३१ मे रोजी एकदम सर्वत्र क्रांतियुद्धाला प्रारंभ करण्याची श्रीमंत नानासाहेब पेशवे आदींची योजना होती. मात्र १९ व्या पलटणीतील स्वदेशबंधूंचा आपल्यादेखत अपमान व्हावा, ही गोष्ट मंगल पांडे यांना आवडली नाही. मार्च २९, १८५७ रोजी कवायतीच्या मैदानावर मंगल पांडे बराकपूर छावणीत ब्रिटिश करत असलेल्या अन्यायाविरुद्ध देशी सैनिकांना उत्तेजित करू लागले. “मर्दहो, उठा !” अशी गर्जना करून ते सैनिकांना म्हणाले, “आता माघार घेऊ नका. बंधूंनो, चला तुटून पडा ! तुम्हाला तुमच्या धर्माची शपथ आहे !! चला, आपल्या स्वातंत्र्यासाठी शत्रूचा निःपात करा!!!” […]
आपल्या भारत देशाने जगाला अनेक गणितज्ञ आणि खगोल वैद्यानिक दिले आहेत. अश्या थोर असामी पैकी एक आहेत डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर. डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर हे एक थोर शास्त्रज्ञ तर आहेतच पण उत्तम लेखकही आहेत. त्यांनी फक्त विज्ञान विषयावर गंभीर पुस्तकेच नाही लिहिली तर विज्ञानाची छटा असलेल्या कादंबऱ्या सुद्धा लिहिल्या आहेत. जयंत विष्णू नारळीकर यांचे वडील विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ, वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित विभागचे प्रमुख होते. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या. […]
प्रा.रंगनाथ पठारे यांचे आजच्या मराठी साहित्यात अव्वल स्थान आहे. श्रेष्ठ दर्जाचे कादंबरीकार, कथाकार, समीक्षक आणि विचारवंत म्हणून गेली ४० वर्षे ते अविरतपणे योगदान देत आलेत. सुमारे चाळीस हून अधिक मौलिक ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत. कथा आणि कादंबरी या दोन्ही साहित्यप्रकारांत ते लेखन करतात. […]
मृणाल सेन याना इतकी जगभरातून अवॉर्ड्स मिळाली आहेत त्याची यादी काढायची झाली तर खूप मोठी होईल. त्याच्या अवॉर्ड्स मिळालेल्या चित्रपटांची नावे भुवन शोम , चोरस , मृगया , अकलेर संधने , कलकत्ता ७१ , खरजी , पूनासचा , आकाश कुसुम , अंतरेंन , ओका ओरी कथा , परशुराम , एक दिन प्रतिदिन ,खंडहर , एक दिन अचानक ह्या चित्रपटांना वेगवेगळ्या कामाबद्दल अवॉर्ड्स मिळली आहेत. मृणाल सेन यांनी अनेक डॉक्यूमेंटरीज बनवल्या आहेत. मृणाल सेन याना १९७९ साली पदमभूषण अवॉर्ड मिळाले , तर २००५ साली दादासाहेब फाळके अवॉर्ड मिळाले . […]
वसंत शिंदे यांनी १९४६ पासून १९९६ पर्यंत ४० दिग्दर्शकांकडे कामे केली अगदी दादासाहेब फाळके यांच्यापासून संजय सुरकरपर्यंत जवळ जवळ सर्वच म्हणावे लागतील. त्यांना ‘ सांगत्ये ऐका ‘ या चित्रपटासाठी ‘ दादासाहेब फाळके गौरवचिन्ह ‘ मिळाले, तर नाटक आणि चित्रपट यांच्यामधील भूमिकांसाठी ‘ दिनकर कामण्णा सुवर्णपदक ‘ मिळाले , शांताबाई हुबळीकर पुरस्कार , बालगंधर्व पुरस्कार , चिंतामणराव कोल्हटकर पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. […]
जोगवा ह्या २००९ सालच्या मराठी चित्रपटामधील भूमिकेसाठी मुक्ताचे कौतुक झाले व तिला ह्यासाठी काही पुरस्कार देखील मिळाले. आपल्या वैविध्यपूर्ण आणि सहज अभिनयाने मुक्ताने रसिकांच्या मनात प्रेमाचे स्थान मिळवले आहे. टेलिव्हिजन, सिनेमा आणि नाटक अश्या तिन्ही माध्यमांवर जबरदस्त पकड असणार्या अत्यंत मोजक्या अभिनेत्यांमध्ये मुक्ताचे स्थान अग्रक्रमावर आहे. […]
माणिक वर्मा यांनी वयाच्या अकराव्या वर्षी म्हणजे १९३९ साली दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेली चार भावगीते गायली आणि दोन ध्वनिमुद्रिकामध्ये गाऊन ह्या क्षेत्रात त्या आल्या. अर्थात चित्रपटगीतांच्या बाबतीतही त्यांचे महत्वाचे स्थान आहे. प्रभात कंपनीच्या हिंदी ‘ गोकुल ‘ या चित्रपटात सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेले गीत त्यांनी प्रथम गायले. परंतु त्यांनी जास्त गाणी हिंदीपेक्षा मराठी चित्रपटांसाठी गायली. माणिक वर्मा यांनी असंख्य भावगीते , भक्तिगीते , चित्रगीते गायली आणि ती सर्व गाणी आजही आपल्या संस्कृतिक जीवनाचा भाग बनून राहिली आहेत. […]
याकूब सईद पुण्यात शाळेत शिकत असताना दुसऱ्या महायुद्धाचा काळ होता. त्यांच्या शाळेसमोर असलेल्या ‘शालिमार फिल्म स्टुडिओ’मध्ये शाळा शिकून ते काम करत असत. संध्याकाळी काम करायचे आठ आणे किंवा रुपया मिळत असे. हे झाल्यावर रात्री ‘शिरीन’, ‘अपोलो’,’ऑडियन’, ‘कॅपिटल’ या थिएटर्सवर चित्रपटांच्या ते गाण्यांची पुस्तकं विकत असत.‘बरसात एक आणा, बरसात एक आणा’असं करता करता ते एम.ए. झाले. […]
शाळेत असताना त्यांना क्रिकेटची खूप आवड होती तशी नाटकांचीपण आवड होती. ते उत्तम लेग स्पिनर होते , उत्तम फलंदाजही होते. कॉलजमध्ये गेल्यावर त्यांना वाटले कॉलजमध्येपण क्रिकेट खेळता येईल. परंतु त्यावेळी त्यांना नाटकांच्या स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळाली. त्यात त्यांना बक्षीस मिळाले. त्याच्या मते त्यांच्या आयुष्यात हाच एक टर्नीग पॉईंट ठरला की ते क्रिकेटकडून अभिनयाकडे वळले. डिग्री मिळण्याच्या आधीपासून ते पोस्ट ग्रॅज्युएट होईपर्यंत त्यांनी सुमारे १५० एकांकिकांमधून काम केले ५० च्या वर नाटके केली. […]
हिंदुस्थान सरकारची शिष्यवृत्ती घेऊन रॅंग्लर परांजपे इंग्लंडच्या केंब्रिज विद्यापीठ क्षेत्रातील सेंट जॉन्स महाविद्यालयात दाखल झाले. तेथे त्यांनी गणित विषयातील सगळ्यात कठीण ‘ ट्रायपॉस ‘ परीक्षा दिली आणि ते त्या परीक्षेत प्रथम आले. यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्याला सीनियर रँग्लर असे म्हणतात. केंब्रिज विद्यापीठाचा वरिष्ठ रँग्लर हा किताब पटकावणारे ते पहिले भारतीय होते . […]