नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर

जेष्ठ पत्रकार, स्तंभलेखक, मानवाधिकार कार्यकर्ता, लेखक अशी ओळख असलेल्या कुलदीप नय्यर यांनी देशातल्या नामवंत वृत्तपत्रांसाठी लेखन केले होते. त्यांचा जन्म १४ ऑगस्ट १९२३ रोजी पंजाब प्रांतातील सियालकोटमध्ये झाला. लाहोरच्या ख्रिश्चन कॉलेजमध्ये पदवीपर्यंतचं शिक्षण आणि नंतर तेथील लॉ कॉलेजमधून त्यांनी एल.एल.बी.पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. वकिलीचे शिक्षण घेऊन भारतात परतलेले नय्यर यांनी क्लार्क न होण्याचा निश्चय केल्यामुळे त्यांना […]

भारतासाठी पहिले ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खाशाबा जाधव

जगातील सर्वोत्तम ऑलिम्पिक क्रीडा कुंभमेळ्यात भारताकरिता पहिले ऐतिहासिक वैयक्तिक पदक जिंकण्याचा पराक्रम कराडच्या खाशाबा दादासाहेब जाधव यांनी १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये केला होता. त्यांचा जन्म १५ जानेवारी १९२६ रोजी झाला. महत्त्वाचे म्हणजे खाशाबाच्या पदकानंतर तब्बल ४४ वर्षे आपली वैयक्तिक पदकांची पाटी कोरी होती. कुस्तीतही पाच दशकांनंतर दुसरे पदक आले. फिनलंड देशाच्या राजधानीतील १५ व्या हेलसिंकी ऑलिम्पिक स्पर्धेत […]

भारताचा खेळाडू प्रवीण अमरे

प्रवीण आम्रे हे १९९१ ते १९९४ भारतीय क्रिकेट संघाकडून खेळले. त्यांचा जन्म १४ ऑगस्ट १९६८ रोजी झाला. सचिन तेंडुलकर, विनोद कांबळीप्रमाणेच रमाकांत आचरेकरांचा शिष्य असलेल्या अमरेंची कारकीर्द फार मोठी ठरली नाही. ११ कसोटीत एका शतकासह ४२५ धावा त्यांनी केल्या. ३७ वनडे खेळताना मात्र प्रवीण अमरे यांना शतक ठोकता आले नाही. आय.पी.एल.मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचे प्रशिक्षक म्हणून […]

बिस्मिलाह खासाहेब

त्यांचे वडील राजदरबारी सनईवादक होते. वयाच्या सहाव्या वर्षी ते वाराणसीमध्ये आले. त्यानंतर तेथे वयाच्या सहाव्या वर्षापासून त्यानी आपले काका ‘ अली बक्श ‘ यांच्याकडे सुरु केले. अत्यंत कठोर परिश्रम ते करत असत याचा आपण सामान्य माणूस विचारही करू शकणार नाही. […]

लेखक ना.सी. फडके

ना.सी. फडक्यांच्या कथा तंत्रशुद्धता, रेखीवपणा व डौलदार भाषा या त्रिगुणांनी नटलेल्या आहेत. आकर्षक प्रारंभ, कथेच्या मध्ये गुंतागुंत, अंती उकल आणि मग शेवट असे त्यांच्या लेखनाचे ठरावीक तंत्र आहे. […]

बालकवी ठोंबरे

बालकवींच्या फ़ुलराणी, संध्यारजनी, तारकांचे गाणे, अरुण, आनंदी-आनंद, निर्झरास, श्रावणमास यांसारख्या कवितांनी मराठी काव्यरसिकांस संमोहित केले आहे. बालकवींच्या एकूण कवितेमध्ये उदासीनता व्यक्त करणाऱ्या बारा-तेरा तरी कविता आहेत. […]

महान दिग्दर्शक सर आल्फ्रेड हिचकॉक

थ्रिलर चित्रपटांच्या दुनियेत हिचकॉकचंच नाव प्रामुख्यानं घेतलं जातं. त्यानं नामवंत कलाकार चित्रपटात वापरले तसंच कित्येक अज्ञात कलाकारांना नामवंत केलं, अनेक वेचक आणि प्रसिद्ध स्थळं चित्रीकरणासाठी वापरली आणि कॅमेरा हवा तसा फिरवला. […]

प्रल्हाद केशव अत्रे ऊर्फ आचार्य अत्रे

साष्टांग नमस्कार हे त्यांचे विनोदी नाटक त्यांच्या नाट्यलेखनाची सुरुवात होती. तोवर ते विनोदी वक्ते म्हणून गाजलेले होतेच, त्यात या नाटकाचीही भर. हे नाटक खूप गाजले. त्यानंतर घराबाहेर हे गंभीर विषयावर आधारित नाटक लिहून अत्र्यांनी सर्वांना थक्क करून सोडले. […]

ज्येष्ठ अभिनेते, निर्माता-दिग्दर्शक गजानन जागीरदार

“स्वामी” या दूरदर्शन मालिकेचं जहागीरदार यांनी दिग्दर्शन केले होते तसंच दादासाहेब फाळके यांचे कर्तृत्व रेखाटणारा चित्रपट “ड्रीम्स स्केस विंग्ज”चे गजानन जहागीरदार यांनी दिग्दर्शन केले होते. […]

1 135 136 137 138 139 392
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..