नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

अमर चित्रकथाकार अंकल पै

पहिल्या भारतीय कॉमिक चित्रमालिकेचे निर्माते ही अंकल पै म्हणजेच अनंत पै यांची प्रमुख ओळख. ही कॉमिक चित्र मालिका अमर चित्र कथा या नावाने जगप्रसिद्ध आहे. वयाच्या बाराव्या वर्षी ते मुंबईत आले, तसा त्यांचा जन्म कर्नाटकातील करकाला गावचा. वयाच्या दुसऱ्या वर्षीच त्यांचे आई वडिल वारले. त्यानंतर त्यांनी मुंबईचा रस्ता धरला. […]

खासदार छत्रपती  उदयनराजे भोसले

उदयनराजे भोसले यांचे शिक्षण पाचगणी येथे झाले. त्यांनी प्रॉडक्शन मेकॅनिकल इंजिनियरिंग पदवी घेतली आहे. १९९० पासून राजकारणात सक्रीय असलेल्या उदयनराजे यांनी सर्वप्रथम १९९१ मध्ये उगवता सूर्य या चिन्हावर रयत पॅनेलवर सातारा नपा निवडणूक लढवली होती. तत्कालिन १४ क्रमांकाच्या प्रभातून ते विजयी झाले. १९९६-९७ मध्ये विधानसभेची जागा त्यांनी भाजपच्या चिन्हावर लढवली. […]

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री  मनोहर जोशी

शिवसेनेच्या इतिहासात मा.बाळासाहेबांप्रमाणेच मनोहर जोशी यांचे स्वतंत्र स्थान होते. शिवसेनेची स्थापना जून १९६६ मध्ये झाली. १९६७ एप्रिलमध्ये मनोहर जोशी यांनी पक्षसंघटनेत प्रवेश केला. तेंव्हापासून आजपर्यंत ५० वर्षांपेक्षा अधिक काळ शिवसेनेतील चढऊतारांचे ते प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते. नगरसेवक, महापौर, आमदार, विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री ते केंद्रात मंत्री आणि लोकसभेचे अध्यक्ष असा त्यांचा प्रवास आहे. […]

आय पी एस अशोक कामटे

अशोक कामटे यांचे नाव ऐकताच भल्याभल्या गुन्हेगारांना घाम फुटायचा. पैलवानांना ते फडात चित करायचे. कामटे हे पुण्यातल्या जांभळीचे. त्यांचे शिक्षण राजकोटच्या राजकुमार कॉलेजमध्ये झाले. पुढे पाच वर्षांसाठी ते कोडाई कॅनाल आंतराष्ट्रीय प्रशालेत होते. त्यांना कॅम्प रायझिंग सनमधून आंतराष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली. […]

डेलचे संस्थापक अध्यक्ष मायकल डेल

जे जन्मापासूनच वेगवान असतात त्यांची क्षमता इतरांपेक्षा कित्येक पटींनी जास्त असते. बरोबरीच्या लोकांना मागे टाकून ते कमी वयात यशाचे शिखर गाठतात. फॉर्च्युन ५०० कंपनी डेलचे संस्थापक अध्यक्ष मायकल डेल हे अशांपैकीच एक. […]

भारतीय जादूगार पी सी सरकार

पी. सी. सरकार यांचे पूर्ण नाव प्रतुलचंद्र सरकार. त्यांचा जन्म तत्कालीन बंगाल प्रांतातील (विद्यमान बांगला देश) तंगईल जिल्ह्यातील आशीकपूर या गावी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. गावातीलच शिवनाथ हायस्कूलमध्ये शिकत असतानाच जादूबद्दल त्यांच्या मनात विलक्षण आकर्षण निर्माण झाले आणि त्यांनी गणपती चक्रवर्ती यांच्याकडून जादूविदयेचे धडे घेण्यास प्रारंभ केला; तथापि शालेय अभ्यासाकडेही दुर्लक्ष केले नाही. […]

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पुतणे  विक्रम सावरकर

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कट्टर अनुयायी, सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे संस्थापक, हिंदूमहासभेचे ज्येष्ठ नेते, ‘प्रज्वलंत’चे संपादक अशी विक्रम सावरकर यांची ओळख होती. […]

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शिक्षणतज्ज्ञ जे पी नाईक

जे पी नाईक यांनी वंचितांच्या शिक्षणाच्या समस्यांसाठी त्यांनी आपले आयुष्य खर्च केले. जे पी नाईक यांचे पूर्ण नाव ‘विठ्ठल हरि घोटगे! असहकार चळवळीत १९३० मध्ये भूमिगत असताना त्यांनी आपले नाव बदलले व ते जयंत पांडुरंग नाईक झाले. पुढे त्याच नावाने ते ओळखले जाऊ लागले. जे पी नाईक यांनी महात्मा फुलेंची परंपरा पुढे चालवून वंचितांच्या शिक्षणाच्या समस्यांसाठी आयुष्य खर्च केले. […]

मराठी उद्योजक रावसाहेब गोगटे

गोगटे कुटुंब मूळचे बेळगावचे. रावसाहेब गोगटे यांचे वडील त्या काळातील एल.एम.अँड एस. डॉक्टर होते. गंमत म्हणजे बुद्धिवान असणाऱ्या रावसाहेबांच्या वडिलांनी आपली डॉक्टरकी सोडून एक पिठाची गिरणी सुरू केली. हे फारच थोड्या लोकांना माहीत असेल. आजही ती गिरणी छोट्या स्वरूपात चालू आहे. […]

डग्लस माँच

बॅटमॅन, कॉनन दी बारबॅरिअन आणि जेम्स बाँडसारख्या लोकप्रिय व्यक्तिरेखा कॉमिक्सच्या माध्यमातुन प्रसिध्द करणारे डग्लस माँच यांचा जन्म. २३ फेब्रुवारी १९४८ रोजी शिकागो येथे झाला. डग्लस माँच हे प्रामुख्याने ओळखले जातात, ते त्यांनी लिहिलेल्या ‘बॅटमॅन’च्या कथांबद्दल! ‘बॅटमॅन’ व्यतिरिक्त, मून नाइट हा सुपरहिरो, ब्लॅक मास्क हा सुपरव्हिलन, डेथलॉकसारखा सायबॉर्ग, इलेक्ट्रिक वॉरिअर हा रोबॉट, सिक्स फ्रॉम सीरिअस हे विश्वातल्या […]

1 9 10 11 12 13 392
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..