१९६० ते १९७२ या काळात मराठी रंगभूमीवर संगीत नाटक परंपरेचे पुनरुज्जीवन घडून आले. या काळात नाट्यसंगीताला नवसंजीवन देणाऱ्या प्रमुख गायक-नटांमध्ये प्रसाद सावकार हे अग्रणी होते. त्यांचा आवाज भरदार व श्रवणमधुर, वाणी स्वच्छ व शुद्घ आणि गायकीत आवश्यक त्या करामती, ताना व हरकती असल्याने त्यांच्या गाण्यांची श्रोत्यांवर सहज छाप पडते. छोटा गंधर्व यांना त्यांनी श्रवणगुरू मानले. […]
रितेश देशमुखची निर्मिती असलेल्या आणि चित्रपटसृष्टीत लक्षवेधी ठरलेल्या ‘यलो’ चित्रपटला यंदाच्या ६१ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात विशेष परिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गौरी गाडगीळ या विशेष मुलीच्या आयुष्यावर आधारित असलेल्या ‘यलो’ चित्रपटाने सर्वांचे लक्षवेधून घेण्यास भाग पाडले. […]
पेशावरहून मुंबईत वडिल पृथ्वीराज कपूरसोबत आलेल्या राजकपूर यांना पृथ्वीराजनी सल्ला दिला होता, की त्याने करिअरची सुरुवात खालच्या स्तरावरुन करावी, तरच तो वरिष्ट पातळी गाठू शकेल. वडिलांचा हा सल्ला मानत १७ वर्षीय राज कपूर यांनी ‘रंजीत मुव्हीकॉम’ आणि ‘बॉम्बे टॉकीज’ फिल्म प्रॉडक्शनमध्ये ‘स्पॉट बॉय’ म्हणून काम करण्यास सुरुवात केली. […]
शंकरदास केसरीलाल हे शैलेंद्र यांचे मूळ नाव. १९४७ साली एका कार्यक्रमात काव्यवाचनाचे त्याला निमंत्रण आले. तेथे त्याने ‘जलता है पंजाब’ ही कविता सादर केली. त्या कार्यक्रमाला राज कपूर उपस्थित होते. त्याने शैलेंद्र यांची कविता ऐकली आणि ते भारावले. शैलेंद्रच्या गाण्याने ‘आरके’ला एक नवी ओळख दिली. केवळ राज कपूरचा गीतकार ही ओळख पुसणारा म्हणून ‘गाइड’चा आवर्जून उल्लेख करावा लागेल. […]
चिमाजी अप्पाना वसईचा वीर म्हणून पण ओळखले जाते. हे पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ भट यांचे पुत्र व बाजीराव पेशव्यांचे धाकटे भाऊ. त्यांनी महाराष्ट्राची पश्चिम किनारपट्टी पोर्तुगीज वर्चस्वातून मुक्त करण्यासाठी यशस्वी मोहीम राबवली. त्यांनी २ वर्ष झुंज देऊन वसईचा किल्ला जिंकला. साष्टी बेटांवर मराठ्यांची सत्ता स्थापन केली. […]
काही दिवसांपूर्वी हा अवलिया, याने ज्या पद्धतीने ठरवलं होतं अगदी त्याच पद्धतीने “गेला”. त्यांचा देह त्यांचा मुलगा आदित्यने नांदेडच्या मेडिकल कॉलेजला “दान” केला. भेटायला घरी गेलो तेंव्हा त्यांच्या पश्चात घरातलं वातावरण “सुतकी” नव्हतं तर कारुण्य पण प्रसन्न होतं. यातच सगळं आलं. […]
चित्रपटसृष्टीतील ज्या कलाकारांनी काळाची पावले ओळखली व त्या बरोबर स्वत:ला जुळवून घेतले ते चित्रपटसृष्टीत कायम स्थिरावू शकले. अरूणा ईराणीने हे ओळखले. त्या स्वत:च्या वयोमानानुसार भूमिका स्विकारत गेल्या. १९९२ मध्ये प्रदर्शीत झालेल्या “बेटा” मधील त्यांची सावत्र आई अप्रतिमच….सुरूवातीला गडद काळी असणारी ही व्यक्तीरेखा हळूहळू बदलत जाते आणि शेवटी मातृत्वाच्या झऱ्यात अकंठ न्हाऊन निघते. या भूमिकेसाठी त्यानां फिल्मफेअरचे उत्कृष्ट सहकलाकाराचा पुरस्कार मिळाला. […]
१९५८ मध्ये साहिरने “वह सुबह कभी तो आएगी”..या चित्रपटासाठी हे गीत लिहले. मुकेशनेही आपल्या काळीज चिरत जाणाऱ्या आवाजात गायले… राजकपूरच्या डोळ्यातले हे स्वप्न आजही अनेकांच्या डोळ्यात तसेच थिजलेले आहे… […]
तुकारामांचे अभंग इंग्रजीत नेऊन त्यांना ‘ग्लोबल’ करणारे लेखक दिलीप पुरूषोत्तम चित्रे अर्थात ‘दि.पु.’,, दिलीप चित्रेंच्या मराठी आणि इंग्रजी कवितांची भारतीयच नव्हे; तर आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली. […]