘सकाळ’मध्ये ते उपसंपादक ते वृत्तसंपादक म्हणून १९८२ ते २००० सालापर्यंत कार्यरत होते. […]

सुप्रसिद्ध लेखक श्री अनंत काणेकर

अनंत काणेकर यांचा ‘ चांदरात ‘ हा काव्यसंग्रह खूप गाजला. अनंत काणेकर यांनी १९३९ साली प्रदर्शित झालेल्या ‘ माणूस ‘ या चित्रपटाचे संवाद लेखन केले परंतु त्याच वर्षी तो चित्रपट हिंदीमध्येही प्रदर्शित झाला ‘ आदमी ‘ ह्या नावाने याही चित्रपटाचे संवाद लेखन त्यांनी केले. […]

क्रिकेटपटू सुभाष गुप्ते

सुभाष गुप्ते हे लेगस्पिनचे बादशहा. ३६ कसोट्यांमधून १४९ बळी मिळविलेले सुभाष गुप्ते हे आंतरराष्ट्रीय क्षितिजावरील सर्वाधिक चमकदार फिरकीपटूंपैकी एक होते. फलंदाजाने आक्रमक रूख़ अंगिकारल्यास मात्र गुप्ते काहीसे धास्तावतात असेही निरीक्षण या संघातील खेळाडूंनी नोंदविलेले आहे. […]

सुप्रसिद्ध लेखक गं . बा. सरदार

सरदार हे गांधीवाद आणि मार्क्सवाद या दोन्ही विचारसरणीचा संस्कार असणारे समाजवादी विचारवंत म्हणून ओळखले जातात. सर्व जातीतील त्यांचे मित्र होते. त्यांनी कधीच जात-पात मानली नाही. आपल्या अनेक मित्रांचे , वारल्यांचे आयुष्य मातीमोल झालेले त्यांनी पाहिलेले होते. त्याचा परिणाम त्यांच्यावर खूप झाला आणि समाजवादी प्रेरणा त्यांना तेथूनच झाली. […]

मराठी नाट्य चित्रपटसृष्टी मधील जेष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे

‘कथा अकलेच्या कांद्याची’, ‘राजकारण गेलं चुलीत’ आणि ‘सासुबाईंचं असंच असतं’ या नाटकातील अभिनयामुळे रसिकांच्या मनात घर करून असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे या नावाप्रमाणेच सतत हसतमुख असणारी मराठी नाट्य चित्रपटसृष्टी मधील उत्तम अभिनेत्री आहेत. त्यांचा जन्म ९ डिसेंबर रोजी झाला. सुरुवातीच्या काळात पडद्यावर मुख्य नायिकेच्या मागे नृत्य करत असतानाच, डोळयात आपणही एक उत्तम अभिनेत्री म्हणून पुढे […]

डॉ. द्वारकानाथ कोटणीस

डॉ.कोटणीस यांचे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले या शहराचे घट्ट नाते होते. त्यांचा जन्म १० ऑक्टोबर १९१० रोजी सोलापूर येथे झाला. डॉ.कोटणीसांचा जन्म वेंगुर्ल्यात झाला नसला, तरीही कोटणीस कुटुंब हे मूळचे वेंगुर्ल्याचे असून अनेक वर्षे ते वेंगुर्ल्यातच राहत होते. डॉ.द्वारकानाथ कोटणीस यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण काही काळ वेंगुर्ल्यातील रा.कृ.पाटकर हायस्कूलमध्ये झाले. तेथेच त्यांच्या भावी आयुष्याची पायाभरणी […]

सेनानी महाराणी ताराराणी

महाराणी ताराबाई या छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते ह्यांच्या कन्या होत्या. त्यांचा जन्म १६७५ रोजी झाला. छत्रपती राजाराम महाराजांशी त्यांचे लग्न १६८३-८४ च्या सुमारास झाले. २५ मार्च १६८९ रोजी मोघलांनी रायगडांस वेढा घातला असता त्या छत्रपती राजाराम महाराज यांच्यासह रायगडावरून निसटून गेल्या.छत्रपती राजाराम महाराज जिंजीला गेल्यानंतर ताराबाई,राजसबाई व अंबिकाबाई या विशाळगड येथे राहिल्या.रामचंद्रपंत अमात्य यांच्या मार्गदर्शनाखाली […]

कोबोल या भाषेची निर्माती ग्रेस हॉपर

कंप्यूटरच्या भाषांपैकी एक “कोबोल” या भाषेची निर्माती ग्रेस हॉपर यांचा जन्म ९ डिसेंबर १९०६ रोजी न्यूयॉर्क येथे झाला. सुमारे ८० वर्षांपूर्वी “इंटरनेट’चे अस्तित्व कुणाला माहिती नव्हते. संगणकविज्ञान ही शाखा अगदी नवी होती. संशोधनाची साधने नव्हती. अशा परिस्थितीत संगणकविज्ञान आत्मसात करून “प्रोग्रॅमिंग’मध्ये अजरामर योगदान देणाऱ्या ग्रेस मरे हॉपर या पहिल्या महिला शास्त्रज्ञ! आपल्या असामान्य बुद्धीवैभवाने त्या अमेरिकन नौदलातल्या […]

सुप्रसिद्ध लेखक व. पु. काळे

व. पु. काळे यांनी शेकडो कथाकथनाचे कार्यक्रम सर्वत्र केले त्याला तरुण वर्गाकडूनच नव्हे तर सर्व स्तरावरून प्रचंड प्रतिसाद मिळत असे. आजही त्याच्या कथाकथनाच्या कॅसेट्स , पुस्तके प्रचंड लोकप्रिय आहेत. वपुच्या कथांमध्ये जो शेवटचा परिच्छेद असतो तो तरुण पिढीला जास्त आवडतो असे अनेकवेळा दिसून आले आहे , त्याचप्रमाणे लेखातील किंवा कथेतील मधली काही वाक्ये अनेकांवर विशेषतः तरुण पिढीवर खूप चांगला परिणाम करून जातात. […]

सुप्रसिद्ध रंगकर्मी भालचंद्र पेंढारकर

भालचंद्र पेंढारकर शिस्तीचे भोक्ते होतेच परंतु त्यांची रंगभूमीवर अमाप श्रद्धा होती. तिसरी घंटा जाहीर केलेल्या वेळेवरच होणार आणि त्याच क्षणी बुकिंगची पर्वा न करता नाटक सुरु करणारा एकमेव निर्माता आणि अभिनेते ते होते. मुबई साहित्य संघात त्यांची स्वतःची रेकॉर्डिंग रूम होती. त्यात त्यांनी असंख्य नाटके रेकॉर्ड करून ठेवली आहेत. […]

1 105 106 107 108 109 392
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..