नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

कवी ग्रेस

कवी ग्रेस हे मराठी कवितेच्या प्रांतावर मौलिक ठसा उमटवून गेलेले कवी…’ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता’ या काव्याने घरोघरी पोहचलेले माणिक गोडघाटे ऊर्फ कवी ग्रेस. त्यांचा जन्म १० मे १९३७ रोजी झाला. […]

पं.फिरोज दस्तूर

किराणा घराण्याचे जेष्ठ गायक पं.फिरोज दस्तूर यांचा जन्म ३० सप्टेंबर १९१९ रोजी झाला.
पं. फिरोज दस्तूर हे एक खूप मोठे पण तसे सर्वसामान्यांसमोर फारसे न आलेले कलावंत. १९३० च्या दरम्यान पं.फिरोज दस्तूर हे भारतीय चित्रपट सृष्टीत अभिनेते म्हणून काम करत होते. […]

प्रतिभावंत कवी जगदीश खेबूडकर

वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी गांधी हत्याकांडात त्यांचे घर जळाले अन् त्या ज्वाळा पाहून घरासमोरील झाडाखाली बसून त्यांना आयुष्यातली पहिली कविता ‘मानवते तु विधवा झालीस’ सुचली. त्यांचा जन्म १० मे १९३२ रोजी झाला. […]

यदुनाथ दत्तात्रय थत्ते

‘साधना’ला मराठी वृत्तपत्रसृष्टीत वैचारिक प्रतिष्ठा मिळवून देणारे संपादक यदुनाथ दत्तात्रय थत्ते यांचा जन्म ५ ऑक्टोबर १९२२ रोजी झाला. […]

बॉलीवूड अभिनेता मॅक मोहन

मैक मोहन यांचे खरे नाव मोहन माखीजानी होते. त्यांचा जन्म २४ एप्रिल १९३८ रोजी कराची येथे झाला. ‘शोले’ सिनेमात सांभा भूमिका साकारून लोकप्रियता मिळवणा-या अमजद खान यांनी विचारलेला ‘अरे ओ सांभा, कितना इनाम रखा है सरकार हम पर? व मॅक मोहन यांनी दिलेले उत्तर ‘पूरे पचास… हा डायलॉग अजूनही फेमस आहे. […]

प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना सितारादेवी

सितारादेवी यांची गेल्या सहा दशकांहून अधिक काळ प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना अशी ख्याती राहिली होती. सितारा देवींनी देशविदेशांमध्ये कथ्थक नेले. लोकप्रिय केले आणि कथ्थकला रसिकांच्या मनात कायमसाठी एक उन्नत स्थान त्यांनी मिळवून दिले. […]

किराणा घराण्याचे प्रवर्तक अब्दुल करीम खाँ

अब्दुल करीम खाँ साहेबांना म्हैसूर राज दरबारात गायनासाठी निमंत्रित करण्यात आले होते. तिथे त्यांची गाठ कर्नाटकी संगीतातील अनेक सुप्रसिद्ध गायक प्रभृतींशी पडली. त्यांच्या गायनाचा प्रभाव अब्दुल करीम खाँ साहेबांच्या गायकीवरही पडला. त्यांनी कर्नाटकी संगीताचा कसून अभ्यास केला. कर्नाटकी संगीतातील अनेक वैशिष्ट्ये त्यांच्या गायकीतही दिसून येत असत. […]

कथा, पटकथा, संवाद लेखक व कलाकार प्रदीप कबरे

कथा, पटकथा, संवाद लेखक व कलाकार प्रदीप कबरे हे मुळातच अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. अभिनेता म्हणून त्यांनी नाव कमावलं आहेच, पण लेखक म्हणूनही कामगिरी केली आहे. त्यांनी आत्तापर्यंत दोन नाटकं लिहिली आहेत. तसंच अंदाजे अडीच हजार रेडिओ कार्यक्रम लिहिले आहेत. पाच हजारांहून अधिक रेडिओ कार्यक्रमांचं सादरीकरण केलं आहे. सहा-सात माहितीपटांचं लेखन केलं आहे. शंभरेक जिंगल्स लिहिल्यात. दोन चित्रपटांची कथा-पटकथा-संवाद लिहिले आहेत. एका चित्रपटासाठी गीतलेखनही केलं आहे. […]

कूचिपूडि, भरतनाट्यम् नर्तकी मल्लिका साराभाई

मल्लिका साराभाई या नर्तकी मृणालिनी साराभाई व वैज्ञानिक विक्रम साराभाई यांची कन्या. समांतर सिनेमा पासून आपल्या करीयरची त्यांनी सुरवात केली. त्यांचा जन्म ९ मे १९५४ रोजी झाला. मल्लिका साराभाई यांनी पीटर ब्रुक यांचे नाटक महाभारत मध्ये द्रोपदी ची भूमिका केली होती. याच नाटकावर नंतर चित्रपट बनवला गेला होता. मल्लिका साराभाई यांनी भारतात व परदेशात अनेक कार्यक्रमात भाग घेतला […]

एव्हरेस्ट शिखरावर यशस्वी चढाई करणारा पहिला नेपाळी शेर्पा तेनझिंग नोर्गे

एव्हरेस्ट शिखरावर यशस्वी चढाई करणारा पहिला नेपाळी शेर्पा तेनझिंग नोर्गे (Tenzing Norgay) यांचा जन्म २९ मे १९१४ रोजी झाला. हिमालयातील एव्हरेस्ट या सर्वोच्च शिखराला नेपाळी भाषेत सागरमाथा म्हणजे आकाशदेवता म्हटले जाते; तर तिबेटीमध्ये या शिखराला चोमुलुंग्मा म्हणजे विश्वदेवता म्हटले जाते. हिमालयाची भव्यता, तेथील गूढगंभीर आणि अंतर्मुख करणारे वातावरण, निसर्गाची हरक्षणाला पालटणारी रूपे आणि नजर बांधून ठेवणारे दिव्य […]

1 189 190 191 192 193 391
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..