“आहुती’, “गुन्हेगारी आणि शासन’, “गुन्हेगारांचे जग’, “पुरुषप्रधान संस्कृती’, “दुर्दैवाशी दोन हात’ अशा अनेक पुस्तकांच्या लेखिका सरोजिनी मधुसूदन शारंगपाणी यांचे चिरंजीव श्रीनिवास शारंगपाणी यांनी जागवलेल्या त्यांच्या आठवणी… […]
प्रवीण दवणे… वक्ते, साहित्यिक, मराठीचे अध्यापक आणि एक मनमोकळं व्यक्तिमत्त्व. जे त्याच्या छायाचित्रातून जाणवत राहते… पासष्टहून अधिक पुस्तकांसाठीचं लिखाण, अनेक कवितासंग्रह, नाटकांचं लिखाण, तब्बल सवाशेहून अधिक मराठी चित्रपटांसाठीची गीतरचना, अडीचशेहून अधिक कॅसेटस्साठी दोन हजांहून अधिक भावगीतं आणि भक्तिगीतांचं लिखाण, सतत दौऱयावर राहून दर्दी प्रेक्षकांची गर्दी खेचणाऱया कार्यक्रमांचा सूत्रधार आणि सुमारे चार दशकं मराठीचे खमके अध्यापक म्हणून […]
१६४२ मधे गॅलिलीयो मृत्यू पावला त्याच वर्षी न्यूटन जन्मला. ज्या तारखेला (८ जानेवारी) गॅलिलीयो मृत्यू पावला त्याच तारखेला हॉकिंग जन्मला, ३०० वर्षाच्या अंतराने १९४२ मधे. हॉकिंग याचा उल्लेख योगायोग असाच करतात. जे विश्वाच्या उत्पत्तीचा शोध घेत आहेत ते अशा घटनांना नियमात कसे बसवतील? […]
आपल्या अभिनयानं आणि मुख्यतः आपल्या ‘कल्याणी’ या पात्रामुळे अवघ्या महाराष्ट्रभर घराघरात पोहोचलेली गडकरींची पणती म्हणजे जुई गडकरी. मराठी साहित्य आणि नाटय़सृष्टीत मोलाचं योगदान केलेल्या राम गणेश गडकरींची ‘एकच प्याला’, ‘प्रेमसंन्यास’, ‘पुण्यप्रभाव’ आणि ‘भावबंधन’ ही नाटकं, तर ‘वाग्वैजयंती’ हा काव्यसंग्रह आजही रसिकांवर गारुड घालत आहे. याच गडकरींचा मराठी धागा पुढे कायम राखत आपल्या अभिनयानं आणि मुख्यतः आपल्या […]
नटसम्राट’ हा शब्द उच्चारला की डोळ्यासमोर उभे राहते ते एकमेवाद्वितीय व्यक्तिमत्व म्हणजे ‘डॉ. श्रीराम लागू’ भारतीय चित्रपटाच्या इतिहासातले एक तेजस्वी अभिनय पर्व असलेले, नटसम्राट गणपतराव बेलवलकरांसारखी अनेक पात्रे रंगभूमीवर चिरंजीव करणारे, अनेक नाटककारांना प्रयोजन देणारे, व्यक्तिमत्व म्हणजे, डॉक्टर श्रीराम लागू. मराठी रंगभूमीवरचा नटसम्राट या शब्दात श्रीराम लागूंचे वर्णन करता येईल. भूमिका जिवंत करणे हा वाक्प्रचार लागूंच्या बाबतीत अगदी खरा ठरतो. मराठी रंगभूमी, चित्रपट, हिंदी चित्रपट यात यशस्वी मुशाफिरी करणारे लागू खऱ्या अर्थाने रमले ते नाटकातच. […]
`डोंबिवली फास्ट’मुळे माधव आपटे म्हणून घराघरात पोहोचलेले मराठी चित्रपटसृष्टीतील प्रख्यात अभिनेते संदीप कुलकर्णी यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये अभिनयाने आपला वेगळा ठसा उमटवला आहे. […]
हृदय-प्रत्यारोपणाच्या इतिहासात डॉ. नॉर्मन शुमवे यांचे नाव सोनेरी अक्षरांत लिहिलेले आहे. त्यांनी अमेरिकेतील स्टॅनफोर्ड येथील पहिले हृदय-प्रत्यारोपण केले. त्याआधी बराच काळ ते यावर काम करीत होते. या विषयावर पथदर्शी संशोधन व कार्य करण्याचे श्रेय शूमवे यांच्याकडे जाते. डॉ. ख्रिश्चन बर्नार्ड यांनी शुमवे यांच्याकडे हृदय-प्रत्यारोपणाचे प्रशिक्षण घेतले असे म्हटले तर ते फारसे वावगे ठरणार नाही. मानवी हृदय-प्रत्यारोपणाची […]
लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर… खास लावणीचा शृंगार, नखरे… कॅमेऱयाने टिपलेल्या तिच्या अदा… कारभारी दमानं’, ‘या रावजी, तुम्ही बसा भावजी’, ‘पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा’, ‘झाल्या तिन्हीसांजा’ अशा अनेक लावण्यांनी अवघ्या महाराष्ट्रावरच नव्हे तर सातासमुद्रापार संपूर्ण जगावरही भुरळ पाडली. महाराष्ट्राचा अतिशय लोकप्रिय लोककला प्रकार म्हणून ओळखली जाणारी लावणी ही केवळ नृत्यकलेतून सादर न करता ती आपल्या अदाकारीने […]
लहानपणी माझा आजा म्हणजे माझा बा सांगायचा . नंतर आई सांगायची ,नारायण टिनपट्याबद्दल .’टिनपट्या ‘ या विचित्र नावानं उत्सुकता वाढवली होती . शालेय जीवन …कॉलेजमुळे हा विषय मागे पडला .जरा मोठा झालॊ . नोकरीतून सुट्टीच्या काळात शेगाव बु ,म्हणजे माझ्या गावी गेलो की आई नातवंडाना कथा सांगायच्या वेळी ……आम्ही तिला टिनपट्याबद्दल सांगायला आग्रह करायचो . […]
हिमालयातील एव्हरेस्टसह जगातील चार सर्वोच्च शिखरे पादाक्रांत करणारा आनंद बनसोडे हा सोलापूरचा तरुण महाराष्ट्रातील तमाम युवकांना प्रेरणावत ठरला आहे! त्याची शिखर सर करण्याची जिद्द आणि त्याने त्यासाठी केलेला संघर्ष जाणून घेताना आनंद बनसोडेबद्दल कौतुकच मनी दाटते. […]