इंग्रजांनी चापेकर बंधूंना फासावर चढवले आणि सावरकर मनातून पेटून उठले. त्यांची कुलदेवता भगवती (कालिका) होती. असे म्हणतात की चापेकर बंधूंच्या फाशीनंतर सावरकर घरातील देव्हाऱ्यातील देवी समोर संतापाने स्वतःचे प्राण त्याग करण्याच्या मनःस्थितीत होते. या देशाला स्वातंत्र्य दिलेस तर मी माझी मान सुद्धा कापून तुझ्यावर माझ्या रक्ताचा अभिषेक करीन असे ते देवी समोर बसून गाऱ्हाणे घालीत होते. “देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा सेतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन” अशी शपथ त्यांनी देवी समोर घेतली. मनात जी क्रांतीची ठिणगी पेटली त्यामुळे सावरकर अत्यंत अस्वस्थ होते. […]
सावरकरांनी भोगलेल्या जन्मठेपेत त्यांना जो मानसिक त्रास झाला त्यापेक्षा अधिक त्रास त्यांच्या आत्म्याला देश स्वतंत्र झाल्यावर झाला असेल. त्यामुळे सावरकर प्रेमींना सुद्धा यातना होत आहेत. निवडणुका येतात आणि जातात परंतु त्यानिमित्ताने सामान्य वकूब असलेले जेव्हा महापुरुषांवर चिखलफेक करतात त्यामुळे यातना होतात. काही सामान्य बुद्धिमत्तेच्या राजकारण्यांनी सावरकरांचा उल्लेख “माफीवीर” असा केला आणि समाजात मोठे वादळ उठले. […]
एस.एन.त्रिपाठी यांनी आपल्या प्रदीर्ध कारकिर्दीत अनेक प्रकारे चित्रपट विश्वात काम केले. संगीत दिग्दर्शक, गायक, नट, कथा आणि पटकथा लेखक आणि निर्माते म्हणून काम केले. एस.एन.त्रिपाठी यांची पौराणिक चित्रपटांमधे मात्र मक्तेदारी कुणीच मोडू शकलं नाही. धार्मिक आणि पौराणिक चित्रपट अधिक संख्येने वाट्याला येऊन देखील सातत्याने श्रवणीय गाणी देणारे संगीतकार म्हणून ओळख होती. पौराणिक चित्रपट संगीताचा बादशाह म्हणून ते प्रसिद्ध होते. […]
माझे मन टॉम हँक्स चा धागा पकडून मागे गेले, मी त्याचा Cast Away हा चित्रपट पहिल्यांदा पाहिला त्या काळात. टॉम हँक्स माझ्या मनावर ठसला. मी त्याचे चित्रपट जेव्हा संधी मिळेल तेव्हा पहात गेलो, मोठ्या पडद्यावर असो वा छोटया पडद्यावर. यात काही चित्रपट पुन्हा पुन्हा बघितले कारण मला ते आवडले. प्रत्येक वेळी बघताना मला एक वेगळे परिमाण लक्षात येत गेले. […]
प्राध्यापक भालचंद्र वामन केळकर ऊर्फ मा.भालबा केळकर हे मराठी लेखक, नाट्यअभिनेते व रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांनी प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन ही नाट्यसंस्था स्थापली. ते पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात रसायनशास्त्राचे अध्यापन केले […]
प्रत्येक नटाला मोह पडावा अशी भूमिका म्हणजे “नटसम्राट’मधील गणपतराव बेलवलकरांची..“ती वयाच्या चाळीसाव्या वर्षी इतकी सहजगत्या साकारली की प्रेक्षकांनी या व्यक्तीरेखेला अक्षरश: डोक्यावर घेतले. त्यानंतर यशवंत दत्त यांनी “गगनभेदी” नाटक केले. […]
य.गो. जोशी (यशवंत गोपाळ जोशी) हे मराठीतील उत्तम लेखक आणि पटकथालेखक होते. ’अन्नपूर्णा’, ’वहिनींच्या बांगड्या’, ’शेवग्याच्या शेंगा’, ’माझा मुलगा’ या यशस्वी मराठी चित्रपटांच्या कथा आणि पटकथा य.गो. जोशींच्या होत्या.. […]
मराठी व शास्त्रीय संगीत समीक्षा प्रसिद्ध संगीतसमीक्षक, संगीतरचनाकार, संगीतदिग्दर्शक आणि नाटक, चित्रपट, क्रिकेट इ. विषयांचे चिकित्सक अभ्यासक व लेखक केशवराव भोळे यांच्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. मराठी भावसंगीताचे जनक, नाट्यसंगीत विचाराला योग्य दिशा देणारे व्यक्तिमत्त्व अशीही केशवरावांची ख्याती आहे. […]
विद्या सिन्हा यांचे वडील राणा प्रताप सिंह हे फिल्म निर्माता होते. विद्या सिन्हा यांना वयाच्या १८ व्या वर्षी मिस मुंबईचा किताब मिळाला होता. विद्यासिन्हा यांचे १९७४ साली आलेल्या रजनीगंधा व नंतर छोटीसी बात या दोन चित्रपट गाजले होते. […]