छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूरचे शाहू, राजर्षी शाहू, चौथे शाहू अशा नावाने प्रसिद्ध होते. छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापुर संस्थानाचे छत्रपती होते. ब्रिटिश राजवटीच्या काळात सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचे कार्य शाहू महाराजांनी केलं. बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी ते नेहमी प्रयत्नशील राहिले. महाराजांना राजर्षी ही पदवी कानपूरच्या कुर्मी समाजाने दिली. […]
भास्करबुवा बखले यांचे शिष्य बालगंधर्व हे मास्तर कृष्णराव यांचे गुरुबंधू होत. कारकिर्दीच्या चढत्या काळात त्यांचं गाणं ऐकून दस्तुरखुद्द बाळ गंगाधर टिळक म्हणजेच लोकमान्य टिळकांनी त्यांना ‘बालगंधर्व’ ही पदवी बहाल केली व पुढे ते त्याच नावाने जास्त प्रसिद्ध झाले. […]
काईचिरो टोयोटा म्हणजेच काईचिरो टोयोडा हे जपानमधल्या औद्योगीक क्रांतीचे जनक समजले जातात. त्यांचे महत्वाचे संशोधन म्हणजे ऑटोमेटेड विव्हींग मशिन, ज्याला आपण ‘पॉवर लूम’ म्हणतो यात होते. या मशिनमुळे वस्त्र उद्योगात क्रांती घडवून आणली. नवनवे शोध लावले. त्यांनी वाहन क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात योगदान आहे. […]
डॉ.किरण चित्रे या माहेरच्या किरण तासकर. डॉ.किरण यांचा जन्म अहमदनगरचा. बालपण शालेय शिक्षण शारदाश्रम विद्यामंदिर येथे व महाविद्यालयीन शिक्षण रुईया महाविद्यालय मुंबईत झाले. डॉ.किरण चित्रे यांना प्रसारण क्षेत्रांत खूप जण मानतात. किरण चित्रे या निर्मिती सहाय्यक ते सहाय्यक संचालक एवढ्या पदापर्यंत विविध स्तरांवर दूरदर्शनच्या मुंबई केंद्रावर गेली ३३ वर्ष कार्यरत होत्या. […]
भय्यूजी महाराज यांचे खरे नाव उदयसिंह देशमुख. राष्ट्रसंत म्हणून ओळख असणारे भय्यूजी महाराज यांचा मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात मोठा अनुयायी वर्ग होता. २०१६ मध्ये भय्यूजी महाराज यांनी सार्वजनिक जीवनातून निवृत्ती जाहीर केली होती. त्यांचा इंदूर येथे आश्रम असून, त्याच्या महाराष्ट्रातील अन्य शहरांतही शाखा आहेत. […]
रेल्वे स्थापत्यशास्त्रातील आपली कारकिर्द पन्नास वर्षाहून अधीक काळ गाजवून डॉक्टर ईलत्तुवलपीळ श्रीधरन यांनी दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदा वरून निवृत्ती पत्करली तेव्हा त्यांचं वय होतं अवघं ७९ वर्ष ६ महिने आणि २० दिवस. ‘मेट्रो मॅन’ म्हणुन प्रसिद्ध असलेल्या श्रीधरन यांच्या निवृत्तीची दखल जगभरातल्या प्रसारमाध्यमांना घ्यावी लागली इतके या आधुनिक विश्वकर्म्याचं कर्तृत्त्व मोठं आहे. […]
रघुनाथ आजगावकर यांना बंगाली भाषा उत्तम येत होती आणि बंगाली संस्कृतीची चांगली माहिती होती. ते बंगाली साहित्याचे अनुवादक होते. त्यांनी १८९५ साली ‘मासिक मनोरंजन’ सुरू केलं आणि पुढे १९०९ साली ‘मासिक मनोरंजन’चा पहिला मराठी दिवाळी अंक काढला होता. […]
‘डॅन ब्राऊन’ यांच्या आजवर गाजलेल्या चार प्रमुख कादंबऱ्या हा- ‘द दा विंची कोड’, ‘एंजल्स अॅन्ड डिमेन्स’, रिसेप्शन पॉइंट’, ‘डिजिटल फॉरेस्ट. यातील ‘द दा विची कोड ही कादंबरी खूप गाजली. २००३ साली प्रसिद्ध झालेली ही कादंबरी पहिल्या आठवड्यातच बेस्ट सेलर ठरली. २००६ पर्यंत जगभर या कादंबरीच्या ६ कोटी प्रती खपल्या. […]
मा. दत्तारामांनी हाताशी आलेली प्रत्येक भूमिका अशीच जिवंत केली. रंगभूमीकडे त्यांनी एक व्रत म्हणून पाहिले आणि व्रताचा सांभाळ देवव्रताच्या निःस्पृह प्रतिज्ञेप्रमाणे त्यांनी आयुष्यभर केला. त्या अर्थाने मास्टर दत्ताराम म्हणजे मराठी रंगभूमीवरचे देवव्रतच. मास्टर दत्ताराम यांनी ‘ मत्स्यगंधा ‘ या नाटकात केलेली देवव्रताची भूमिका विशेष गाजली. […]
१९२५ साली त्यांचा ‘ भाषाशास्त्रज्ञ व मराठी भाषा ‘ हा त्यांचा पहिला समीक्षात्मक आणि संशोधनात्मक ग्रंथ प्रसिद्ध झाला. त्यानंतर ‘ संस्कृत नाटक व नाटककार ‘ या ग्रंथाचे लेखन त्यांनी केले. कृ . पा. कुलकर्णी हे मराठी भाषेमधील व्यूत्पत्ती शास्त्राचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात त्याचप्रमाणे मराठीमधील अग्रगण्य समीक्षक म्हणूनही ओळखले जातात. […]