नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

भारतातील बलवान राजकारणी इंदिरा गांधी

आपली विदेशी खेळणी, कपडे त्यांनी विदेशी कपड्यांच्या होळीत टाकून दिले. वयाच्या तेराव्या वर्षी म्हणजे १९३० साली त्यांनी आपल्या सवंगड्यांची वानरसेना स्थापन करून नेत्यांचे संदेश पोचवण्याचे काम केले. ब्रिटिशां विरुद्ध मिरवणुका काढल्या, घोषणा दिल्या, या सर्व गोष्टीबरोबर शिक्षणही चालूच ठेवले. […]

अमेरिका खंड शोधणारा ख्रिस्तोफर कोलंबस

कोलंबसने आपल्या चार मोहिमांमधून शोधून काढलेली भूमी हा काही भारतीय प्रदेश नाही हे पहिल्या मोहिमेतच त्याच्या लक्षात आले. पुढे या खंडाचे नाव अमेरिका असे झाले. […]

भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल

स्वतंत्र भारताचा राज्य कारभार पाहण्यासाठी पंतप्रधान पं. नेहरू यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ अधिकारावर आले. या मंत्रिमंडळात सरदार वल्लभभाई पटेल उपपंतप्रधान झाले. त्यांच्याकडे गृहखाते, माहिती व नभोवाणी खाते, संस्थानांचा प्रश्न व निर्वासितांचे पुनर्वसन इ. खात्यांची जबाबदारी होती. सरदार पटेल यांनी तत्कालीन ५६५ संस्थानांचे स्वतंत्र भारतात विलीनीकरण करून एकसंध भारत निर्माण केला. […]

साहित्यिक भाऊ पाध्ये

पाध्येंनी मुंबईचे उघडे नागडे विश्व जसे आहे तसे मांडले. कुठलाही निष्कर्ष काढण्याच्या भानगडीत ते पडले नाही. त्यांनी आपल्या उभ्या आयुष्यात मुंबईत व एकंदरीत शहराच्या आरशात पाहिलेले, अनुभवलेले, मनावर कोरले गेलेले प्रसंग, घटना कादंबरीत अभिव्यक्त केल्या आहेत. […]

अणुभौतिकशास्त्रज्ञ होमी भाभा

अणुचा वापर शांततेच्या मार्गानेच व्हावा असे ठाम मत संयुक्त राष्ट्रच्या सभेत मांडणारे भाभा हे पहिले वैज्ञानिक. डॉ. भाभा यांनी पाया रचला म्हणूनच भारताने अनेक ठिकाणी अणु भट्या सुरू करून त्यांचा विज निर्मितीसाठी उपयोग केला तसेच १८ मे १९७४ रोजी भारताने पोखरण येथे पहिला अणुस्फोट घडवून आणला. […]

आधुनिक जागतिक विचाराचे राजकारणी प्रमोद व्यंकटेश महाजन

पत्रकार, शिक्षक ते राष्ट्रीय राजकारण अशा पायऱ्या चढत गेलेल्या महाजनांच्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्रात १९९५ मध्ये प्रथमच बिगर काँग्रेसी सरकार स्थापन झाले. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत असलेल्या मैत्रीमुळे सेना-भाजप युती त्यांनी घडविली. […]

मायक्रोसॉफ्टचे जनक बिल गेट्‌स

बिल गेटस्‌नी १९९३ मध्ये “विंडोज ३.१‘ बाजारात आणले. त्याची महिनाभरात लाखोंवर विक्री झाली. १९९५ मध्ये मायक्रोसॉफ्ट ऑफिस, फ्रंट पेज, इंटरनेट एक्सआपोजर यांची निर्मिती बिलच्या कंपनीने केली. […]

जुडोचे संस्थापक जिगोरो कानो

पुढे जाऊन त्यांनी शिकलेल्या अनेक कलांचे मिश्रण करून जुडो ह्या शाखेची सुरवात केली. पुढे जुडो ही कला शारीरिक, मानसिक आणि नैतिक अध्यापनासाठी जपानमध्ये उदयास आली. […]

प्रसिध्द प्राच्य विद्यापंडीत मॅक्सम्युल्लर

’एन्शन्ट संस्कृत लिटरेचर’, ’लेक्चर्स ऑन दी सायन्स ऑफ लॅग्वेज’, ’इंन्ट्रोडक्शन टू सायन्स ऑफ रिलिजन’, ’बायोग्राफिज ऑफ वर्डस’, ’सिक्स सिस्टिम्स ऑफ इंडियन फिलॉसॉफी’ हे त्यांनी लिहिलेले काही प्रमुख ग्रंथ होत. […]

1 116 117 118 119 120 392
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..