अव्वल इंग्रजीतील मराठी व्याकरणकार, ग्रंथकार आणि कळकळीचे धर्मसुधारक पांडुरंग दादोबा तर्खडकर यांचा जन्म ९ मे १८१४ रोजी झाला. प्राथमिक शिक्षण घरी वडिलांजवळ तसेच खाजगी शाळांतून आणि माध्यमिक शिक्षण ‘बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’ च्या शाळेत झाले. गुजराती व फार्सी भाषा त्यांना अवगत होत्या. सरकारी नोकरीत शिक्षक, अधीक्षक, उपजिल्हाधिकारी अशा विविध हुद्यांवर त्यांनी काम केले, सेवानिवृत्तिनंतर अल्पकाळ ओरिएंटल ट्रान्स्लेटरच्या हुद्यावर […]
नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म ९ मे १८६६ रोजी झाला. गोपाळ कृष्ण गोखले हे भारतामधील ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध कायदेशीर राजकारणाच्या मार्गाने स्वातंत्र्यलढ्याचा पाया घालणाऱ्या राजकीय व सामाजिक नेत्यांपैकी एक होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारत सेवक समाज या संघटनांचे ते आघाडीचे नेते होते. रत्नागिरी जिल्ह्यातील कोतळूक या खेड्यात जन्मलेल्या गोखले यांचे बालपण कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षणही […]
तलम, तरल, रेशमी आवाजाचा गायक तलत महमूद यांचा जन्म २४ फेब्रुवारी १९२४ रोजी झाला. तलत या नावातच एक तलम, तरल, रेशमी अनुभव मिळतो. तलत यांचा दु:खाचा आवाज होता. त्याही पेक्षा आपल्या मनातल्या प्रत्येकच नाजूक, तरल भावनेचा तो आवाज होता. तलत यांच्या आवाजाला मर्यादा होत्या. तरी देखील जगभरातल्या चाहत्यांचा विचार केला तर या सर्व गायकांपेक्षा तलतच्या चाहत्यांची संख्या काकणभर […]
श्रीमंत बाजीराव पेशवे यांची देशाला ओळख ‘अपराजित योद्धा अशी आहे. बाजीरावांनी त्यांच्या २० वर्षांच्या कारकिर्दीत ४१ लढाया लढल्या आणि त्या सर्वच्या सर्व जिंकल्या. २८ एप्रिल २०१९ ला रोजी बाजीराव पेशवे यांची २७९ वी जयंती साजरी करण्यात आली. […]
हिंदुस्थानी आणि ब्रिटिश चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाची छाप अभिनेते सईद जाफरी यांनी पाडली होती. जाफरी यांची ओळख जन्माने भारतीय असलेला ब्रिटिश अभिनेता ही होती. शॉन कॉनरी, पीअर्स ब्रॉस्नन सारखे अभिनेते आणि जेम्स आयव्हरी, रिचर्ड अटेन्बरोंसारख्या गाजलेल्या हॉलिवूड दिग्दर्शकांबरोबर काम करणारा पहिला भारतीय अभिनेता अशी त्यांची ओळख निर्माण झाली होती. […]
ग्वाल्हेरला भरलेल्या त्रेचाळीसाव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान कुसुमावतींना मिळाला. विदर्भातील प्रसिद्ध वकील रावबहादुर रामकृष्ण रावजी जयवंत ह्यांच्या त्या कन्या. तसेच सुप्रसिद्ध कवी आत्माराम रावजी देशपांडे ऊर्फ कवी अनिल यांच्या पत्नी. […]
मी कायमस्वरुपी मुंबईत मुक्कामाला असलो तरी, माझं मूळ असलेल्या सिंधुदुर्गातल्या कला जगताशी मी बऱ्यापैकी परिचित आहे. मला मुळातच कलांची आवड असल्याने, एखाद्या कलावंताशी ओळख असणं, हा मी माझा बहुमान समजतो. कला याचा अर्थ माणसाला व्यक्त होण्यास वाव देणारं लेखन, कवीता, चित्र-शिल्प-नाट्य इत्यादी कोणतंही माध्यम. सिंधुदुर्गातल्या अशा बहुतेक क्षेत्रातल्या कलावंतांना मी ओळखतो, पण इंद्रजीत खांबे हे नांव मी प्रथमच ऐकलं होतं आणि ते ही फोटोग्राफी क्षेत्रातलं..! […]
लहान मुलांमध्ये जन्मतः असलेल्या हृदयातील दोषावर काम करून ते दूर करण्यासाठी एक प्रणाली विकसित करून अनेकांना जीवनदान देणारे डॉ. आल्फ्रेड ब्लॅलॉक विसाव्या शतकातील अग्रगण्य शल्यविशारद होते. शल्यचिकित्सेतील भरीव कामगिरीसाठी कित्येकवेळा नोबेल पारितोषिकासाठी त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली. १९५० सालापर्यंत ब्लॅलॉकनी जन्मतः असलेला हृदयातील दोष दूर करणार्या एक हजारपेक्षा जास्त शस्त्रक्रिया केल्या. […]
अनेक दशके पंडित सी.आर.व्यास यांनी जुन्या आणि नविन रागांमध्ये बंदिशांची रचना केली. देशभरातील अनेक गायकांनी ह्या रचना गायलेल्या आहेत. ‘राग सरिता’ ह्या पुस्तकामध्ये त्यांच्या कार्याचा समावेश करण्यात आलेला आहे. […]