बोलपटाच्या सुरवातीची काही वर्षं गाजवणारी मराठी अभिनेत्री स्नेहप्रभा प्रधान यांचा जन्म १९२० साली झाला. स्नेहप्रभा प्रधान यांचे दहा वर्षांपर्यंतचे त्यांचे बालपण नागपूर, पुणे, मुंबई, कलकत्ता, लाहोर आणि अन्य शहरांत गेले. परिणामी १८ वर्षाच्या होईपर्यंत त्यांना चार भाषा अस्खलित बोलता येऊ लागल्या. त्यांना कुत्र्या-मांजराचे आणि अन्य प्राण्यांचे खूप प्रेम होते. आपण डॉक्टर बनावे अशी त्यांची फार इच्छा होती. […]
बॉलीवूड मधील ट्रेजेडी किंग मुहम्मद युसुफ खान उर्फ दिलीप कुमार यांचा जन्म ११ डिसेंबर १९२२ रोजी मध्ये पेशावर येथे झाला. हिंदी चित्रपटांमध्ये अभिनयाची तहज़ीब आणि तरक्की असलेले अभिनेते म्हणजे दिलीपकुमार. पेशावरमधील किस्सा खवानी बाजारात एका फळविक्रेत्या पठाण कुटुंबात जन्माला आलेल्या युसूफ खान यांनी कधीही हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनय करण्याचे स्वप्न पाहिले नव्हते. वडिलांनी व्यवसायाचे बस्तान बसविल्यानंतर इतर कुटुंबीयांसोबत […]
‘मेरा कलम तो अमानत है मेरे लोगों की, मेरा कलम तो अदालत मेरे जमीर की है’ किंवा ‘अब के हम बिछडे तो शायद कभी ख्वाबों में मिले, जिस तरह सूखे हुए फूल किताबों में मिले’ लिहिणारे शायर अहमद फराज. ऊर्दू शायर अहमद फराज यांचा जन्म १२ डिसेंबर १९३१ रोजी नौशेहरा (पाकिस्तान) येथे झाला. प्रेमातील मिलन, विरह, प्रतीक्षा […]
मराठीतील श्रेष्ठ दर्जाचे गीतकार व भावकवी भा. रा. तांबे यांचा जन्म २७ ऑक्टोबर १८७४ रोजी मध्य प्रदेशातील मुगावली येथे झाला. भा.रा.तांबे हे मराठीतील श्रेष्ठ दर्जाचे गीतकार व भावकवी म्हणून प्रसिद्ध होते. केशवसुत यांच्यानंतरचे मराठीतील महत्वाचे कवी म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. भा.रा.तांबे यांचे संपूर्ण नाव भास्कर रामचंद्र तांबे असे होते. ते ग्वाल्हेर संस्थानाचे राजकवी होते. म्हणून राजकवी […]
सौंदर्याचं दुसरं नाव ऐश्वर्या राय आहे. हे सौंदर्याचं ऐश्वर्य जन्माला आलं तेही एका दाक्षिणात्य कुटुंबातच. मूळची ती मल्याळम. पण तिचा जन्म कर्नाटकातील मंगळूरचा. […]
एकच माणूस डॉक्टर होता, तो वकिलही होता, तो आयपीएस म्हणजे जिल्हा पोलिस प्रमुख दर्जाचा अधिकारी तसंच आयएएस म्हणजे कलेक्टर दर्जाचा अधिकारी होता. याशिवाय तो पत्रकारही होता. इतकंच नाही तो किर्तनकार, आमदार, खासदार आणि मंत्रीही होता. इतक्या पदव्या मिळवणारा ज्ञानयोगी म्हणजे श्रीकांत जिचकार होय. […]
कविवर्य कांतांनी दोन पारतंत्र्यं पाहिली ती म्हणजे एक इंग्रजांचं व दुसरं कांत कुटुंब जिथं रहात होतं, त्या मराठवाडा भूमीवरचं निजामांचं जुलमी पारतंत्र्य. त्यांचा जन्म ६ ऑक्टोबर १९१३ रोजी झाला. जिथं मराठी भाषा बोलण्यासही बंदी होती. अशा परिस्थितीतही कांतांचं काव्यलेखन स्वतःच्याच स्फूर्तिदायक व स्वातंत्र्यांचं स्फुल्लिंग उजळीत समृद्ध होत होतं. पारतंत्र्यातच प्रसिद्ध झालेला कविवर्य कांतांचा ‘रुद्रवीणा’ हा काव्यसंग्रह […]
निरंजन उजगरे यांचा जन्म ६ ऑक्टोबर १९४९ रोजी भुसावळ येथे झाला. त्यांचे शिक्षण मुबंईत झाले. ते व्ही.जे.टी.आय मधून मेकॅनिकल इंजिनीअर झाले . त्यांनी वयाच्या ९ व्या वर्षी पहिली कविता लिहिली. त्यांना हा वारसा त्यांच्या आजोबांकडून मिळाला असावा कारण त्यांचे आजोबा भाषाभास्कर भास्करराव उजगरे , त्यांनी दाते शब्दकोशासाठी नवीन मराठी शब्दांची निर्मिती करून शब्द पुरवले. होते , […]
जुन्या काळातील चित्रपट छायालेखक पांडुरंग सातू नाईक यांना आल्हाददायकता, कल्पकता व वास्तवता ही वैशिष्ट्ये असलेले चित्रपट छायालेखक म्हणून ओळखले जायचे. […]