नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

अॅडगुरु आणि अभिनेते अशी ओळख असलेले अॅलेक पद्मसी

अभिनेता अशी ओळख असली तरी त्यांची जाहिरात क्षेत्रातील गुरु म्हणून ख्याती होती. त्यांचा जन्म ५ मार्च १९३१ रोजी झाला. अॅडगुरु असलेल्या पद्मसी यांची भारतातील अव्वल दर्जाची जाहिरात एजन्सी होती. त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक प्रसिद्ध कंपन्यांसाठी जाहिराती बनविल्या. ‘गांधी’ या ऐतिहासिक चित्रपटात मोहम्मद अली जिनाह यांची भूमिका पद्मसी यांनी केली होती. ‘ब्रँड फादर ऑफ इंडियन अॅडव्हर्टायजिंग’ असे त्यांना ओळखले […]

ईमेलचे जनक रे टॉमिल्सन

अमेरिकेतील प्रोग्रामर रे टॉमिल्सन बोस्टनमधील एका रिसर्च कंपनीत काम करत असताना, रे टॉमिल्सन यांनी १९७१ मध्ये पहिला ईमेल पाठवला आणि ईमेलद्वारे संभाषणाला सुरुवात झाली. त्यांचा जन्म २३ एप्रिल १९४१ रोजी झाला. रे टॉमिल्सन यांनी ही कामगिरी केली, तेव्हा इंटरनेटची सुरुवादेखील झाली नव्हती. मात्र जगात ही क्रांती घडायला पुढची २० वर्षं जावी लागली. टॉमिल्सन यांनी @ या साईनचा वापर […]

“बॅटरीचा” संशोधक अलेझांड्रो व्होल्टा

त्यांचा जन्म १८ फ़ेब्रुवारी १७४५ रोजी इटलीमधील कोमो इथं झाला. त्याला लहानपणी चर्चमधील पाद्रयांनी शिकवलं. तो इतका हुशार होता की पुढे जाऊन त्यानंही पाद्रीच बनावं यासाठी त्याच्या शिक्षकांनी चक्क त्याला चॉकलेट्स वगैरेंची ‘लाच’ द्यायचा अयशस्वी प्रयत्न करून बघितला. पण त्याच्या घरच्यांना हे कळताच त्यांनी त्याची शाळाच बदलून टाकली! शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याला विजेशी संबंधित गोष्टीविषयी अभ्यास […]

हिंदी चित्रपट सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जलाल आगा

जलाल आगा हे सुप्रसिद्ध विनोदी नट आगा यांचे चिरंजीव. उच्च शिक्षणानंतर पुण्यातील F.T.I मध्ये शिक्षण घेतले. मा जलाल आगा यांनी मुगल-ए-आझम या चित्रपटातल्या बालपणातल्या जहांगीराची भूमिकेद्वारे हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. जलाल आगा यांनी १९६७ साली के.ए.अब्बास यांच्या बंबई रात की बाहो में या चित्रपटा द्वारे हिरो म्हणून पदार्पण केले. त्यांचे शोले मधील गाणे मेहबुबा मेहबुबा […]

जेष्ठ किराणा घराण्याच्या गायिका, गंगूबाई हनगळ

“कन्नड कोकिळा” अशी गंगूबाई हनगळ यांची ओळख होती, त्यांचे वडील चिक्कूराव नाडगीर व्यवसायाने वकील होते. त्यांची आई अंबाबाई कर्नाटकी पद्धतीचे गाण छान गात असे. त्यांचा जन्म ५ मार्च १९१३ रोजी धारवाड येथे झाला. पण गंगूबाईंना मात्र उत्तर हिंदुस्थानी संगीतच जास्त आवडे. गंगुबाईंचा कल पाहून त्यांच्या आईनेही संगीत क्षेत्रात त्यांची प्रगती व्हावी म्हणून खूप मेहनत घेतली. गंगूबाईंच पाळण्यातील […]

पहिली मानवी हृदय-प्रत्‍यारोपण शस्‍त्रक्रिया करणारे डॉ. ख्रिश्‍चन बर्नार्ड

पहिली मानवी हृदय-प्रत्‍यारोपण शस्‍त्रक्रिया करणारे डॉ. ख्रिश्‍चन बर्नार्ड अशी त्‍यांची ओळख निर्माण झाली असली तरी त्‍यापूर्वी देखील त्‍यांनी महत्त्वाचे संशोधन केले होते. डॉ. बर्नार्ड यांनी धाडसीपणे निर्णय घेऊन ही शस्‍त्रक्रिया केली. अशक्‍य वाटणारी गोष्‍ट त्‍यांनी शक्‍यतेच्‍या आवाक्‍यात आणली. या शस्‍त्रक्रियेला जगात उदंड प्रसिद्धी मिळाली व त्‍याचबरोबर डॉ. बर्नार्डही प्रकाशझोतात आले. […]

मोहक मोहिनी – गिरिजा जोशी

अभिनेत्री गिरिजा जोशी तिचा उठावदार बोलका चेहरा, पारंपरिक आणि पाश्चिमात्य या दोन्ही पेहरावांसाठी अनुरूप आहे. ‘गोविंदा’, ‘प्रियतमा’, ‘धमक’, ‘देऊळ बंद’, ‘वाजलंच पाहिजे’ यासारख्या रूपेरी पडद्यावरच्या कलाकृतींमधून वेगळ्या धाटणीच्या भूमिकांतून नेहमीच अभिनेत्री म्हणून समोर आलेल्या गिरिजा जोशीने अल्पावधीतच आपला चाहता वर्ग तयार केला. पदार्पणापासूनच तगडय़ा कलाकारांसोबत अभिनय साकारलेल्या गिरिजाने आपला कसदार अभिनय सादर करत अभिनय क्षेत्रावर आपली […]

वैज्ञानिक व प्रत्‍यारोपण-शल्‍यविशारद डॉ. व्‍हालिदीमीर डेमीखॉव्‍ह

डॉ. व्‍हालिदीमीर डेमीखॉव्‍ह सोव्हिएत युनियन मधील आघाडीचे वैज्ञानिक व प्रत्‍यारोपण-शल्‍यविशारद होते. त्‍यांनी श्‍वानहृदय व फुफ्फुसांचे प्रत्‍यारोपण तर केलेच पण एका श्‍वानमस्‍तकाचे प्रत्‍यारोपणही केले. त्‍यामुळे त्‍यांचे नाव अधिकच चर्चेत आले. त्‍यांच्‍या या प्रयोगापासून स्‍फूर्ती घेऊन डॉ. रॉबर्ट व्‍हाईट यांनी तसाच प्रयोग माकडांवर करून पाहिला. डॉ. डेमीखॉव्‍ह यांनी ‘ट्रान्‍सप्‍लॅन्टोलॉजी’ ह्या शब्‍दाला जनकत्‍व दिले. […]

मेहनती… डॅशिंग – संतोष जुवेकर

मराठी सिने इंडस्ट्रीत गेल्या चार-पाच वर्षांत आमूलाग्र बदल पाहायला मिळालेत. मराठी कलाकार अपडेट झालाय, त्याचा कॉस्च्यूम सेन्स वाढलाय, त्याचं फॅशन स्टेटमेंट बदललंय अशी वाक्यं आपण या काही वर्षांत नेहमी ऐकतो. या इंडस्ट्रीचा चेहरामोहरा अशा पद्धतीने बदलायला लावणारी काही मोजकी तरुण नावं कारणीभूत ठरली आहेत. या तरुणांच्या यादीत संतोष जुवेकरचा क्रमांक वरच्या यादीत लागेल. […]

मराठी साहित्य विश्वात वादळ निर्माण करणारे साहित्यिक भाऊ पाध्ये

भाऊ पाध्ये यांचे लेखन थेट वास्तवाला भिडणारे असे. मुंबईतील संक्रमणकाळ त्यांच्या लेखणीने नेमकेपणाने व बारकाव्यानिशी टिपला होता. पाध्येंनी मुंबईचे उघडे नागडे विश्व जसे आहे तसे मांडले. कुठलाही निष्कर्ष काढण्याच्या भानगडीत ते पडले नाही. त्यांनी आपल्या उभ्या आयुष्यात मुंबईत व एकंदरीत शहराच्या आरशात पाहिलेले, अनुभवलेले, मनावर कोरले गेलेले प्रसंग, घटना अभिव्यक्त केल्या आहेत. […]

1 196 197 198 199 200 391
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..