नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

क्रिकेटपटू विनू मंकड

प्रत्येक खेळाडूची अशी इच्छा असते की त्यावेळी विस्डेन ( WISDEN ) च्या पहिल्या पाच खेळाडू मध्ये यावे. विनूभाई यांचे नाव १९४७ साली त्यामध्ये आले. त्यांनी फलंदाजी आणि गोलंदाजीमधील दुहेरी कामगिरी करून विक्रम त्यावेळी कसोटी सामन्यांमध्ये रचला तो म्हणजे १००० ध्वनीचा आणि १०० विकेट्सचा. याला इंग्लिशमध्ये ‘ डबल ‘ म्हणतात. त्यांनतर हा विक्रम इयान बोथट ने मोडला. ही दुहेरी कामगिरी त्यांनी २३ कसोटी सामन्यांमध्ये पुरी केली तर एम. ए . नोबल या खेळाडूला २७ कसोटी सामने लागले तर कीथ मिलरला ३३ कसोटी सामने लागले. […]

लेखक पु. भा. भावे

मराठी साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तिमत्त्व म्हणजे पु. भा. भावे. त्यांच्या नावावर सतरा कथासंग्रह आहेत. त्यातील सतरावे वर्ष, पहिले पाप, संस्कार, सुगंध, प्रतारणा, मोहं, फुलवा, नौका, प्रायश्चित्त अशा अनेक कथा आजही आठवतात. . जिथे जिथे दंभ, ढोंग, खोटेपणा आहे तिथे तिथे भाव्यांची लेखणी वज्रप्रहार करते. भाव्यांच्या काही कथांवर चित्रपटही तयार झालेले आहेत. […]

करण चाफेकर

आज भारतात इतक्या वर्षांनंतरही ३ डी प्रिंटर ही संकल्पना रुजू शकत नाही जी प्रदेशात अनेक वर्षे आधी रुजली आहे . याचे एकमेव कारण म्हणजे आपले पुस्तकी ज्ञान. बटन दाबले की यंत्र चालू झाले पाहिजे ही भावना अगदी खोलवर रुजली आहे ती नष्ट झाली पाहिजे यासाठी प्रॅक्टिकल ज्ञान असणे आवश्यक असते. ३ D प्रिंटर झाल्यानंतर करण राजभवनाला ए . पी . जे . अब्दुल कलाम यांची भेटला होता. […]

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू रिची बेनॉ

रिची बेनॉ हे स्पिनर आणि गुगली टाकत होते परंतु ते चेंडूला फ्लाइट द्यायचे आणि त्याचबरोबर योग्य दिशा देत असत त्यामुळे समोरचा फलंदाज सतत दडपणाखाली असायचा. ते आजच्या शेर्न वॉर्न अँशले गिल्स प्रमाणे अराउंड द विकेट टाकायचे . त्याचपप्रमाणे ते त्या काळामध्ये अत्यंत प्रभावी क्लोज फिल्डर होते. […]

सुप्रसिद्ध नाटककार मो. ग. रांगणेकर

मो.ग.रांगणेकर यांनी अनेक नाटके लिहिली , दिग्दर्शित केली. त्यांनी संगीत अमृत , अलंकार , आले देवाजीच्या मना. संगीत आशीर्वाद , कन्यादान , संगीत कुलवधू , लिलाव , भेटला दिली ओसरी , हेही दिवस जातील हे नाटक त्यांनी सहलेखक म्ह्णून वसंत सबनीस आणि ग.दि . माडगूळकर याना घेऊन केले. अशी त्यांनी अनेक नाटके लिहिली . […]

दिग्दर्शक शक्ती सामंता

शक्ती सामंता यांच्या आराधना , अमानुष , अनुराग या चित्रपटांना फिल्मफेअर अवॉर्ड्स मिळाले. इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशनचे ते पाच वर्षे अध्यक्ष होते. त्यांनी अनेक मोठी हुद्द्यांची पदे भूषवली. […]

समीक्षक वा. ल. कुलकर्णी

१९४० साली ‘ समीक्षक ‘ चे संपादक असलेल्या कुलकर्णी यांनी अभिरुची , सत्यकथा , छंद यासारख्या नियतकालिकातून सातत्याने समीक्षा-लेखन केले. त्यांचे समीक्षा लेखनाचे ऐकून आठ संग्रह आहेत. याशिवाय श्री. कृ . कोल्हटकर , ह . ना. आपटे , न.चि . केळकर यांच्या वाङ्मयासबंधी स्वतंत्र लेखन केले. त्यांच्या उत्कृष्ट समीक्षा ग्रंथ म्ह्णून त्यांच्या वाङ्मयीन टिपा आणि टिप्पणी आणि श्रीपाद कृष्ण वाङ्मयदर्शन या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाची पारितोषेंके मिळाली आहेत. […]

सुप्रसिद्ध अभिनेता जॅकी चॅन

वयाच्या सतराव्या वर्षी त्याने ब्रूस ली च्या ‘ फिस्ट ऑफ फ्यूरी ‘ आणि ‘ एंटर द ड्रॅगन ‘त्याने मध्ये स्टंटमन म्ह्णून काम केले. एटर द ड्रॅगन मध्ये तो ब्रूस ली बरोबर फाईट करताना दिसतो. पुढे त्याने अनेक चित्रपटात कामे केली . रश अवर , पोलीस स्टोरी , शांघाय नून , शांघाय नाइट्स अशी कित्येक नावे घेता येतील. तो अनेक वेळा स्टंट करताना जखमीही झालेला आहे. […]

अजरामर महाराष्ट्र गीताचे लेखक राजा बढे

राजा बढे हे संपादक, चित्रपट अभिनेते, गद्य लेखक, नाटककार, कादंबरीकार, कथाकथनकार आणि गायक असले तरी त्यांची खरी ओळख मराठी कवी आणि गीतकार अशीच होती. शाहीर साबळे यांनी तर त्यांचे ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे अजरामर ‘ महाराष्ट्र गीत ‘ गायले. […]

निळ्या डोळ्यांचा जादूगार !

राजकपूर ही खरंतर एक संस्थाच ! निर्विवाद अधिराज्य करणारी, पूर्णतेचा ध्यास घेणारी. कोठलीही तडजोड न करणारी. तो स्वतःच एक पांढरा रुपेरी पडदा होता – बाह्यतः सारं काही मिरविणारा, पण आतमध्ये कुठेतरी खोलवर एक धुमसत्या कलागुणांचा ज्वालामुखी घेऊन हिंडणारा ! “जोकर ” च्या नेमक्या अपयशापाशीच खरंतर राज कपूर संपला. हे मरण जिव्हारी बाळगत त्याने ” बॉबी “, ” सत्यम शिवम ” सारखी आपल्या पराभवाची थडगी बांधली. […]

1 164 165 166 167 168 392
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..