हा माणूस डॉक्टर होता, तो वकिलही होता, तो आयपीएस म्हणजे जिल्हा पोलिस प्रमुख दर्जाचा अधिकारी तसंच आयएएस म्हणजे कलेक्टर दर्जाचा अधिकारी होता. याशिवाय तो पत्रकारही होता. इतकंच नाही तो किर्तनकार, आमदार, खासदार आणि मंत्रीही होता. इतक्या पदव्या मिळवणारा ज्ञानयोगी म्हणजे श्रीकांत जिचकार होय. श्रीकांत जिचकार यांची भारतातील सर्वात शिक्षित व्यक्तींच्या पक्तिंत गणती होते. […]
‘कुर्यात सदा टिंगलम्’द्वारे त्यांनी मराठी रंगभूमीवर पदार्पण केले. त्यानंतर भक्ती बर्वे यांच्याबरोबर ‘आई रिटायर होतेय’, आनंद म्हसवेकर लिखित-दिग्दर्शित ‘चॉइस इज युवर्स’ अशा नाटकांमध्ये त्यांनी उल्लेखनीय भूमिका साकारल्या. ‘वादळवाट’, ‘असंभव’, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’, ‘फू बाई फू’, ‘मला सासू हवी’, ‘शुभंकरोती’, ‘या गोजिरवाण्या घरात’ आणि सह्याद्री वाहिनीवरील गोंदवलेकर महाराजांच्या मालिकेच्या माध्यमातून अभ्यंकर घराघरात पोहोचले. […]
नाना पळशीकर हे केवळ आपल्या मुद्राअभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारे असामान्य चरित्र अभिनेते होते. मध्य प्रदेशात जन्म झाल्यामुळे त्यांच्यावर मराठीपेक्षा हिंदी भाषेचे संस्कार खूप होते. नाना पळशीकर यांनी १०० हून अधिक हिंदी व ४ मराठी चित्रपटात कामे केली. त्यांनी चित्रपटसृष्टीत नेहमी चरित्र भूमिका केल्या होत्या. […]
चित्रपटसृष्टीत आणि नाट्यसृष्टीत आपल्या स्वाभाविक अभिनयाने आणि अभिनयावरील निष्ठेने स्वतंत्र स्थान निर्माण करणारे कलावंत म्हणून वामन उर्फ सूर्यकांत तुकाराम मांडरे यांनी आपली खास ओळख निर्माण केली. शिवचरित्रावर आधारित ‘बहिर्जी नाईक’ या भालजी पेंढारकर दिग्दर्शित चित्रपटात त्यांनी बाल शिवाजीची भूमिका केली. या चित्रपटाच्या श्रेयनामावलीपासून भालजी पेंढारकरांनी वामन मांडरे यांचे नाव ‘सूर्यकांत’ ठेवले आणि पुढच्या सगळ्या चित्रपटांत ते ‘सूर्यकांत’ याच नावाने पडद्यावर दिसू लागले. […]
शैलेश भागवत यांचे आकाशवाणी वरून अनेक वेळा सनई वादनाचे कार्यक्रम झाले आहे. त्यांनी भारताबरोबरच दुबई,अमेरिका, युरोप आणि श्रीलंका येथे ही अनेक कार्यकम केले आहेत. शैलेश भागवत यांनी अनेक मोठ्या कलाकारांच्या बरोबर सनईच्या जुगलबंदीचे कार्यक्रम केले आहेत.तसेच परीक्षक म्हणून शैलेश भागवत यांनी अनेक स्पर्धेसाठी काम केले आहे. […]
मजरुह सुलतानपुरी आणि एस. डी. बर्मन यांची जोडी चागलीच जमली होती त्यांनी अनेक हिट गाणी दिली. परंतु त्यांनी नौशाद , मदन मोहन , रोशन , रवि , शंकर जयकिशन , ओ . पी . नय्यर , उषा खन्ना , लक्ष्मीकांत-प्यारेलाल , अन्नू मलिक , आर. डी . बर्मन , राजेश रोशन , जतीन – ललित , लेस्ली लेज लेव्हीज , आनंद मिलिंद , आणि ए . आर. रहमान या संगीतकारांबरोबर गाणी केली. नीट पाहिले तर तीन-ते-चार पिढ्याबरोबर काम केले. संगीतकार बदलले , हिरो बदलले परंतु बदलत्या काळाबरोबर , लोकांबरोबर ते लिहीत राहिले. त्याशिवाय उत्तमोत्तम गजल त्यांनी लिहिल्या. […]
दादासाहेब फाळके यांनी सिनेमा कलेला जन्म दिला. पण त्या कलेचे संगोपन करून ती फुलवली कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी! ‘बाबूराव’ करवीर नगरीतील म्हणजे त्या काळच्या कोल्हापूर संस्थानातील एक असामान्य कलावंत! बाबूरावांचे मूळ नाव बाबूराव कृष्णराव मेस्त्री. लाकूडकाम, मूर्तिकला आणि चित्रकलेतील त्यांचे असामान्य कौशल्य पाहून कोल्हापुरातील चाहत्यांनी त्यांचे नामकरण बाबूराव पेंटर केले. ते एक चतुरस्र् कलाकार होते. […]
रुसी फ्रेमरोज सुर्ती हे भारताकडून क्रिकेट खेळलेच त्याचप्रमाणे गुजराथ, राजस्थान आणि क्वीन्सलँडकडूनही क्रिकेट खेळले. ते ऑल-राउंडर होते. रुसी सुर्ती गोलंदाजी करताना चेंडू डाव्या हाताने सिम आणि स्विंग करत असत तर प्रसंगी स्पिन देखील करत असत. ते उत्तम क्षेत्ररक्षकही होते , एकनाथ सोलकरप्रमाणे. ते स्वतः सर गॅरी सोबर्स ला आदर्श मानत असत. त्यांचा खेळ पाहून त्यांना ‘ गरिबांचा गॅरी सोबर्स ‘ देखील म्हणत. […]
रंगनाथ पठारे हे कथा आणि कादंबरी या दोन्ही साहित्यप्रकारांत ते लेखन करतात. वैचारिक, समीक्षा आणि अनुवाद असे प्रकारही त्यांनी हाताळले. मात्र, ते रमले कथा-कादंबरीत. […]
गिरीश कर्नाड यांनी भारतामधील ज्या अनिष्ट राजकीय घटना झाल्या त्यांचा सतत विरोधच केला आहे. गिरीश कर्नाड हे १९७४-१९७५ मध्ये फिल्म्स अँड टेलिव्हिजन इन्स्टिटयूटचे डायरेक्टर म्हणून होते. त्याचप्रमाणे ते संगीत नाटक अकादमीचे १९८८ ते १९९३ पर्यंत चेअरमन होते तर कर्नाटक अकादमीचे अध्यक्षही होते. […]