१९२५ साली त्यांचा ‘ भाषाशास्त्रज्ञ व मराठी भाषा ‘ हा त्यांचा पहिला समीक्षात्मक आणि संशोधनात्मक ग्रंथ प्रसिद्ध झाला. त्यानंतर ‘ संस्कृत नाटक व नाटककार ‘ या ग्रंथाचे लेखन त्यांनी केले. कृ . पा. कुलकर्णी हे मराठी भाषेमधील व्यूत्पत्ती शास्त्राचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात त्याचप्रमाणे मराठीमधील अग्रगण्य समीक्षक म्हणूनही ओळखले जातात. […]
नाना पळशीकर यांनी चार मराठी चित्रपटात भूमिका केल्या आणि शंभरहून अधिक हिंदी चित्रपटात भूमिका केल्या. त्यांना ‘ कानून ‘ ह्या चित्रपटातील भूमिकेसाठी , तसेच एकूण तीन चित्रपटासाठी त्यांना सर्वोतकृष्ट अभिनेता म्ह्णून ‘फिल्मफेअर’ पारितोषिके मिळाली. त्याचप्रमाणे १९८२ साली बोलपट चित्रपटसृष्टीच्या अमृतमहोत्सवनिमित्त त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते त्यांना पारितोषीक देण्यात आले. […]
शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेला शिवनेरी किल्ला १६३६ ते १७५७ दरम्यान स्वराज्यात नव्हता. नानासाहेब पेशव्यांनी मुत्सद्दीपणाने कोणत्याही लढाई शिवाय शिवनेरी स्वराज्यात घेतला. तसेच, लष्करी कारवाई करून निजामाच्या ताब्यातील खानदेश, जुन्नर, अहमदनगर, नाशिक, सोलापूर हे जिल्हे देखील स्वराज्यात आणले. […]
आगा ह्यांच्या विनोदी भूमिकांची वेगळी पद्धत म्हणा स्टाईल होती ती म्हणजे ‘ लेट ऍक्शन ‘ . एखादे वाक्य कानावर पडल्यावर ते हो म्हणत आणि लगेच चेहरा धक्का बसल्यासारखा करत , किंवा धक्का बसल्याचा अभिनय करत. त्यालाच ‘ लेट ऍक्शन ‘ म्हणतात. त्याची सुरवात त्यानेच केली असे म्हटले जाते. पुढे अनेक विनोदी नटांनी ही पद्धत उचलली असेही म्हटले जाते. […]
उत्तम गळा , दमदार आवाज , बळकट कमावलेले शरीर आणि जबरदस्त आलापी आणि गुरुकडे केलेला रियाज ह्यामुळे त्यांची शास्त्रीय संगीताची बैठक तयार झाली. त्यांनतर ते ठिकठिकाणी गाण्याच्या मैफली करू लागले . त्यामुळे त्यांना इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीतर्फे गाण्यासाठी बोलवण्यात आले तेव्हा त्यांनीच संगीत देऊन स्वतःच्याच आवाजात गाणी गायली. […]
जॉनीभाई म्हणतात विनोदी नटासाठी तीन गोष्टी आवश्यक असतात एक म्हणजे उत्तम स्क्रिप्ट लेखक दुसरे म्हणजे टायमिंग आणि तिसरे म्हणजे कलाकार कसा स्वतःच्या बुद्धिमतेनुसारं इम्पप्रूव्ह होतो हे आवश्यक असते आणि त्यासाठी भाषा अत्यंत महत्वाची असते, तिच्यावर ताबा असणे आवश्यक असते. त्यांच्या दृष्टीने त्यांना अब्रार अल्वी यांच्याकडे काम करताना मजा येत असे. […]
श्रीराम भिकाजी वेलणकर हे भारतीय टपालखात्याच्या ‘पिन कोड’ प्रणालीचे जनक होते. श्रीराम भिकाजी वेलणकर हे ब्रिटिशांच्या राज्यात आयसीएसंच्या लेखी परीक्षेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले तरीही त्यांना पोस्ट आणि टेलीग्राफ खात्याच्या तोंडी परीक्षेत ठरवून अनुत्तीर्ण करण्यात आले होते. […]
२२ जून १८९७. पुण्यात प्लेगची साथ सुरु असताना घराघरात घुसून आमच्या आया बहिणींच्या इभ्रतीवर हात टाकणाऱ्या रँड नावाच्या नराधमाचा चाफेकर बंधूनी वध करुन त्याला यमसदनी धाडले होते. […]
कमल शेडगे हे धुरंधर, ज्येष्ठ कलाकार. अक्षरांची कलात्मक मांडणी करून शेडगे शीर्षकाला असं काही रुपडं बहाल करत असत की ते शीर्षक हीच कलाकृतीची ओळख बनत असे. कमल शेडगे यांनी मुद्रित माध्यमात विपुल काम केले असले तरी त्यांची खरी ओळख होती ती टाईम्स समूहातील प्रकाशनांसाठी तसेच नाटक, सिनेमाच्या जाहिरातींसाठी त्यांनी केलेल्या कला दिग्दर्शन व सुलेखनामुळे! […]
ज्येष्ठ चित्रपट, टीव्ही आणि नाट्य अभिनेते टॉम अल्टर यांचा जन्म २२ जून १९५० मसुरी येथे झाला. सोनेरी केस, निळे डोळे आणि टॉम अल्टर या नावामुळे चटकन अमेरिकन किंवा ब्रिटिश वाटणारा हा ज्येष्ठ अभिनेता-लेखक जन्माने आणि मनाने मात्र पक्का भारतीय होता. […]