नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

प्रसिद्ध फारसी आणि उर्दू कवी गालिब

मिर्ज़ा असद-उल्लाह बेग ख़ां उर्फ “ग़ालिब” हे एक प्रसिद्ध फारसी आणि उर्दू कवी होते. त्यांचा जन्म २७ डिसेंबर १७९७ रोजी झाला. ते सुधारक वृत्तीचे, सर्व धर्मांना समान मानणारे, कर्मठ नसलेले, नमाज न पढणारे, रोजा न ठेवणारे, कलेचे आसक्त, रसिक व्यक्ती होते. गालिब केवळ चार वर्षांचे असतांना त्यांचे वडील वारले म्हणून आजोबा आणि काकांनी पालनपोषण केले. लहानपणी त्यांनी इस्लामचे […]

कथालेखिका शांता हरी निसळ

ज्येष्ठ संगीत समीक्षिका, कथाकार, कादंबरीकार आणि नाटककार व ‘उंबरठा’ या चित्रपटाच्या कथालेखिका शांता हरी निसळ यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९२८ रोजी पुणे येथे झाला. शांता निसळ या ज्येष्ठ संगीत समीक्षिका, कथाकार, कादंबरीकार आणि नाटककार म्हणून प्रसिद्ध होत्या. शांता हरी निसळ या पूर्वाश्रमीच्या शांता व्यंकटेश जोशी. अगदी लहानपणापासून त्यांचा स्वभाव धडपडा, बंडखोर होता. त्यांनी आपल्या विद्यार्थिदशेत त्यांनी ‘चले जाव’ चळवळीतही भाग घेतला […]

रणधीर कपूर

रणधीर कपूर यांची एक हिंदी चित्रपट प्रसिद्ध अभिनेता व करीश्मा व करीना कपूर यांचे वडील व राजकपुर यांचा मुलगा अशी ओळख आहे. त्यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९४७ रोजी झाला. रणधीर कपूर यांना चित्रपट क्षेत्र हे वारसाने मिळाले आहे. त्यांचे वडील राज कपूर हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार होते. तर रणधीर कपूर यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात ‘श्री ४२०’ चित्रपटात बालकलाकार […]

भारतीय अभिनेता, चित्रपट दिग्दर्शक व निर्माता आशुतोष गोवारीकर

आशुतोष गोवारीकर यांनी उमेदवारीच्या काळात सी.आय.डी.मालिकेतून शिवाजी साटम यांच्या साहाय्यकाचे काम केले. त्यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९६४ रोजी झाला. अमोल पालेकरच्या ‘कच्ची धूप’ या मालिकेतून आशुतोष अभिनेता म्हणून लोकांना प्रथम दिसले. पुढे तो ‘होली’, ‘गूँज’, ‘कभी हां कभी ना’, ‘सलीम लंगडे पे मत रो’ सारख्या सिनेमांत काम केले. पण त्यांना अभिनय-कारकिर्दीत घट्ट मुळे रोवता आली नाहीत. […]

किराणा घराण्याचे गायक सुरेशबाबू माने

पंडित सुरेशबाबू माने ऊर्फ अब्दुल रहमान यांचा जन्म किराणा घराण्याचे उस्ताद अब्दुल करीम खाँ साहेब व ताराबाई माने या दांपत्याच्या पोटी रोजी झाला. ताराबाई ह्या सरदार मारुतीराव माने यांच्या सुकन्या होत. मारुतीराव माने हे बडोदा संस्थानाच्या राजमातांचे बंधू होते. अब्दुल करीम खाँ हे त्या राजदरबारात गायक होते व ताराबाईंना गाणे शिकवत होते. दोघांचे प्रेम जुळले व […]

मराठी कवयित्री, लेखिका, नाटककार पद्मा गोळे

पद्मा गोळे या मराठी कवयित्री ‘पद्मा’ ह्या नावाने काव्यलेखन करत असत. त्यांचा जन्म १० जुलै १९१३ रोजी झाला. त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रीतिपथावर हा १९४७ साली प्रकाशित झाला. कविता संग्रहांशिवाय त्यांनी रायगडावरील एक रात्र, स्वप्न, नवी जाणीव या नाटिकाही लिहिल्या. त्यांनी लिहिलेली वाळवंटातील वाट नावाची कादंबरीही प्रकाशित झाली. याशिवाय स्वप्न (१९५५), समिधा (१९४७), नीहार (१९५४), स्वप्नजा (१९६२) व आकाशवेडी(१९६८) […]

संगीत समीक्षक आणि लेखक दत्ता मारुलकर

आता ती मैफलही सुनीसुनी! बऱ्याच वर्षांपूर्वीची संध्याकाळ. शास्त्रीय संगीताच्या एका मैफलीत एक उंच, सावळे व्यक्तिमत्व दाखल झाले. चालणे, डौल ‘नमवी पहा भूमी हा चालताना’ असे. कुतूहल चाळवले ते मैफलीत दाद देण्याची रीत पाहून. लहान-सहान जागांनाही जाणकारीने पण हळुवारपणे तर कधी ‘क्या बात है.’ अशी मोकळी दाद. मैफल संपल्यावर जेवणाआधीच्या ‘मैफली’त ओळख झाली- मी दत्ता मारुलकर! त्यांचे […]

बाळाजी जनार्दन भानू ऊर्फ नाना फडणवीस

पेशव्यांच्या दरबारी असणारे मराठा साम्राज्यातील मुत्सद्दी होते. पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी हे अर्धे शहाणे समजले जात. त्यांचा जन्म १२ फेब्रुवारी १७४२ रोजी सातारा येथे झाला. नाना फडणवीस यांचे मूळ घराणे कोकणातल्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील होते. बालवयातच नानासाहेब पेशव्यांच्या सान्निध्यात आल्यामुळे राज्यकारभाराचे शिक्षण त्यांना मिळाले. वयाच्या २० व्या वर्षी थोरल्या माधवरावांकडून त्यांना फडणिशीची वस्त्रे मिळाली. एवढे मोठे […]

महाराष्ट्राचे राज्यपाल, चेन्नमनेनी विद्यासागर राव

विदयार्थी दशेपासूनच अखिल भारतीय विदयार्थी परिषदेचे सक्रिय सदस्य असलेले विद्यासागर राव उस्मानिया विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. त्यांचा जन्म १२ फेब्रुवारी १९४२ रोजी झाला. विद्यासागर राव यांनी १९७३ साली करीमनगर जिल्हयात वकिलीची सुरूवात केली. सार्वजनिक जीवनातील जनसेवेचा व्यापक आणि बहुविध अनुभव असलेले विद्यासागर राव तेलंगणा राज्यातील एक वरिष्ठ भाजप नेते राहिले आहेत. श्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या […]

गुणी मेहनती – धनश्री काडगावकर

आजचं नवं नाव… धनश्री काडगावकर. केवळ अभिनयातच नव्हे तर फोटोशूटही तितक्याच मेहनतीने आणि प्रामाणिकपणे करण्यात तिची कामाशी समर्पित वृत्ती दिसून येते.. बघताच क्षणी फ्रेश लूक वाटावा, कोणतेही भाव लीलया व्यक्त करणारा बोलका चेहरा असावा आणि जिच्या चेहऱयावर कोणताही प्रयोग केला तर तो हमखास यशस्वी ठरेल इतका फोटोजेनिक असावा अशा चेहऱयाची मॉडेल फोटोग्राफरसाठी पर्वणीच ठरते. धनश्री काडगावकर […]

1 198 199 200 201 202 391
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..