अण्णा हजारे यांचे वडील बाबूराव हजारे तेथील आयुर्वेद आश्रम औषधशाळेत मजूर होते. त्यांचा जन्म १५ जून १९३७ रोजी भिंगार, अहमदनगर जिल्हा येथे झाला. बाबूरावांचे वडील ब्रिटिश फौजेत सैनिक होते. किसन यांना सहा लहान भावंडे होती व कुटुंबाची परिस्थिती हलाखीची होती. त्याच्या आत्याने किसनची देखभाल करण्याचे ठरवले व शिक्षणासाठी त्या त्याला मुंबईला घेऊन गेल्या. सातवीपर्यंत शिकल्यावर घरात […]
“पॉयझंड ब्रेड’ या त्यांनी संपादित केलेल्या दलित साहित्यविषयक ग्रंथाचा जागतिक साहित्य क्षेत्रातही नावलौकिक झाला. दक्षिण आफ्रिकेचे तेव्हाचे अध्यक्ष नेल्सन मंडेला यांनी, १९९८ मध्ये अर्जुन डांगळे दक्षिण आफ्रिकेत गेले तेव्हा आपल्या आत्मचरित्राची प्रत सही करून दिली होती. […]
प्रतिभावान संगीतकार व गायक जितेंद्र अभिषेकींचे मूळ आडनाव नवाथे. पण मंगेशाला अभिषेक करण्याचा अधिकार त्यांच्याकडे आला अन् ते अभिषेकी बनले. त्यांचा जन्म २१ सप्टेंबर १९२९ रोजी झाला. पण ब्राह्मण कुटुंबात जन्माला येऊनही त्यांचे मित्र मात्र समाजाच्या सर्व थरांतले होते. नाव जितेंद्र पण मंगेशीतले सर्वजण त्यांना ‘गंपू’ म्हणून हाक मारायचे. कीर्तनकार असलेल्या वडिलांकडे संगीताचे प्राथमिक शिक्षण झाल्यावर […]
“गंधर्व भूषण” जयराम शिलेदार म्हणजे संगीतनाट्य इतिहासातील सोनेरी पान. चित्रपट आणि नाटक या दोन्ही क्षेत्रांत सारखीच चमकदार कामगिरी करणाऱ्या थोड्या कलावंतांमध्ये “गंधर्वभूषण‘ जयराम शिलेदार यांचे नाव आजही मोठ्या आदराने घेतले जाते. […]
काही माणसांच्या लोकप्रियतेचे रहस्य त्यांच्या कामाइतकेच व्यक्तिमत्त्वातही असते. ते मराठी काव्यविश्वात मनसोक्त मुशाफिरी करणारे कवी सौमित्र उर्फ किशोर कदम यांच्यातपण आहे. किशोर कदम यांना महाराष्ट्राचा लाडका कवी आणि नट म्हणता येईल. संवेदनशील कलावंत म्हणून सुद्धा किशोर कदम यांनी रसिकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. […]
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे संपूर्ण कुटुंब स्वातंत्र्याच्या होमकुंडात होरपळून निघाले होते. नातेवाईक, सगेसोयरे, अगदी जवळच्या लोकांनी सुद्धा त्यांना दूर लोटले होते. सरकारी ससेमिरा मागे लागल्यावर तर लोकांनी त्याच्याकडे जाणेयेणे, बोलणे टाळले होते. क्रांतीवीर गणेश दामोदर तथा बाबाराव सावरकर हे स्वा. विनायक दामोदर सावरकर यांचे थोरले बंधू. […]
अनंत कान्हेरे ह्यांनी नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन ह्याला गोळ्या घालून ठार केले.कलेक्टर जॅक्सनचे जनतेवरील अन्याय वाढत होते, तसेच तो बाबाराव सावरकर (स्वातंत्र्यवीरांचे बंधू) यांच्या तुरुंगवासाला कारणीभूत ठरला होता, म्हणूनच क्रांतिकारकांनी जॅक्सनला यमसदनास पाठवले. […]
महाराष्ट्रातील ग्रिप्स नाट्य चळवळ या जर्मन नाट्यप्रकारातून उपेंद्र लिमये यांच्या कारकिर्दीला सुरवात झाली. पठडीबाहेरील भूमिका करण्यासाठी उपेंद्र लिमये अतिशय प्रसिद्ध आहेत. त्यांनी “मुक्ता” या मराठी चित्रपटातून आपली चित्रपटसृष्टीतील कारकीर्द सुरु केली. […]
मनमोहन यांचे मूळ नाव गोपाळ नरहर नातू. पण लोककवी मनमोहन या नावानेच ते महाराष्ट्रला माहीत आहेत.
शब्दांच्या गोडव्याने गीताला मधाळ करणारा हा कवी. सहज साधे शब्द, मनाला आनंद देणारी आणि जीभेवर रेंगाळत ठेवणारी त्यांची गाणी आजही ऐकायला ताजीतवानी वाटतात. मैत्रिणींनो सांगू नका नाव घ्यायला हे त्यांचं अतिशय गाजलेलं गाणं आजही नववधूला लाजवते. […]
…. या पत्रात स्वातंत्र्यवीर सावरकर वाहिनीला लिहितात कि ‘अशीच सर्व फुलें खुडावी’ आणि श्री रामाच्या चरणी (या देशासाठी ) अर्पण व्हावी. इतकी प्रचंड देशभक्ती असलेल्या सावरकरांना मात्र स्वराज्य मिळाल्यानंतर कोणता सन्मान प्राप्त झाला ? त्यांचे कोणते विचार आम्ही आमलात आणले.उलट सावरकरांना “जातीच्या ” भिंतीत चिणून आम्ही त्यांचा दररोज खून करीत आहोत ” आज स्वतःच्या पोळीवर तूप ओतून घेण्यासाठी धडपडणारे “नेते “पाहिल्यावर सावरकर स्वर्गातून म्हणत असतील… ” हेच फळ का मम तपाला ” […]