नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

सेन्सॉर बोर्डच्या माजी अध्यक्षा आणि ज्येष्ठ लेखिका अपर्णा मोहिले

केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा आणि ज्येष्ठ लेखिका अपर्णा मोहिले यांचा जन्म ६ ऑगस्ट रोजी झाला. अपर्णा मोहिले हे सुपरिचित नाव आहे. मॅट्रिकला बोर्डामध्ये मुलींमधून पहिल्या आलेल्या ह्या हुशार विद्यार्थीनीने पुढे बी.ए., एम.ए. परीक्षांमध्येही चांगले यश मिळवले. अपर्णा मोहिले या १९६५ बॅचच्या भारतीय प्रशासन सेवेच्या अधिकारी बनल्या.त्यांची पहिली निवड इंडीयन पोस्टल सर्व्हीस मध्ये झाली. अशा […]

प्रसिद्ध बासरीवादक, संगीतज्ञ, जाहिरातलेखक अजित सोमण

प्रसिद्ध बासरीवादक, संगीतज्ञ, संहितालेखक, जाहिरातलेखक आणि इंग्रजी भाषेचे प्राध्यापक अजित सोमण यांचा जन्म ६ ऑगस्ट १९४७ रोजी झाला. अजित सोमण यांचे मराठी, हिंदी, इंग्रजी व संस्कृत या भाषांवर प्रभुत्व होते. तळेगाव येथील इंद्रायणी महाविद्यालय, तसेच स.प. महाविद्यालय, गरवारे महाविद्यालय, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ येथे इंग्रजी तसेच रानडे इन्स्टिट्यूट येथे पत्रकारिता, तर सिम्बायोसिस येथे अजित सोमण यांनी Creative writing […]

संगीतकार , गायक सुधीर फडके

सुधीर फडके यांनी शास्त्रीय गायनाचे प्राथमिक शिक्षण कै . वामनराव पाध्ये यांच्याकडे घेतले. त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरवात एच .एम. व्ही . या संगीत क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेतून केली. […]

कवी वसंत बापट

वसंत बापट यांचा पहिला ‘ बिजली ‘ हा काव्यसंग्रह १९५२ साली प्रकाशित झाला. वसंत बापट यांनी ४५ वर्षात ३४ पुस्तके लिहिली आहेत. […]

चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव नील आर्मस्ट्राँग

चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव नील आर्मस्ट्राँग यांचा जन्म ५ ऑगस्ट १९३० रोजी झाला. अंतराळवीर बनण्याआधी नील आर्मस्ट्राँग नौदलात होते आणि त्या वेळी त्यांनी कोरिया युद्धात भाग घेतला होता. ते एअरोस्पेस इंजिनीअर, नौदल अधिकारी, टेस्ट पायलट आणि प्राध्यापकदेखील होते. नौसेनेतील नोकरीनंतर आर्मस्ट्राँग यांनी पुरूडू विद्यापीठातून पदवी घेतली आणि त्यानंतर एका ड्रायडेन फ्लाईट रिसर्च सेंटरमध्ये दाखल झाले. तेथे […]

ज्येष्ठ गायिका आणि संगीत रंगभूमीवरील अभिनेत्री ज्योत्स्ना भोळे

ज्येष्ठ गायिका आणि संगीत रंगभूमीवरील अभिनेत्री ज्योत्स्ना भोळे यांचा जन्म ११ मे १९१४ रोजी गोव्यातील बांदिवडे गावी झाला. आपल्या अथक परिश्रमांच्या बळावर ज्यांनी ‘स्वरज्योत्स्ना’ असं नावं मिळवलं. त्या गायला लागल्या, की वाद्यं आपोआप झंकारायला लागत, असं म्हटलं जात असे. गायिका म्हणूनच नव्हे, तर अभिनेत्री म्हणूनही नाव कमावलेल्या जुन्या पिढीतील कलावंत ज्योत्स्ना भोळे. ज्योत्स्ना भोळे यांना अभिनया प्रमाणे आवाजाची […]

विकिपिडियाचा जनक जिमी वेल्स

तो आणि त्याच्या मित्रांनी २००१ साली त्यांनी लॅरी सँगर आणि इतर ह्यांच्या सोबतीने विकिपीडियाची स्थापना केली. विकिपीडिया म्हणजे ओपन कन्टेन्ट एनसायक्लोपेडिया. […]

लेखक धनंजय कीर

धनंजय कीर यांनी १९४३ पासून इंग्रजी वृत्तपत्रातून लेखनास प्रारंभ केला. काही लेख त्यांनी ‘ धनंजय ‘ या टोपण नावाने लिहिले. […]

गायिका धोंडूताई कुलकर्णी

धोंडुताई यांनी सुरवातीला जयपूर घराण्याचे उस्ताद अल्लदिया ख़ाँ साहेब यांचे भाचे नथ्थन ख़ाँ यांच्याकडे तीन वर्ष शिकल्या. त्यानंतर याच घराण्याची तालीम त्यांनी आयुष्यभर घेतली. […]

1 142 143 144 145 146 392
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..