नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

गायिका गंगूबाई हनगळ

१९३६ पासून त्यांचे सवाई गंधर्व यांच्याकडे रीतसर शिक्षण सुरू झाले आणि त्यानंतर ख्यालगायिका हीच त्यांची ओळख बनली. १९३२ ते ३५ या काळात गंगूबाईनी “गांधारी हनगल’ या नावाने जवळ जवळ साठेक गाणी ध्वनि मुद्रीत केली. मिया मल्हार, खंबायती, जोगिया, मालकंस, अडाणा, शुद्धसारंग, मुलतानी, शंकरा, हिंडोल, बागेश्री, देस, मांड, दुर्गा, बहार, भूपाली, बिहाग, पूरिया, कामोद, भैरवी, अशा विविध रागातल्या तीन साडेतीन मिनिटाच्या ध्वनिमुद्रिका त्यांनी दिल्या. […]

डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे

भारतीय एकात्मतेची पुष्टी करणारी विधायक अध्ययनदृष्टी, आंतरशाखीय अभ्यासपद्धती ही ढेरे यांच्या विचाराची, लेखनाची वैशिष्ट्ये होती. एखाद्या व्रतस्थ ऋषीप्रमाणे त्यांनी सारे आयुष्य संशोधन, लेखन यांसाठी दिले. दैवतशास्त्र, सांस्कृतिक इतिहास हे त्यांच्या लिखाणाचे मुख्य विषय. ‘श्री विठ्ठल : एक महासमन्वय’ या ग्रंथासाठी १९८७ साली त्यांना साहित्य अकादमी पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. […]

अभिनेते सूर्यकांत

मराठी चित्रपट सृष्टीतील सूर्यकांत यांनी अनेक चित्रपटातून शिवाजी राजांची अजरामर भूमिका साकारली यांच्या भूमिकेतून प्रेरणा घेऊन दक्षिणेत एन टी रामाराव ,शिवाजी गणेशन ,करुणानिधी यांनी तेथील भाषेत राजांची भूमिका साकारली या भूमिकेमुळे अफाट लोकप्रियता मिळवून दक्षिणेकडील स्टार नेते बनले . पण दुर्दैवची बाब आहे की ज्यांनी ही शिवरायची भूमिका अजरामर केली .ते सुर्यकांत मांढरे आजच्या पिढीला अज्ञात आहेत .ज्यांच्या अभिनयातून आणि त्यांच्या शरीराच्या ठेवणीतून संपूर्ण महाराष्ट्राला आपले आराध्य शिवप्रभू पाहता आले, आजही अनेक बऱ्याच ठिकाणी शिवरायांचे तैल चित्र हे सुर्यकांत यांच्या रूंपात रंगवलेले पहावयास मिळते, कारण त्यांच्या अभिनयामुळेच त्यांनी शिवराय अगदी हुबेहूब जिवंत केले आणि १९०० शतकात आपल्याला प्रत्यक्ष शिवप्रभू अनुभवता आले. […]

सुप्रसिद्ध गायिका राजकुमारी

त्यांना लहानपणी गाणे शिकण्याची संधी मिळाली नाही परंतु घरच्यांनी मात्र तिला कधी आडकाठी केली नाही , तर गाण्यासाठी उत्तेजनच दिले. त्यानी पहिले गाणे वयाच्या १० व्या वर्षी गायले . त्यांनी आपले करिअर स्टेजपासून सुरु केले. प्रकाश पिक्स्चर्सचे विजय भट आणि प्रकाश भट यांनी त्याना एका स्टेज शोजमध्ये पाहिले. तेव्हा त्यांनी सांगितले तू स्टेजचे काम सोड तुझा आवाज खराब होईल कारण त्यावेळी माईक सिस्टीम नव्हती. त्यानंतर त्या प्रकाश पिक्चर्स मध्ये कामाला लागल्या. […]

कवी वसंत निनावे

त्यांनी पुढे स्वतःच्या लेखनकौशल्यावर , स्वतःच्या प्रतिभेवर रेडिओसाठी कार्यक्रम लिहावयास सुरवात केली. तिथे यशवंत देव , नीलम प्रभू , बाळ कुरतडकर यांच्याशी त्यांची ओळख आणि मैत्री झाली. रेडिओवर त्यांची ‘ मास गीत ‘ ह्या कार्यक्रमात गाणे लागे . ‘ मास गीत ‘ म्हणजे एकच गाणे महिनाभर दर रविवारी लागायचे. त्यावेळी त्यांची तेथे खूप गाणी रेकॉर्ड झाली आणि ती आकाशवाणीवर प्रसारितही झाली. त्यावेळी कॅसेट्स नसायच्या किंवा आजच्यासारख्या डी.व्ही.डी. ही नसायच्या . त्यावेळी रेकॉर्ड्स असायच्या , ध्वनिमुद्रिका असायच्या. त्यांच्या खूप खूप ध्वनिमुद्रिका रेकॉर्ड झाल्या. […]

सर एडमंड हिलरी

हिमालयातील या सर्वोच्च शिखराला नेपाळी भाषेत सागरमाथा म्हणजे आकाशदेवता म्हटले जाते; तर तिबेटीमध्ये या शिखराला चोमुलुंग्मा म्हणजे विश्वदेवता म्हटले जाते. हिमालयाची भव्यता, तेथील गूढगंभीर आणि अंतर्मुख करणारे वातावरण, निसर्गाची हरक्षणाला पालटणारी रूपे आणि नजर बांधून ठेवणारे दिव्य सौंदर्य लक्षात घेतले तर ही नावे किती अर्थपूर्ण आहेत, हे ध्यानात येते. अशा या शिखरावर पाऊल ठेवावे ही तमाम गिर्यारोहकांची आकांक्षा असते. त्याची पूर्ती होणे अवघड आहे, हे माहीत असूनही असे स्वप्न पाहणारे अनेक असतात. […]

गुग्लिएल्मो मार्कोनी

अनेक शास्त्रज्ञांनी हॅन्रिच हर्ट्झच्या बिनतारी संदेशांच्या प्रयोगांमधून हवेतून जात असलेल्या अदृश्य लहरींचे अस्तित्व स्वत:ही तसेच प्रयोग करून तपासले होते. त्यामुळे अशा लहरी आपल्या डोळ्यांना दिसत नसल्या तरी त्या प्रत्यक्षात असतात या विषयी कुणाच्याच मनात शंका नसायच्या. तसेच मॅक्सवेलनेही इलेक्ट्रोमॅग्नेटीक लहरींच्या संदर्भात मांडलेली समीकरणेसुद्धा पडताळून पाहतात येतात, हेही अनेक जणांना पटले होते. पण या सगळ्याचा उपयोग प्रत्यक्षात कुठे आणि कसा करता येईल हे मात्र कुणालाच उमगत नव्हते. […]

ब्रूसली

ब्रूसलीच्या वडिलांनी ब्रूसलीच्या वयाच्या १८ वर्षी हाँगकाँग सोडण्याचा निर्णय घेतला. नाइलाजाने घेतलेला हा निर्णय मात्र ब्रूस लीचं आयुष्यच बदलवणारा ठरला. युनिव्हसिर्टी ऑफ वॉशिंग्टनमध्ये ड्रामा विषयात डिग्रीचं शिक्षण घ्यायला सुरूवात केली. शिक्षणाची गाडी सुरू असतानाच त्याच्यातलं मार्शल आर्ट्स मात्र त्याला स्वस्थ बसू देईना. अमेरिकेतच त्याने मार्शल आर्ट्स शिकवायला सुरूवात केली, तेव्हा त्याचं वय होतं १८. […]

उस्ताद अली अकबर खान

उस्तादजींना त्यांच्या वडीलांकडून अनेक वाद्याचे प्रशिक्षण मिळाले पण ते सरोदकडे जास्त आकर्षित झाले .त्यांचे वडील अलाउदिन खान कडक शिस्तीचे होते. पहाटेच त्यांचे संगीताचे धडे सुरु होत ते अठरा तास चालत. उस्तादजी तबला आणि पखवाज त्यांच्या काकांकडून आफताबुददीन खान यांच्याकडून शिकले. सुप्रसिद्ध सरोद वादक तामीर बरन आणि सुप्रसिद्ध बासरीवादक पन्नालाल घोष यांच्याकडेही शिकले त्यावेळी ते शिबपूर येथे येत असत. […]

मराठी शायर भाऊसाहेब पाटणकर

भाऊसाहेब पाटणकर यांना ‘ जिंदादिल ‘ भाऊसाहेब पाटणकर म्ह्णून ओळखले जात होते. मराठीत गजल मोठ्या प्रमाणात लिहली जात असताना स्वतंत्र शेर मात्र कमीच म्हणजे जवळ जवळ लिहीले जात नसत . गंमत म्हणजे गजलांचा सुकाळ व्हायाच्या आधी मराठीत उच्च दर्जाचे शेर लिहणारा एक जबरदस्त शायर निर्माण झाला होता तो शायर म्हणजे भाऊसाहेब पाटणकर ते यवतमाळ येथे रहावयास होते. […]

1 150 151 152 153 154 392
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..