विद्यार्थीदशेतच १९१५-१६ च्या सुमारास नानासाहेबांनी ‘ महाराष्ट्र हितचिंतक भ्रातृमंडळ ‘ या हौशी नाट्यसंस्थेने केलेल्या काकासाहेब खाडिलकर यांच्या ‘सत्वपरीक्षा ‘ या नाटकात विश्वामित्राचे काम केले. ही त्याच्या आयुष्यातील पहिली भूमिका , ही पहिलीच भूमिका खलनायकाची होती. […]
गोविंद तळवलकर यांच्यावर लोकमान्य टिळक आणि एम.एन. रॉय यांच्या विचारांचा प्रभाव होता. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र टाइम्सचे संपादक म्हणून त्यांनी तब्बल २८ वर्षे काम केले. […]
त्यांची सुप्रसिद्ध ‘ अनटचेबल ‘ ही कांदबरी १९३५ साली निर्माण झाली.. एका दलित तरुणावर ही कांदबरी आधारलेली आहे. शौचालय साफ करणाऱ्या एका तरुणाची ही गोष्ट आहे. दलितच दलितांच्या व्यथा मांडू शकतात असे तोपर्यंत मानत कारण कोणत्याही उच्च जातीच्या लेखकाने इतकी जळजळीत कांदबरी लिहिली नव्हती. ही कांदबरी भारतात आणि भारताबाहेर इतकी गाजली की मुल्क राज आनंद यांना भारताचा ‘ चार्ल्स डिकन्स ‘ म्हणून म्हणू लागले. विशेष म्हणजे ह्या पुस्तकाची प्रस्तावना त्यांचे मित्र , जगप्रसिद्ध लेखक ई . एम . फ्रॉस्टर यांनी लिहिली होती. त्यावेळी मुल्क राज आनंद यांची ओळख फ्रॉस्टर यांच्याशी टी . एस. ईलियट यांच्या पत्रिकेत ‘ क्रायटेरियोन ‘ येथे काम करताना झाली. […]
वयाच्या सहाव्या वर्षापासूनच शंकर वैद्यांना कवितेची गोडी लागली. या आवडीचा पाठपुरावा करता-करता ते कविता करू लागले. ‘ कालस्वर ‘ हा पहिला काव्यसंग्रह होता. त्यांच्या अनेक कविता गाजल्या . त्यापैकी ‘ आम्ही पालखीचे भोई ‘ ही कविता तर अत्यंत सुंदर आणि अर्थपूर्ण होती. […]
‘ प्रभात ‘ चित्रपट संस्थेत मालक असलेल्या दामले आणि फत्तेलाल या दोघांना ते भेटले कारण त्यांना चित्रकलेत जास्त रुची होती . जातिवंत चित्रकार असलेल्या फत्तेलाल यांनी त्याच्यातील चित्रकार अचूक हेरला त्यांचे कौतुक केले, दामल्यांनी त्यांचा देखणा चेहरा बघून त्यांच्या आगामी ‘ दहा वाजता ‘ चित्रपटासाठी विचारले पण विवेक याना त्यावेळी चित्रपटात काम करण्याची अजिबात इच्छा नव्हती , त्याचा ओढा चित्रकलेकडे जास्त होता . […]
१९६४ मध्ये मुंबईत ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना संघाचे आठ गडी बाद झालेले असताना बोर्डेंनी हिंमतीने किल्ला लढवला व अशक्यप्राय वाटणारा विजय मिळवून दिला. त्यावेळी प्रेक्षकांनी त्यांना डोक्यावर घेतले. त्यावेळी त्यांची बॅट गेली ती त्यांना परत मिळालीच नाही. […]
त्यांच्या प्रत्येक बॅनर मागे एक इतिहास होता, कहाणी होती. रामजोशी चित्रपटाच्या वेळी बाजारात मांजरपाट हे कापड मिळत नव्हते, तेव्हा शांतारामबापूनी मागचा पुढचा विचार न करता सर्व बॅनरसाठी रेशमी तागे मागवले. व रामजोशी चित्रपटाचे बॅनर रेशमी कापडावर रंगवले गेले. त्यावेळी कलायोगीनी रंगवलेला पेशव्यांचा दरबार अतीशय सुंदर रीत्या रेखाटला होता. पुढे मुंबईचे निर्माते पैसे घेऊन मागे लागले असताही कांबळे कोल्हापूरला गेले. तेथे त्यांनी सर्वस्वी पेंटींगला वाहून घेतले. […]
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात स्पेनमध्ये यादवी युद्ध सुरू होते. या यादवीत एका अमेरिकन क्रांतिकारकाला हौतात्म्य आले. त्यावर ‘फॉर हूम द बेल टोल्स’ ही कादंबरी लिहिली. लेखनाबरोबर बैलांच्या झुंजी, शिकार, प्रवास हे त्यांचे आवडते छंद. यासाठी वेळ काढून ते टांगानिकाला गेले. तेथील खेळांवर ‘डेथ इन द आफ्टरनून’, प्रवासवर्णनांवर ‘ग्रीन हिल्स ऑफ आफ्रिका’ हे ग्रंथ लिहिले. […]