माधव मनोहर वृत्तीने स्थितप्रज्ञ होते. त्यामुळे टीका आणि स्तुती दोनही त्यांना समान असे. कोणी त्यांच्यावर वैयक्तिक टीका केली आणि तीही शब्दांच्या माध्यमातून, तरी ते त्याला लेखणीने प्रत्युत्तर देत असत. त्यांची लेखणी इतकी परखडपणे बोलत असे त्यांना कधी काही बोलावेच लागले नाही. […]
त्यांच्या अश्रूंची झाली फुले गाजलेल्या नाटकवरून हिंदीमध्ये ‘ आसू बन गये फूल ‘ हा चित्रपट प्रदर्शित झाला त्यात अशोककुमार, निरुपा रॉय , प्राण आणि देब मुखर्जी यांनी काम केले होते. त्या चित्रपटाच्या कथेसाठी वसंत कानेटकर याना फिल्मफेअर अवॉर्डही मिळाले होते. […]
हिंदी सिनेमाच्या ग्लॅमरस दुनियेत कारकीर्द घालवूनही शशी कपूर यांचं मन घुटमळत राहिलं ते पृथ्वी थिएटरपाशी. काही वर्षांपूर्वी पं. सत्यदेव दुबे यांना मानवंदना म्हणून पृथ्वी थिएटरने महोत्सव आयोजित केला होता, तेव्हा शशी कपूर व्हीलचेअरवर बसून पृथ्वी थिएटरमध्ये आले होते एका कोपऱ्यात शांतपणे बसून नाटकवाल्यांचा चाललेला जल्लोष शांतपणे निरखत होते आणि स्मितहास्य करत होते. […]
मनोज जोशी यांनी ‘चाणक्य’ हे नाटक लिहायला १९८६पासून केली. चार वर्षे संशोधन, लेखन, भूमिकांची निवड वगैरे करून हे नाटक रंगभूमीवर आले. चाणक्याची मुख्य भूमिका मनोज जोशींनी केली आहे. […]
संगीतकार म्ह्णून त्यांची कामगिरी महत्वाची म्हणावी लागेल कारण त्यांनी मराठी,कन्नड,हिंदी आणि इंग्रजी या भाषांमधील अनेक नाटकांना संगीत दिले. १९७२ मध्ये त्यांनी ‘ घाशीराम कोतवाल ‘ या नाटकाला संगीत दिले त्याप्रकारच्या संगीताचा वापर आजही मराठी रंगभूमीवर केला जात आहे. […]
विंदाचे पहिले काव्यवाचन आचार्य भागवत यांच्याकडे झाले. इ.स. १९४९ साली पुण्यात भरलेल्या मराठी साहित्य संमेलनातील पहिल्या जाहीर काव्यवाचनाने त्यांचा मराठीभाषकांस परिचय झाला. […]
आकाशवाणीने या श्रेष्ठ संगीतकाराच्या प्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध करून दिले. “निळा सावळा नाथ’, “कळीदार कपुरी पान’, “सहज सख्या एकटाच’ ही गाणी आकाशवाणीवरून लोकप्रिय झाली आणि “शुक्रतारा मंदवारा’ या गीताने तर लोकप्रियतेचा कळस गाठला. […]
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातदेखील छोटा गंधर्वांनी मोलाची कामगिरी केली. गुनरंग ह्या नावाने त्यांनी रचलेल्या बंदिशी आणि नंदकिशोर, बसंतीकोश, नंदबसंत, बसंतीशंकरा, गुणिकंस ह्या नवीन रागांची निर्मिती ही त्यांच्या योगदानाची उदाहरणे आहेत . […]