नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

अभिनेत्री नेहा पेंडसे

नेहाने झी मराठी वाहिनीवरील भाग्यलक्ष्मी ह्या मालिकेत काम करून अभिनयाची सुरूवात केली. त्यांचा जन्म २९ नोव्हेंबर १९८४ रोजी झाला. मराठी तारका आता स्वतःची स्पेस व इमेज प्रमाणेच आपल्या ‘लुक’ बाबतही विशेष काळजी घेऊ लागल्या आहेत. नेहा पेंडसेही त्याला अपवाद नाही. खंर तर, मराठीतील हॉट व बोल्ड अभिनेत्रींमध्ये तिची गणना होते पण त्या प्रकारची कोणतीही भूमिका न […]

प्रयोगशील गायिका नीला भागवत

हिंदुस्तानी शास्त्रीय गायनातील ग्वाल्हेर घराण्याच्या ख्याल शैलीतील बंदिशींच्या माध्यमातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवणा-या एक प्रयोगशील गायिका नीला भागवत यांचा जन्म २९ नोव्हेंबर १९४२ रोजी पुणे येथे झाला. कृष्णराव पंडीत व शरच्चंद्र आरोलकर हे त्यांचे गुरु. त्यांची मीराबाई व कबीराच्या भजन गाण्याबद्धल विशेष प्रसिद्ध आहेत. जयपूर आणि ग्वाल्हेर अशा दोन्ही घराण्यांमधली गायकी त्या शिकल्या, […]

लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर

लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर कलेची हरवली प्रतिष्ठा पुन्हा कमावली आणि पांढरपेशा रसिकांसमोर घायाळ करणारी लावणी मोठय़ा दिमाखात पेश केली ती सुरेखा पुणेकर यांच्या पिढीतल्या कलावतींनी. ‘नुसत्या भुवया उंचावून अन् बोटं हवेत फिरवून अंगभर नऊवारीतही लावणीतली मादकता पेश करता येते. त्यासाठी उघडी पाठ दाखविण्याची गरजही नाही,’ हे पुणेकर यांनी सिद्ध केलं. चांगल्या घरची मंडळी कुटुंबासहित ‘लावणी शो’ पहायला […]

पं.नारायणराव बोडस

शिक्षणतज्ज्ञ व संगीततज्ज्ञ अशी दोन्ही बिरुदं असणारे पं. नारायण बोडस ग्वाल्हेर घराण्याचे गायक होते. त्यांचा जन्म ३१ जानेवारी १९३३ रोजी सांगली येथे झाला. नोकरी आणि शास्त्रीय गायनाचा रियाज अशी कसरत करीत त्यांनी संगीत साधना केली. थेट विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या गायकीशी नाते सांगणाऱ्या बोडस घराण्यात नारायणरावांचा जन्म झाला. त्यांचे संगीताचे शिक्षण वडील लक्ष्मणराव तसेच प्रल्हादपंत गानू […]

ज्येष्ठ सारंगीवादक आणि हिंदूस्तानी शास्त्रीय गायक व संगीतकार उस्ताद सुलतान खान

ज्येष्ठ सारंगीवादक आणि हिंदूस्तानी शास्त्रीय गायक व संगीतकार उस्ताद सुलतान खान यांचा जन्म १५ एप्रिल १९४० रोजी जोधपूर येथे झाला. सुप्रसिद्ध सारंगीवादक साबीर खान यांचे ते वडील आणि गुरू होत. वडील आणि सारंगीवादक गुलाब खान यांच्याकडेच सारंगीवादनाचे शिक्षण त्यांनी घेतले. सारंगीवादनात अनेक नवे प्रयोग करून उस्ताद सुलतान खान यांनी सारंगी या वाद्याला आणि सारंगवादनालाही आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रियता […]

ग. त्र्यं. माडखोलकर

स्पष्टवक्तेपणा, निर्भिडपणा आणि स्वतंत्र विचाराचे प्रकटीकरण हे ज्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य होते ते म्हणजे कादंबरीकार, समीक्षक, वृत्तसंपादक गजानन त्र्यंबक माडखोलकर. त्यांचा जन्म २८ डिसेंबर १८९९ रोजी झाला. माडखोलकरांचे वडील मुंबईत भिक्षुकी करीत. त्यांच्या आई पार्वतीबाई या त्याकाळी शिक्षित असलेल्या स्त्रियांपैकी एक होत्या. आईने केलेल्या संस्कारामुळे लहानपणीच माडखोलकरांनी मराठी आणि संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळवले होते. मुंबईच्या आर्यन एज्युकेशन […]

कवी यशवंत

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ या गाजलेल्या कवितेचे कवी यशवंत त्यांचा जन्म ९ मार्च १८९९ रोजी चाफळ जिल्हा सातारा येथे झाला. कवी यशवंत तथा यशवंत दिनकर पेंढारकर यांना आपण चाफळचे रहिवासी आणि जुन्या कालखंडात सांस्कृतिक उत्थानासाठी भरीव कार्य केलेले पुण्यपुरूष समर्थ रामदास चाफळचे, या योगायोगाबद्दल त्यांना अत्यंत अभिमान वाटायचा. समर्थ रामदास आणि शककर्ते छत्रपती शिवाजीमहाराज ही त्यांची […]

मराठी लेखक दिगंबर बाळकृष्ण मोकाशी उर्फ दि.बा. मोकाशी

दि.बा. मोकाशी हे विसाव्या शतकातल्या श्रेष्ठ मराठी लेखकांपैकी एक होते. त्यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९१५ रोजी उरण येथे झाला. मराठी नवकथेत मोलाची भर घालणाऱ्या प्रारंभीच्या आघाडीच्या कथाकारांत त्यांची गणना होते. दि. बा. मोकाशी हे १९४० नंतर नवकथेत झळकणारे महत्त्वाचे नाव. तीन कादंबऱ्या, तीन ललित व प्रवासवर्णनपर लेखसंग्रह, सात कथासंग्रह आणि पाच बालवाङ्मयपर पुस्तके असा त्यांचा भरगच्च […]

ज्येष्ठ मराठी लेखक आनंद यादव

अतिशय गरीब कुटुंबात जन्माला आलेल्या आनंद यादव यांनी साहित्य क्षेत्रात कादंबरीकार अशी स्वतःची वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली होती. त्यांचा जन्म ३० नोव्हेंबर १९३५ रोजी कोल्हापूर येथे झाला. झोंबी, घरभिंती हय़ा त्यांच्या कादंबऱया वाचकप्रिय ठरल्या होत्या. त्यांच्या झोंबी या कादंबरीला १९९० मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. काव्य, कथा, कादंबरी, समीक्षा, ललित अशा विविध साहित्य प्रकारातही […]

प्रसिद्ध अभिनेते किशोर प्रधान

‘लगे रहो मुन्नाभाई’ मधील ‘खटय़ाळ म्हातारा’ प्रधानांनी रंगविला. भूमिका छोटीशीच असली तरी ते आपली छाप पाडून गेले. ‘जब वुई मेट’मधील त्यांच्या ‘स्टेशन मास्तर’ही प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. पण हिंदी चित्रपट आणि तेथील वातावरणात ते फारसे रमले नाहीत. […]

1 169 170 171 172 173 391
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..