मराठी रसिकांनी माडगूळकरांच्या काव्यरचनेला मनःपूर्वक प्रतिसाद दिला आणि त्यांच्या गीत रामायणाने तर कीर्तीचा कळस गाठला; त्यांना ‘महाराष्ट्र वाल्मीकी’ ही सन्माननीय पदवी लोकांनी स्वयंस्फूर्तीने दिली. गीतरामायणाच्या गायनाचे शेकडो कार्यक्रम झाले व अजूनही होत आहेत. अन्य भारतीय भाषांत त्याचे अनुवादही झाले. […]
काव्यातून जनजागृती करून राष्ट्रवादाचे स्फुल्लिंग चेतविणा-या मैथिलीशरण गुप्त यांना महात्मा गांधीजींनी राष्ट्रकवी म्हणून गौरविले होते. ३ ऑगस्ट हा त्यांचा जन्म दिवस ‘कवि दिवस’ म्हणून साजरा केला जातो. […]
नंतर १९६० चे दशक त्यांनी अक्षरशः गाजवले. “गोड गोजिरी लाज लाजरी‘, “परिकथेतील राजकुमारा‘, “मैनाराणी चतुर शहाणी…‘ ही कल्ले यांची गाणी चांगलीच गाजली. आधी देवांनी आणि नंतर अनिल मोहिले यांनी कृष्णा कल्ले यांच्याकडून मराठी भावगीते गाऊन घेतली. […]
इंग्रजीतील रोमँटिक प्रवृत्तींच्या काव्यातून प्रखर व्यक्तिवादी, आत्मनिष्ठ जाणीव आणि सौंदर्यवादी दृष्टीकोन या दोन गोष्टी केशवसुतांनी प्रथम मराठीत आणल्या. कविप्रतिभा ही एक स्वतंत्र, चैतन्यमय शक्ती आहे. तिला कुणीही व कसलेही आदेश देऊ नयेत असे ते आग्रहाने सांगत. वर्डस्वर्थ, शेली, किटस् यांसारख्या इंग्रजी कवींच्या कवितांचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव होता. […]
जवळपास पन्नास चित्रपटांचे दिग्दर्शन व शंभराहून अधिक चित्रपटांचे लेखन इतके प्रचंड काम करणारे मा.दिनकर पाटील हे मराठीतील एकमेव ‘साहित्यिक दिग्दर्शक’ असावेत. त्यांना ग. दि. माडगूळकर पुरस्कार, जनकवी पी. सावळाराम पुरस्कार आणि व्ही. शांताराम पुरस्कार असे मानाचे पुरस्कार लाभले. चित्रपट महामंडळाच्या ‘चित्रभूषण पुरस्कारा’चेही ते मानकरी होते. […]
माजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांचा जन्म १९ ऑगस्ट १९१८ भोपाळ येथे झाला. त्यांचे वडील प्रसिद्ध वैद्य होते. त्यांचे भोपाळ आणि आग्रा येथे सुरूवातीचे शिक्षण झाले. अलाहाबाद विद्यापीठातून एम.ए. आणि नंतर लखनौ विद्यापीठातून एल्एल् .एम्;. पुढे केंब्रिज विद्यापीठ आणि लिंकन्स इन (इंग्लंड) यांतून अनुक्रमे पीएच्. डी. व बार अँट लॉ या पदव्या मिळविल्या. […]
भोवताल जंगली श्वापदांचा वावर, शहरी माणसांना बघून दूर पळणारे आदिवासी आणि मूलभूत सुविधांचा प्रचंड अभाव अशा परिस्थितील नुकतेच एम.बी.बी.एस झालेला प्रकाश आमटे नावाचा तरुण आपल्या मंदा आमटे नावाच्या सहचारिणीसह हेमलकस्यात दाखल झाला. तेव्हापासून ते आजगायत या दाम्पत्याची लोकसेवा अखंडितपणे सुरु आहे. […]
समाजातील घटनांवर तिरकस कटाक्ष टाकत विनोदाची शैली हाताळणारा उमदा मराठी चित्रपट दिग्दर्शक म्हणजे उमेश कुलकर्णी. चाकोरीबाहेरचे काहीतरी करतानाच मनोरंजनाचा बाज न बिघडवता चित्रपट रंगवण्यात त्यांचा हातखंडा आहे. […]