नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

ज्योतिषी शरद उपाध्ये

त्यांचे ज्योतिषविषयक ‘राशीचक्र’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे. या पुस्तकात त्यांनी १२ राशी व त्यांचे स्वभाव गुणवर्णन केले आहे. याच विषयावर आधारीत ते राशीचक्र व राशीरंजन हे एकपात्री कथाकथनाचे प्रयोग करतात. […]

अमर चित्रकथाकार अंकल पै

त्यावेळी दूरदर्शनच्या एका लोकप्रिय क्वीज कार्यक्रमात ग्रीक पुराणांवर आधारित प्रश्न विचारले जात. मात्र भारतीय पुराणांचा या प्रश्नावलीत समावेशच केला जायचा नाही,कारण त्याविषयी कुणाला माहितीच नसायची. त्यांना या घटनेनं अस्वस्थ केलं आणि मग जन्म झाला अमर चित्र कथेचा.जी.आर. मीरचंदानी यांच्या इंडिया बुक हाऊस या प्रकाशन संस्थेच्या मदतीने त्यांनी अमर चित्र कथा सुरू केली. […]

ज्येष्ठ कवी वसंत बापट

बापट हे केशवसुतांच्या मालिकेतील कवी होते. देशात घडणार्या घटनांची दखल घेऊन मत मांडले पाहिजे असे मानणारे ते कवि होते. […]

लेखक रवींद्र सदाशिव भट

त्यांनी १९६८-८० या कालावधीत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर नोकरी केली. १४ वर्षे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह काम केले. त्यांना राष्ट्रपती पुरस्कार, मसाप पुरस्कार, चेतना ट्रस्टचा पुरस्कार, दर्पण, पुणे विद्यापीठाचा आणि ना.ह.आपटे स्मृती पुरस्कार मिळाले होते. […]

ज्येष्ठ अभिनेत्री इंदिरा चिटणीस

आपल्याच तोऱ्यात मिरवणारी खाष्ट सासू आठवली की इंदिरा चिटणीस यांचा ठसका आपल्या मनात उभा राहतो. नऊवारी साडी, अस्ताव्यस्त सुटलेले केस, ठेंगणी-ठुसकी अंगकाठी आणि अचूक संवादफेक यामुळे इंदिरा चिटणीस यांच्या अनेक व्यक्तिरेखा मराठी चित्रपटातून चांगल्याच उठून दिसल्या. […]

पंतप्रधान नरेंद्र मोदी

लहानपणापासूनच त्यांच्यावर औदार्य, शौर्य आणि समाजसेवेचे संस्कार झाले. भारत-पाकिस्तान युद्धाच्या काळात, अगदी तरुण वयाचे असताना त्यांनी रेल्वे स्टेशनवर जाणाऱ्या -येणाऱ्या जखमी जवानांची शुश्रुषा केली होती. १९६७ साली गुजरातमध्ये पुराने थैमान घातले होते. […]

पत्रकार प्रबोधनकार ठाकरे

प्रबोधनकार सदैव नव्या पिढीबरोबर वाटचाल करीत राहिले याचे कारण ते स्वत: अखेरपर्यंत वृत्तीने ताजे-टवटवीत नि तरुण होते. प्रबोधनकारांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात जे कर्तृत्व गाजवले ते मोलाचे. […]

गायिका कृष्णा कल्ले

कृष्णा कल्ले यांना १९५८ साली झालेल्या सैगल मेमोरिअलतर्फे होणाऱ्या गायनस्पर्धेत पहिले पारितोषिक आणि गोल्डन व्हॉइस ऑफ इंडिया ‘ हा मानाचा ‘ किताब मिळाला. कानपूरमध्ये शिक्षण पूर्ण करून त्या लग्नानंतर १९८५ साली मुंबईला आल्या. […]

अभिनेते मामा पेंडसे

राक्षसी महत्वाकांक्षा ‘ ह्या नाटकासाठी गोव्यात मुद्दाम दत्तोबा भोसले यांना आणले. ते केशवराव भोसले यांचे बंधू होते. त्यावेळी ‘ कंदन ‘ ची भूमिका मामांना आयत्या वेळी करावी लागली. मामांचे काम पाहून दत्तोबा भोसले इतके खूष झाले की त्यांनी मामांना आनंदाने खांद्यावर घेऊन रंगपटात नेले . […]

राजे मालोजीराजे नाईक निंबाळकर

मालोजीराजे कोल्हापुरात शिकत असताना त्यांनी कोल्हापूर संस्थानातील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा पुरोगामी सुधारणांचा कारभार पहिला होता. समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेतील शिक्षणाचे महत्त्व त्यांनी जाणले होते. […]

1 126 127 128 129 130 392
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..