नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते उदय सबनीस

मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीवर आपल्या अभिनयाने एक वेगळा ठसा उमटविणारे उदय सबनीस यांचा जन्म ८ डिसेंबर १९५९ रोजी झाला. उदय सबनीस यांना त्यांच्या जवळचे सॅबीदादा या नावानेच ओळखतात. ते उत्तम अभिनेते आहेतच पण त्या बरोबर ते उत्तम व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहेत. मुळचे कोल्हापूरचे असलेले उदय सबनीस यांनी मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स, मुलुंड येथून तसेच नवभारत विद्यालय, मुंबई […]

इज्रायलच्या माजी पंतप्रधान गोल्डा मायर

इज्रायलच्या माजी पंतप्रधान गोल्डा मायर यांचा जन्म ३ मे १८९८ रोजी झाला. गोल्डा माबोविच म्हणजेच गोल्डा मायर या इज्रायलची “आयर्न लेडी” म्हणून ओळखल्या जात असत. १९६९ ते १९७४ त्यांनी इज्रायलचे पंतप्रधानपद भुषविले. ज्युईश धर्माभिमानी, कणखर देशभक्त, मुरलेली राजकारणी, लोकप्रिय व्यक्तिमत्व ह्या सर्व व्याख्यांनी ओळखली जाते. १९७० साली अमेरिकेत “सर्वात आवडती (admired) स्त्री” म्हणून निवडल्या गेलेल्या गोल्डा यांचा […]

सुविख्यात नृत्यांगना सीतारादेवी

नर्तिका म्ह्णून त्यांनी चित्रपटात कामे केली तसेच अभिनयातही त्या उत्तम असल्यामुळे त्यांना चित्रपटांमध्ये नायिकेची भूमिकाही साकारायला मिळाली. मोठमोठया कलाकारांचा सानिध्य त्यांना लाभले त्यामध्ये पं .रविशंकर , उस्ताद अल्लारखाँ , बडे गुलाम अली खाँ यांनी सीतारादेवी यांच्या नृत्याचे कौतुक केले. […]

मोहन वाघ

छायाचित्रकार, नाट्यनिर्माते, नाट्यदिग्दर्शक, प्रकाशयोजनाकार, नेपथ्यकार मोहन वाघ यांचा जन्म ७ डिसेंबर १९२९ रोजी झाला. मोहन वाघ मूळचे कारवारचे. जे. जे. कला महाविद्यालयातील शिक्षण अर्धवट सोडलेल्या वाघांनी नंतर छायाचित्रण सुरू केले. छायाचित्रणापासून करिअरची सुरूवात करणारे मोहन वाघ नंतर नेपथ्य, नाट्यदिग्दर्शक आणि नाट्यनिर्माते म्हणून नावारूपास आले. कमाल अमरोहींच्या पाकिजासाठी त्यांना डिझाईनचा राष्ट्रपती पुरस्कारही मिळाला. नाटकाच्या प्रेमापोटी ते त्या कलेकडे […]

ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक विनय आपटे

आपल्या अभिनयाने आणि प्रभावी दिग्दर्शनाने मराठी सिनेनाट्य सृष्टीत आगळी छाप पाडणारे ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक विनय आपटे यांचा जन्म १७ जून १९५१ रोजी झाला. अभिनय, दिग्दर्शन आणि नेपथ्य यांची चांगली जाणकारी असलेले रंगकर्मी म्हणून प्रसिद्ध असलेले विनय आपटे गेली चाळीस वर्ष मराठी रंगभूमीवर कार्यरत होते. विद्यार्थीदशेत विद्यार्थी संघटनांसाठी काम करता करता ते रंगभूमीवर आले. विजय बोंद्रे यांनी त्यांना […]

सुप्रसिद्ध गायिका हिराबाई बडोदेकर

हिराबाई रेडिओवर प्रथम गायल्या, त्या १९२९ मध्ये. रेडिओ सुरू होऊन त्यावेळी अवघी दोन वर्षे झाली होती. त्यानंतर त्यांचे कार्यक्रम सातत्याने रेडिओवर होऊ लागले. १९२९ पासून ते १९७३ मध्ये हिराबाई गायनातून निवृत्त हाईपर्यंत, म्हणजे जवळ जवळ ४५ वर्षे त्या रेडिओवरून गायल्या. पूर्वी त्या मुख्यत: मुंबई केंद्रावरून गात असत. […]

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ.बाबासाहेब म्हणजे अष्टपैलू व्यक्तीमत्व होते. त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान व माहिती होती. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीन, दलितांच्या, श्रमिकांच्या विस्थापितांच्या, शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला. […]

पंडित जितेंद्र अभिषेकी

पंडितजी संस्कृत भाषेचे पदवीधर होते ते काही काळ आकाशवाणीवर होते. जेव्हा अनेक संगीतकार , वादक यांच्याशी त्यांचा परिचय झाला तेव्हा त्यांनी अनके ठिकाणी आकाशवाणीवर आणि अनके ठिकाणी कार्यक्रम केले. पुढे त्यांना भारत सरकारने आझम हुसेन खान शिष्यवृती दिली. […]

सुप्रसिद्ध समीक्षक श्री.के.क्षीरसागर

श्रीकेक्षी यांनी अनेक जणांशी वाङ्‌मयीन वाद केले. ती एकप्रकारे वाङ्‌मय चळवळ ठरली होती. ‘ श्रीकेक्षी : एक वाङ्‌मयीन लेखसंग्रह ‘ ह्या पुस्तकांमध्ये त्यांनी केलेलं अनेक वाङ्‌मयीन वाद वाचावयास मिळतात. जे. कृष्णमूर्ती यांच्या विचारांबद्दल त्यांची वेगळी मते होती . परंतु दोघे एकत्र आल्यावर झालेला ‘ निशब्द संवाद ‘ पुणेकरांना माहित आहे. […]

प्रसिद्ध गणितज्ज्ञ उमर खय्याम

एकीकडे गणितासारखा विषय हाताळणारे उमर खय्याम हे कवी म्हणून देखील परिचित होते. आपल्या जीवन काळात त्यांनी जवळपास हजारहून देखील जास्त रुबायत व श्लोक तयार केले आहेत. […]

1 106 107 108 109 110 392
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..