हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वोत्कृष्ट विनोद वीरांमध्ये केश्टो मुखर्जी यांचे नाव येते. त्यांचा जन्म ७ ऑगस्ट १९०५ रोजी झाला.बहुतेक चित्रपटांमध्ये केश्टो मुखर्जी यांनी मद्यपीची भूमिका साकारली होती, परंतु आपल्या जीवनात त्यांना कसलेही व्यसन नव्हते. केश्टो मुखर्जी व ऋत्विक घटक यांची मैत्री होती. ऋत्विक घटक यांच्या अनेक लहान, पण महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. केश्टो मुखर्जी यांनी हृषिकेश मुखर्जी यांच्या […]
कपाळावरील मोठी लाल टिकली, भांगामध्ये सिंदूर, मोठ्या काठांची कॉटनची साडी आणि चेहऱ्यावर स्मित हास्य ही सुषमा स्वराज यांची ओळख १९७७ पासुनच निर्माण झाली. आपल्या वक्तृवानं सुषमा भाजपचा आवाज संसदेत आणि संसदेबाहेर पोहोचला. भारतीय जनता पक्षातील एक धगधगतं व्यक्तीमत्त्व व माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचा जन्म १४ फेब्रुवारी १९५२ रोजी सियालकोट पंजाब येथे झाला. सुषमा स्वराज यांचे […]
‘वॉटर मॅन ऑफ इंडिया’ म्हणून प्रेमादराने गौरवले जाणारे भारतातल्या जलसंवर्धन चळवळीतले अग्रणी डॉ. राजेंद्रसिंह यांचा जन्म ६ ऑगस्ट १९५९ रोजी बागपतमध्ये (उत्तर प्रदेश) येथे झाला. डॉ. राजेंद्रसिंह हे ‘वॉटर मॅन ऑफ इंडिया’ म्हणून प्रेमादराने गौरवले जाणारे भारतातल्या जलसंवर्धन चळवळीतले अग्रणी आहेत. १९७५मध्ये त्यांनी स्थापन केलेल्या ‘तरुण भारत संघ’ या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी जलसंवर्धनाचं खूप मोठं कार्य उभारलं […]
मराठीतले विज्ञानकथा लेखक लक्ष्मण लोंढे यांचा जन्म १९४५ रोजी झाला. बँकेत नोकरी करणाऱ्या लक्षण लोंढे यांनी वयाच्या ५०व्या वर्षी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि त्यांनी त्यानंत आपला पूर्ण वेळ विज्ञान कथा लेखनात घालविला. दुसरा आइन्स्टाइन ही त्यांची कथा इंग्रजीत ‘सायन्स टुडे’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाली. पुढे या कथेला कन्सास विद्यापीठाचा जागतिक सर्वोत्कृष्ट कथा म्हणून पुरस्कार मिळाला. तसेच कथेची निवड जगातील […]
मराठी चित्रपट, नाट्य आणि दूरचित्रवाणी अभिनेत्री व वृत्तनिवेदिका, निर्मात्या आणि दिग्दर्शक स्मिता तळवलकर यांचा जन्म ५ सप्टेंबर १९५५ रोजी झाला. स्मिता तळवलकर या माहेरच्या स्मिता गोविलकर. स्मिता तळवलकर यांचे शालेय शिक्षण पुण्याच्या हुजुरपागा शाळेत झाले. तत्त्वज्ञान, मानसशास्त्र हे विषय घेऊन बी. ए. झाल्यावर स्मिता तळवलकर यांनी मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझमही केले होते. त्यांनी १९७२ साली मुंबई दूरदर्शनवरून […]
जागतिक कीर्तीचे चित्रपट-कलादिग्दर्शक, चित्रपटदिग्दर्शक व निर्माता नितिन चंद्रकांत देसाई यांचा जन्म ६ ऑगस्ट १९६५ रोजी झाला. नितिन चंद्रकांत देसाई यांनी अनेक हिंदी, मराठी चित्रपटांसाठी कलादिग्दर्शन केले आहे. चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्याआधी नितिन देसाई यांनी मुंबईतल्या सर जे.जे. कला विद्यालयातून प्रकाशचित्रणाचे प्रशिक्षण घेतले.१९८७ सालापासून त्यांची चित्रपट कारकीर्द सुरू झाली. प्रतिभा, प्रयत्न आणि प्रज्ञा या त्रयीच्या जोरावर आपले अढळ स्थान […]
गेल्या शतकातली अमेरिकेची अत्यंत लोकप्रिय कॉमेडी स्टार ल्युसिल बॉलचा जन्म ६ ऑगस्ट १९११ रोजी न्यूयॉर्क येथे झाला. सुरुवातीची काही वर्षं रंगभूमीवर धडपड केल्यानंतर ल्युसिल बॉलला रोमन स्कॅन्डल्स, ब्लड मनी, किड मिलियन्स असे चित्रपट मिळाले. १९४० सालच्या ‘टू मेनी गर्ल्स’मध्ये ती डेझी आर्नेझबरोबर चमकली आणि त्यांनी लग्नही केलं. ऑक्टोबर १९५१ पासून पुढची सहा वर्षं त्यांची ‘आय लव्ह ल्युसी’ […]