भेंडीबाजार घराण्याची दुर्मीळ झालेली गायकी तीन तपांच्या निरंतर प्रयत्नांनी पुन्हा प्रस्थापित करून ती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय करण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले. समाजातील सर्व स्तरांमध्ये अभिजात संगीताची आवड निर्माण व्हावी म्हणून विविध नावीन्यपूर्ण कार्यक्रमांची त्यांनी निर्मिती केली. […]
जिवंत अनुभवातून प्रकटलेली जोशी यांची कथा पांढरपेशा मध्यमवर्गीय जीवनाचे, व्यक्ती–व्यक्तींतील भावसंबंधाचे जिव्हाळ्याचे चित्रण करते. परिणामाची उत्कटता, सहजसुंदर संवाद, साधी, प्रसन्न आणि अर्थपूर्ण भाषाशैली ही त्यांच्या कथालेखनाची काही लक्षणीय वैशिष्ट्ये होती. […]
सुरैया हे भारतीय चित्रपटसृष्टीच्या एका स्वप्निल, सुरेल काळाचं मोरपंखी प्रतीक होतं. त्यांचा जन्म १५ जून १९२९ रोजी झाला. ४० आणि ५० च्या दशकात सुरैय्या या प्रचंड लोकप्रिय अशी गायिका/अभिनेत्री होत्या. […]
चांगल्या कामासाठी “नाही” हा शब्द न वापरणाऱ्या ह्या व्यक्तीचा हात बिनशर्त सदैव मदतीसाठी तयार असतो …..हो अगदी बरोबर ओळखलं…”डॉ. प्रकाश बाबा आमटे” या भाऊंच्या जीवनावर आधारित चित्रपटामध्ये आपले नाना पाटेकर ज्यांना “येम्पलवार” म्हणून बोलावतो ना … तीच ही व्यक्ती.‘मनोहर नारायण येम्पलवार’ …… […]
नरेंद्रभाई चुडासामा हे ‘नाना’ चुडासामा म्हणूनच पहिल्यापासून परिचित राहिले. त्यांचा जन्म १७ जून १९३३ रोजी झाला. नाना चुडासामा यांची ओळख आय लव्ह मुंबई, जायन्ट्स इंटरनॅशनल या एनजीओं एवढीच त्यांच्या मालकीच्या रेस्टॉरंटर लावलेल्या फलकांमुळेही होती. मुंबईच्या उच्च वर्तुळात त्यांचा वावर होता आणि त्यांच्या या रेस्टॉरंटध्येही त्याच वर्गाचा वावर होता. परंतु या फलकावर व्यक्त झालेल्या भावना मात्र सामान्य […]
आजवर पुरुष दुहेरीमध्ये ८ तर मिश्र दुहेरीमध्ये १० ग्रँड स्लॅम स्पर्धांची अजिंक्यपदे मिळवणारा लिअँडर पेस हा जगातील सर्वोत्तम दुहेरी टेनिस खेळाडूंपैकी एक मानला जातो. त्यांचा जन्म १७ जून १९७३ रोजी झाला. सर्वाधिक वयामध्ये ग्रँड स्लॅम स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्याचा मान त्याच्याकडेच जातो. भारतामधील आजतागायतचा सर्वात यशस्वी टेनिसपटू असलेल्या पेसला १९९६-९७ मध्ये राजीव गांधी खेल रत्न, १९९० मध्ये […]
मोतीलाल राजवंश उर्फ मोतीलाल हे आपल्या ऐटबाज व्यक्तिमत्त्वाने व सहजसुंदर अभिनयाने रसिकांवर मोहिनी घालणारे अभिनेते अशी त्यांची ओळख होती. त्यांचा जन्म ४ डिसेंबर १९१० रोजी सिमला येथे झाला. मोतीलाल यांचे शिक्षण सिमला येथे झाले. कॉलेज संपल्यावर मोतीलाल मुंबईला नौसेनेत जाण्यासाठी आले होते. पण काही कारणाने ते झाले नाही व हिंदी चित्रपट सृष्टीला एक भारदस्त नट मिळाला. […]
शरद पिळगावकर यांचे गाव ‘पिळगाव’. शरद पिळगावकर मुंबईत छोटामोठा ऑर्केस्ट्रा चालवायचे. यात ते स्वतःही गायचे आणि सचिनची आईदेखील. सचिन यांच्या जन्मानंतर पिळगावकरांचं संगीत क्षेत्रातील बस्तान चांगलंच बसत आलं होतं. चित्रपटसृष्टीमध्ये शरद पिळगावकरांची ब-यापैकी ओळख होवू लागली. कलागुणांना उत्तेजन देणारे आणि कलेचे व्यासंगी असलेल्या पिळगावकरांनी आपल्या मुलातील असलेली चुणुक ओळखली नसती तरच नवल. राजा परांजपे या आपल्या […]
कधीच प्रसिद्धीसाठी काम न करणारा अभिनेता म्हणून अरविंद स्वामी यांचे नाव घेतले जाते. त्यांचा जन्म १७ जून १९७० रोजी झाला. कॉलेज करताना पॉकेटमनी म्हणून मॉडेलिंग करत असताना मणीरत्नम यांची नजर अरविंद स्वामी यांच्यावर पडली. मणिरत्नमच्या रोजा चित्रपटाच्या माध्यमातून अरविंद स्वामीने १९९२ मध्ये बॉलीवूडमध्ये प्रवेश केला होता. आणि एका रात्रीत अरविंद स्वामी स्टार बनले. १९९५ मध्ये त्यांनी […]
आपल्या अभिनयाने आणि प्रभावी दिग्दर्शनाने मराठी सिनेनाट्य सृष्टीत आगळी छाप पाडणारे ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक विनय आपटे यांचा जन्म १७ जून १९५१ रोजी झाला. अभिनय, दिग्दर्शन आणि नेपथ्य यांची चांगली जाणकारी असलेले रंगकर्मी म्हणून प्रसिद्ध असलेले विनय आपटे गेली चाळीस वर्ष मराठी रंगभूमीवर कार्यरत होते. विद्यार्थीदशेत विद्यार्थी संघटनांसाठी काम करता करता ते रंगभूमीवर आले. विजय बोंद्रे यांनी […]