नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

बहुरंगी व्यक्तिमत्व कृष्णा कोंडके ऊर्फ दादा कोंडके

दादा कोंडके यांचे चित्रपट म्हटलं की विनोद आणि त्यातल्या त्यात द्विअर्थी विनोदच आठवतो. त्यांचा जन्म ८ ऑगस्ट १९३२ रोजी मुंबईतील नायगाव येथे झाला. द्विअर्थी शब्द आणि संवाद ही दादांच्या चित्रपटांची खासियत होती. ‘विच्छा माझी पुरी करा’ या वसंत सबनीस लिखित वगनाट्यामुळं दादांना जास्त ओळख मिळाली. ‘विच्छा माझी’ मुळे भालजी पेंढारकर यांनी त्यांना आपल्या ‘तांबडी माती’ या चित्रपटात […]

विकिपीडिया चे सहसंस्थापक व प्रमुख जिमी वेल्स

आज इंटरनेटवरील सर्वात महत्त्वाची संकेतस्थळे कोणती, असे जागतिक सर्वेक्षण कोणी केलेच, तर त्यात विकिपीडियाचे नाव नक्कीच पहिल्या दहा संकेतस्थळांत असेल. त्यांचा जन्म ७ ऑगस्ट १९६६ रोजी अलाबामा राज्यातील हंट्सव्हिल येथे झाला. जिमी वेल्स हे मूळचे अमेरिकन. त्यांचे वडील एका वाणसामानाच्या दुकानाचे व्यवस्थापक होते. एका खासगी शाळेत ते शिकले. तेथेच त्यांना विश्वकोश वाचण्याचा छंद जडला. विकिपीडिया निर्मितीची प्रेरणा […]

भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल

ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार आणि सर्वोत्तम फलंदाज व भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांचा जन्म ७ ऑगस्ट १९४८ रोजी झाला. ग्रेग चॅपेल हे ऑस्ट्रेलियाच्या महान फलंदाजांपैकी एक आहेत. ग्रेग चॅपेल यांनी १९७० साली पर्थ येथे ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंड या सामन्याने कसोटीत पदार्पण केले. व १९७१ साली वन डे मध्ये पदार्पण केले. ४८ कसोटीत त्यांनी ऑस्ट्रेलियन संघाच्या कर्णधाराची […]

जगातील पहिली व सर्वात चलाख महिला हेर माता हारी

जगातील पहिली व सर्वात चलाख महिला हेर माता हारी यांचा जन्म ७ ऑगस्ट १८७६ रोजीनेदरलँडमधील लियुवर्डेन या छोट्या गावी झाला. गुप्तहेरांच्या विश्वामध्ये नेहमीच पुरुषांचे नाव पहिले घेतले जाते. म्हणजे बहुतेकांना केवळ असेच वाटत असेल की गुप्तहेरी फक्त पुरुषच करायचे, स्त्रिया नाही, असा समज असले तर तो एक गैरसमजच म्हणावा लागेल, कारण स्त्री हेरांनी देखील गुप्तहेर जगात अगदी निनादून […]

हरित क्रांतीचे जनक एमएस. स्वामीनाथन

भारतीय गरीब शेतकऱ्याच्या शेतात गव्हाचे व तांदळाचे उच्च उत्पन्न देणारे वाण पेरून हरितक्रांती घडवून आणण्याचे श्रेय स्वामीनाथन यांनाच जाते. त्यांचा जन्म ७ ऑगस्ट १९२५ रोजी तामिळनाडूमधील कुंभकोणम येथे झाला. त्यांच्या प्रयत्नांमुळेच गहू व तांदूळ यांच्या उत्पादनांत भारत स्वयंपूर्ण होऊ शकला. भारतासारख्या कृषिप्रधान देशात कृषी क्षेत्रातील संशोधनासाठी त्यांनी ‘एम.एस.स्वामीनाथन रिसर्च फाऊंडेशन’ची स्थापना केली आहे. एम. एस. स्वामीनाथन […]

जॉन वुडकॉक

एखाद्या क्रिकेट, टेनिस किंवा फुटबॉल सामन्याच्या अखेरीस बातमी पाठवण्यापूर्वी संबंधित क्रीडा पत्रकारांनी एकत्रित येऊन बारकावे निसटणार नाहीत ना, याची खातरजमा करून घेणे तसे नित्याचेच. या नियमाला एक खणखणीत अपवाद- जॉन वुडकॉक! ‘द टाइम्स’साठी त्यांनी १९५४ ते १९८७ असा प्रदीर्घ काळ प्रामुख्याने क्रिकेट सामन्यांचे वृत्तांकन केले. कसोटी वा कोणत्याही क्रिकेट सामन्यात वार्ताहर कक्षात किंवा काही वेळा छायाचित्रकारांसमवेत […]

पतियाळा घराण्याचे गायक सुरेश वाडकर

सुरेश वाडकर यांना लहानपणापासूनच त्यांना गाण्याची आवड होती. त्यांचा जन्म ७ ऑगस्ट १९५५ रोजी झाला. त्यांनी वयाच्या आठव्या वर्षापासून त्याने जियालाल वसंत यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली, तसेच ‘पतियाळा’ घराण्याची तालीम घेतली. त्यांनी पार्श्वनाथ डिग्रजकर यांच्याकडून ही प्राथमिक गायनाचे शिक्षण व सदाशिव पवार यांच्याकडून तबल्याचे प्राथमिक शिक्षण घेतले. १९७६ साली सूर-सिंगार नावाच्या संगीत स्पर्धेत सुरेश […]

संगीतकार रवींद्रनाथ टागोर

ब्राह्मो पंथीय, चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी, संगीतकार रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म ७ मे १८६१ रोजी झाला. रवींद्रनाथ टागोर यांना गुरुदेव असे ही संबोधले जाते, १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात व २०व्या शतकाच्या प्रारंभी रवींद्रनाथाच्या कार्यामुळे बंगाली साहित्यात व बंगाली संगितात एक आमूलाग्र बदल घडून आला. रवींद्रनाथ हे भारताचे व आशियाचे पहिले नोबेल विजेते होत. बंगाली साहित्याची रवींद्रपूर्व […]

भेंडीबाजार घराण्याच्या सुप्रसिध्द गायिका अंजनीबाई मालपेकर

अंजनीबाई मालपेकर भेंडीबाजार घराण्याच्या सुप्रसिध्द गायिका होत्या. त्यांचा जन्म २२ एप्रिल १८८३ रोजी झाला. अंजनीबाई मालपेकर यांनी नजीरखाँ व खादिमा, हुसेनखाँ या तीन भावांच्या कडून संगीताचे शिक्षण घेतले. राग `यमन’ हा भेंडीबाजार घराण्याच्या उस्ताद नजीरखाँनी अंजनीबाईंना शिकवलेला पहिला राग. त्याची तालीम साडेतीन वर्ष चालली होती. अंजनीबाईंचा `मध्यम’ स्वर एखाद्या ज्योतीसारखा कसा प्रज्वलित व्हायचा याचं वर्णन खुद्द […]

मुंबई दूरदर्शनवरील एक इंग्रजी वृत्तनिवेदिका लुकू सन्याल

लुकू सन्याल यांचे व्यक्तिमत्व, ‘दूरदर्शन’च्या छोटय़ा पडद्यापेक्षा मोठे होते. कोलकोता येथील न्यू थिएटर्सचे गायक व बंगाली अभिनेते पहाडी सन्याल यांच्या त्या कन्या. घरात नाटक सिनेमाचे वातावरण असल्याने, अगदी वयाच्या १३ व्या वर्षीपासूनच कोलकाता आकाशवाणीवरील नभोनाटय़ांमध्ये त्या आवाज देऊ लागल्या. इंग्रजी विषय घेऊन बी.ए आणि एम.ए या पदव्या मिळवत असताना साक्षात् सत्यजित राय यांनी एका चित्रपटात (देबी) […]

1 140 141 142 143 144 392
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..