लेडी ऑफ कॉन्ट्रासेप्शन’ किंवा ‘कुटुंबनियोजनाची जननी’ किंवा गरिबांची वाली म्हणून विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात जगात सुप्रसिद्ध झालेली अमेरिकेतील महिला म्हणजे मागरिट सॅनगर! कुटुंबनियोजनासारखा तत्कालीन अश्लाघ्य विषय मागरिटने हाताळल्याने अत्यंत धाडसी आणि शूर महिला म्हणून तिची गणना साऱ्या विश्वात केली गेली आहे. […]
अमेरिकेच्या ऑपेराविश्वात मारिया कलासचे नाव गायिका म्हणून श्रेष्ठ प्रतीचे मानले जाते. त्याचप्रमाणे तिचे व्यक्तिमत्त्वही बहुचर्चित आणि वादळी स्वरूपाचे ठरले होते. कलावंताचा भणंगपणा आणि भावनांची तीव्रता तिच्या स्वभावात होती. रागालोभावर ती ताबा ठेवू शकली नाही. […]
अमेरिकेतील अत्यंत धोकादायक भयंकर स्त्री’ असे अमेरिकेतील भांडवलदार आणि कारखानदार यांनी जिचे वर्णन केले आहे, ती मदर जोन्स इ.स. १८३० मध्ये आयर्लंडमध्ये मेरी हॅरिस हे नाव घेऊन जन्माला आली होती. आयर्लंडच्या मातीत आणि पाण्यातच क्रांतिकारकांचे पोषण करण्याचे गुणधर्म असावेत! मेरी हॅरिस जोन्सच्या रक्तातच देशप्रेम, त्यागीवृत्ती, अन्यायाविरुद्धची बंडखोरी आणि बेडर क्रांतिकारक वृत्ती होती. […]
एक व्यक्ती विशेषतः स्त्री, जगाशी संघर्ष करीत, संसार पुढे पुढे रेटत असते, कठीण परिस्थितीतून मार्ग काढत असते तेव्हा तिचं कौतुकच करावं तेवढे थोडेच ! या शंभर वर्षांचा त्यांनी कथन केलेला त्यांच्या इतिहास चित्रपटासारख्या माझ्या डोळ्यां समोर तारळतो आहे.. […]
‘मी गतीचे गीत गाई’ हे बाबा आमटे यांच्या एका गीतासारखे बोल रक्ताच्या थेंबाथेंबात जागवतच शर्ले मलडावनी हिचा अमेरिकेत जन्म झाला असावा! लहानपणी हायस्कूलमध्ये शिकत असतानाच न्यूयॉर्कमधील शेनेक्टॅडी (Schenectady) येथील रस्त्यांवरील शर्यतीत आपल्या गावातील मुलांबरोबर शर्ले दांडगाईने वागत असे. […]
विधानसभा निवडणूक असो वा लोकसभा निवडणूक, आपल्या देशात अनेक अशिक्षित आणि स्वतःला सुशिक्षित म्हणविणारे स्त्री-पुरुष आपल्या मतदान हक्काविषयी अत्यंत बेफिकीर आणि बेजबाबदार असतात. मतदानासाठी दिलेल्या सार्वजनिक सुट्टीचा उपयोग मतदानाला न जाता बाहेरगावी मौजमजा करण्यासाठी जाण्यात केला जातो. […]
मी लेखन करायला लागलो, त्याला आज काही वर्ष उलटून गेली. एखादी गोष्ट,व्यक्ती भावते, एखादा सुंदर अविस्मरणीय अनुभव येतो, मनात ठसलेल्या काही गतस्मृती जाग्या होतात, काही खूप आनंद देणारे प्रसंग घडतात आणि मग मात्र ते शब्दरूपात उतरल्याशिवाय शांत बसवत नाही. अधूनमधून काही वैचारिक स्फुरतं. […]
चीनच्या इतिहासात इ.स. ६६० मध्ये वू झाओ ही विलक्षण व्यक्तिमत्त्वाची स्त्री सम्राज्ञीपदावर विराजमान होऊन गेली. वू झाओपूर्वी किंवा नंतरही चीन देशात कुणा स्त्रीला सम्राज्ञीपद लाभले नाही. त्यामुळेच चीनची एकमेव सम्राज्ञी असे वू झाओला म्हटले जाते. […]
खाकी वर्दी आणि त्यातला माणूस या दोघांपासून आपण सर्वसामान्य जन जरा अंतर ठेवूनच असतो. एखाद्या पोलिसाने जाता जाता आपल्याकडे सहज कटाक्ष टाकला, तरी आपल्या छातीत उगीचच धडधडायला लागतं, मग त्याच्याशी बोलणं किंवा संवाद साधणं दूरच राहिलं. […]
भारताचे तेरावे राष्ट्रपती अशी ओळख असलेल्या प्रणव मुखर्जी यांची कारकिर्द आदर्शवत अशीच आहे. माध्यम क्षेत्रातील एका खासगी पत्रिकेच्या सर्वेक्षणानुसार जगातील सर्वोत्तम अर्थमंत्री म्हणूनही त्यांना गौरवण्यात आले आहे. […]