जगदीप यांना भेटलो तेव्हा आम्ही तिघे होतो , त्यांच्याबरोबर जावेद जाफरी होता , स्वाक्षरी घेतल्यावर आमचा फोटो जावेद जाफरी ने काढला. परंतु जावेदच्या स्वाक्षरी घेतली नाही कारण , जगदीप समोर असताना माझ्या डोळ्यासमोर ‘ सुरमा भोपाली ‘ होता. […]
महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करणारे अनेक भक्तीगीते व भावगीतांचे ख्यातनाम गीतकार, नाटककार अनंत पाटील यांचं आगरी-कोळी बोलीभाषेतील साहित्य अतुलनीय आहे. आद्यदेवी एकवीरा आईवर रचलेल्या गाण्यांचा संग्रह अगणित आहे. २००१ साली त्यांना महाराष्ट्ररत्न पुरस्काराने सन्मानित केले गेले. […]
प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व विकास तज्ज्ञ वंदन नगरकर हे कॉर्पोरेट ट्रेनर असून ते गेली अनेक वर्ष याच क्षेत्रात पूर्णवेळ कार्यरत आहेत. ते विनोदी अभिनेते, नाटककार, लेखक राम नगरकर यांचे चिरंजीव आहेत. भाषणाचे प्रभावी तंत्र, भरारी यशाची, टर्निग पॉईट, पालकांचे चुकते कुठे? प्रभावी इंटर टेक्निक्स व स्पिक विव कॉन्फिडक्स (इंग्रजी) अशा सहा पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. अनेक प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये त्यांचे व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर लेख प्रसिद्ध झाले आहेत. […]
२३ मार्च १९३१ हा शहीद दिवस म्हणून ओळखला जातो.. ज्या ऐतिहासिक दिवशी भगत सिंह ,सुखदेव आणि राजगुरु हे तिघे वीर पुरुष हसत हसत, भारतासाठी फासावर चढून शहीद झाले. त्या काळी कितीतरी जवान वीरांनी क्रांतिकारी होण्याचा निर्णय घेऊन कायमचा घराला राम राम केला असणार आणि त्याची दखलही आपल्या इतिहासाने घेतली नसेल. […]
चिन्मय कोल्हटकर हे भारतीय शास्त्रीय संगीताच्या जगातील एक प्रसिद्ध हार्मोनियम वादक आणि संगीतकार. पंडित बिरजू महाराज, उस्ताद झाकीर हुसेन, गानसरस्वती किशोरी आमोणकर या सारख्या दिग्गजांना हार्मोनियम वर साथ दिलेल्या व इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर असलेल्या चिन्मयने मी घेतलेल्या आपल्या मुलाखती मध्ये एक कलाकार त्याच्या इंजिनिअरिंग मधील कौशल्यांचा वापर करून आपल्या साधनेच्या जोरावर शास्त्रीय संगीतासारख्या क्षेत्रामध्ये आपले नाव कसे कमवू शकतो हे दाखवून दिले आहे. […]
जीए कुलकर्णींनी ज्याक्षणी लेखणीला हात घातला तो क्षण मराठी सारस्वताच्या भाळी कायमचा गोंदला गेला. रूढार्थाने गावकुसाबाहेर राहून त्यांनी मराठी भाषेला जागतिक व्यासपीठ दिले. साहित्याचे सगळे लिखित -अलिखित नॉर्म्स न पाळता ते स्वतःच्या उंचीवर पोहोचले. आम्ही सुरुवातीला त्यांना दुर्लक्षाने मारले. त्याकाळात म. द . हातकणंगलेकर त्यांची काहीशी पाठराखण करीत होते. मग आम्ही त्यांच्यावर (सोप्पा असा ) दुर्बोधतेचा शिक्का मारला. (तसा शिक्का ग्रेसही मिरवत आहे. ) पण या दोघांच्या लेखणीतील मराठी भाषा काही औरच आहे – आपल्या पठडीतील नाही. […]
वनवासी कल्याण आश्रमाचे प्रमुख काम म्हणजे आदिवासी समाजास मुख्य प्रवाहात आणणे. समाजाचा सर्वांगीण विकास साधतानाच त्यांच्या ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरांना जपणे. त्यांना येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांच्यातूनच नेतृत्व उभे राहील हे पाहणे. एकूणच आदिवासी समाज आणि अन्य समाज यातील दरी बुजवण्याचे काम वनवासी कल्याण आश्रम मुख्यतः करत आहे. […]
हिंदी चित्रपट संगीतात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा प्रभावी वापर करणाऱ्या संगीतकार नौशाद, यांनी लहान वयात वाद्याचे दुकानात नोकरी करताना वादनात हुकमत मिळवली तेव्हा दुकानाच्या मालकांनी – गुरबत अलींनी तिथली एक उत्तम हार्मोनियम त्या मुलाला भेट दिली. हाच मुलगा पुढे ‘संगीतकार नौशाद अली’ म्हणून नावारूपाला आला! त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांवर सहज दृष्टिक्षेप टाकला तर दिसून येईल की, त्यांचे […]
साधी राहणी, स्वच्छ प्रतिमा आणि हसरा चेहरा…’कॉमन मॅन’चं मूर्तिमंत उदाहरण असलेले गोव्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर सर्वांना नेहमी आपल्यातलेच एक वाटले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, भाजपचा सामान्य कार्यकर्ता, गोव्याचे मुख्यमंत्री ते देशाचे संरक्षण मंत्री असा पर्रीकर यांचा थक्क करणारा प्रवास होता मात्र यशाची अनेक शिखरं गाठूनही त्यांनी त्यांच्यातला ‘कॉमन मॅन’ अखेरच्या श्वासापर्यंत जपला… […]