नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

जागतिक दृष्टीदान दिवस – १० जून

अनेक अंध व्यक्तींचे जीवन प्रकाशमय करणारे डॉ. रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ साजरा होणारा दृष्टिदान दिवस आज साजरा होत आहे. डोळ्यात दाटलेल्या काळ्याकुट्ट अंधारातून उद्याच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहणाऱ्या व्यक्तींना नेत्रदानाच्या माध्यमातून हे जग सुंदर आहे़ याची प्रचिती देण्याची प्रेरणा देणारा हा दिवस आहे. शासकीय सेवेत नेत्रचिकित्सक म्हणून अहोरात्र झटणाऱ्या डॉ. रामचंद्र यांचे नाव महाराष्ट्राच्या इतिहासात अजरामर आहे. […]

रहस्यकथा लेखक बाबूराव अर्नाळकर

बाबूरावांचे मुंबईतील गिरगावात चष्म्याचे दुकान होते. सुरुवातीला तेथे बसून बाबूराव रहस्यकथा लिहीत. दुकानात चष्मा खरेदी करण्याऐवजी लोक रहस्यकथा लेखक बाबूरावांना पहायला येत. बाबूराव जेपी (जस्टिस ऑफ पीस) होते; ते स्वातंत्र्य सैनिकांच्या संघटनेचेही काम करीत. त्यामुळे त्यांना खूप फोन येत, याचा आणि बाहेरील वर्दळीचा त्रास होऊ लागल्याने ते अनेकदा एखाद्या गुप्त ठिकाणी जाऊन लेखन करीत. […]

मराठी अभिनेते राम नगरकर

कला पथकातील झालेल्या मैत्रीमुळे दादा कोंडके आणि राम नगरकर यांनी ‘विच्छा माझी पुरी करा’ हे लोकनाट्य सुरू केलं. त्यांनी त्याचे हजारो प्रयोग केले. त्यामुळे या लोकनाट्यला संपूर्ण महाराष्ट्राने अक्षरशः डोक्यावर घेतलं होते. यात राम नगरकर केलेली हल्याची भूमिका आणि त्यांच्या तोंडी असलेलं ‘हल्ल्या थिर्र’ हे डायलॉग प्रेक्षक आजही विसरलेले नाहीत. या लोकनाट्यमुळं दादा कोंडके आणि राम नगरकर हे नाव घराघरात पोचलं. […]

काव्यनायक गजानन वाटवे

‘वारा फोफावला’, ‘गगनी उगवला सायंतारा’ आणि ‘यमुनाकाठी ताजमहाल’ यांच्या लोकप्रियतेची कल्पना आज एकविसाव्या शतकात करता येणं अशक्य. गजानन वाटवे यांनी मराठीतील अनेक कवितांना सुंदर चाली लावून प्रथम भावगीताचा प्रकार लोकांपर्यंत नेला. आणि त्यांच्या या प्रयत्नाला लोकांनी एवढा प्रचंड प्रतिसाद दिला की, पुढे बराच काळ वाटवे म्हणजे भावगीत हे समीकरण झाले. […]

बालसाहित्यिक गोपीनाथ तळवलकर

कणिका, खंडकाव्य, बालकविता असे विविध काव्यप्रकार हाताळूनही त्यांचे नाव झाले नाही. आकाशमंदिर, छायाप्रकाश, नंदिता या कादंबर्या , ज्ञानेश्वरीतील सौंदर्यविश्व हे रसग्रहण, तसेच मुलांसाठीची अनेक पुस्तके त्यांनी लिहिली होती. त्यांचे काही लिखाण ’गोपीनाथ’ या टोपणनावाने केलेले आहे. […]

रशियन टेनिस स्टार अ‍ॅना कुर्निकोव्हा

अ‍ॅना कुर्निकोव्हाची गणना सर्वाधिक ग्लॅमरस खेळाडूंमध्ये होते. वयाच्या १५ व्या वर्षीपासूनच तिचे लाखो चाहते आहेत. एकही सिंगल्स किताब जिंकू न शकलेली अ‍ॅना तिच्या सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेत होती. अर्थात डबल्सची दोन ग्रँडस्लॅम तिच्या नावावर आहेत. […]

ख्यातनाम संगीतकार, पेटीवादक गोविंदराव टेंबे

गोविंदरावांनी संगीत दिलेल्या संगीत मानापमान नाटकातील पदे आजही लोकप्रिय आहेत. त्यांनी अयोध्येचा राजा या पहिल्या मराठी बोलपटालासुद्धा संगीत दिले. काही वर्षांनी त्यांनी स्वत:ची शिवराज नाटक मंडळी सुरु केली. त्यांनी स्वत: नाटके आणि त्यातील पदे लिहिली. गोविंदराव टेंबे उत्कृष्ठ टेनिसपटु होते व त्यानी सर्कसचे मॅनेजर म्हणूनहि काम केले होते! […]

क्रिकेट विश्वातले पहिले जुळे बंधू स्टीव्ह वॉ आणि मार्क वॉ

स्टीव्ह एडवर्ड वॉ आणि मार्क एडवर्ड वॉ हे दोघे ऑस्ट्रेलियाचे कर्णधार राहिले आहेत. कसोटी क्रिकेट खेळणारे ते पहिले जुळे बंधू ठरले. स्टीव्ह हा मार्कपेक्षा केवळ चार मिनिटांनी मोठा आहे. […]

श्रीलंकेचा माजी कर्णधार अँजेलो मॅथ्यूज

अँजेलो मॅथ्यूजचा फलंदाज म्हणून ठसा असला तरी त्याने सर्वोत्तम गोलंदाजीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरुवात केली. अँजेलो मॅथ्यूजने २००९ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. काँपॅक कपमधील (२००९) तिसऱ्या लढतीत यजमानांच्या ३०८ धावांच्या मोठया आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव १६८ धावांत संपला. […]

1 158 159 160 161 162 392
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..