मोटारीच्या शंभरहून अधिक वर्षांच्या इतिहासात अनेक कार कंपन्या जन्माला आल्या आणि काळाच्या ओघात विलुप्तदेखील झाल्या. मात्र यातील काही हाताच्या बोटांवर मोजण्याएवढय़ा कंपन्या आहेत ज्यांची प्रतिष्ठा आणि रुबाब हा अद्याप अबाधित आहे. आणि त्यांपैकी एक कंपनी म्हणजे रोल्स रॉयस. […]
लेनिन यांचे मूळ नाव व्लादिमिर इलिच उल्यानोव्ह असे होते. सोवियत संघाच्या पहिल्या सरकारचे अध्यक्ष असलेले लेनिन सोवियत सोशालिस्ट बोल्शेविक पार्टीचे (नंतरच्या सोव्हियेत कम्युनिस्ट पार्टीचे) नेते होते. लेनिन कुशाग्र बुद्धिमत्तेचा साम्यवादी विचारवंत होते. त्यांचे कार्य जगाच्या इतिहासात खरोखरच अतुलनिय व नेत्रदिपक आहे. […]
ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांनी अनेक वर्षे अभिनयविश्वात काम करूनही त्यांना छोट्या छोट्या भूमिकाच मिळत गेल्या. मात्र त्यांच्या वाट्याला आलेली प्रत्येक भूमिका त्यांनी जीव ओतून साकारली. प्रत्येक भूमिकेवर त्यांनी त्यांच्या दमदार अभिनयाची छाप पाडली आणि म्हणूनच त्या आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. […]
कमलाबाई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. हे पुस्तक किर्लोस्करांनी प्रकाशित केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार […]
ज्येष्ठ सिनेपत्रकार दिलीप ठाकूर यांनी ऐशी आणि नव्वदच्या दशकात त्यांनी खूपच मोठ्या प्रमाणावर अनेक दैनिके आणि साप्ताहिकात विविध टोपणनावाने चित्रपटविषयक सदर लेखन केले. राजा दिलीप, स्पॉटबॉय, पिक्चरवाला, सिनेमावाला, राजा चौलकर, राजा फिल्मीस्तानी वगैरे वगैरे टोपणनावानी खूपच मोठ्या प्रमाणावर लेखन केले. […]
गजानन उर्फ डॉ.बाळ फोंडके यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा संपादन, संशोधन, अतिथी प्राध्यापक, पीएच.डी.चे मार्गदर्शक आणि विज्ञान लेखन या क्षेत्रात उमटवला. विज्ञान लेखन ते पूर्वी फावल्या वेळेत करीत असत. पुढे हाच त्यांचा छंद आणि व्यवसाय बनला. […]
दिनकर गंगाधर केळकर म्हणजेच कवी अज्ञातवासी हे कवी, काव्यसंग्रह संपादक, तत्वज्ञानाचे अभ्यासक, म्हणून ओळखले जात असत. केळकर यांनी १९२० पासून विविध वस्तूंचे जतन करण्यास सुरुवात केली मात्र मधल्या काळात म्हणजे १९२२ पासून त्यांनी एका खोलीत त्यांनी वस्तू संग्रहालय सुरु केले. […]
ज्या काळात खुद्द शिक्षणालाच फारसे महत्त्व नव्हते त्या काळात बालशिक्षणाचे महत्त्व लोकांना पटवून देणे हा ‘ वेडेपणा ’ होता. समाजाची ही मानसिकता ताराबाई ओळखून होत्या. त्यामुळे लोकांपर्यंत जायचे तर आपल्या म्हणण्याला शास्त्रीय बैठक असायला हवी हे त्या जाणून होत्या. म्हणूनच ताराबाई आणि गिजुभाईंनी शास्त्राचा आधार असणाऱ्या मॉन्टेसरी शिक्षणपद्धतीचा अभ्यास करून त्यांना भारतीय रूप देण्याचा प्रयत्न केला. […]
सोनोपंत दांडेकर महाराष्ट्रातील विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, सर परशुरामभाऊ महाविद्यालयात तत्त्वज्ञान-विषयाचे प्राचार्य, संत साहित्याचे अभ्यासक, व वारकरी संप्रदायाचे प्रवचनकार होते. […]