के.आर. नारायणन हे राष्ट्रपतीपदावर विराजमान होणारे जन्माने दलित असणारे पहीले भारतीय नागरीक असले तरीही ते समस्त भारतीयांचे नेते अशीच त्यांची प्रतिमा होती, त्यातच त्यांचे मोठेपण होते. राष्ट्रपती पदावर असताना त्यांनी आतापर्यंत केवळ समारंभाचे मानद पद म्हणजे राष्ट्रपती ही ओळख पुसून टाकण्याचा यशस्वी प्रयत्न केला. […]
स्थापना : ४ फेब्रुवारी १७६८ भारतात अडीचशे वर्ष पूर्ण झालेल्या अगदी मोजक्या रेजिमेंट आहेत. त्यातली ‘मराठा लाइट इन्फंट्री’ ही एक अत्यंत मानाची रेजिमेंट आहे. मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंट (एम.एल.आय.आर.) ही भारतीय सेनेतील सैन्यदल असून सर्वात जुन्या सैन्यदलांपैकी एक आहे. सुरुवातीला याची ओळख ब्रिटिश लष्करातील जंगी पलटण म्हणून होती. १८०२ च्या सुमारास याला रेजमेंटचा दर्जा देण्यात आला. […]
ग्लॅमर आणि फॅशनची उत्तम समज फार थोडय़ा कलाकारांना असते. नेहा पेंडसेचे नाव यामध्ये सर्वात वर घ्यावे लागेल. मराठी इंडस्ट्रीत ग्लॅमर कॅरी करता येईल अशा मोजक्या अभिनेत्री आहेत. कॉस्च्यूमचा योग्य सेन्स असणं आणि ते तितक्याच सहजपणे कॅरी करणं हे इंडस्ट्रीतल्या फार मोजक्या कलाकारांना जमलं आहे. या कलाकारांच्या यादीतलं नेहा पेंडसे हे वरच्या यादीतलं नाव. ग्लॅमरस नेहा पेंडसेचं […]
मराठी साहित्यातील अनेक साहित्यकृतींना आपल्या चित्रांनी अधिक देखणेपण देणाऱ्या वसंत सरवटे यांचा जन्म ३ फेब्रुवारी १९२७ रोजी झाला. वसंत सरवटे यांचा जन्म कोल्हापूरचा. त्यांचे शालेय आणि सुरुवातीचे महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूरलाच झाले. त्यांना शाळेमध्ये असल्यापासून चित्र काढण्याची आवड होती. हस्तलिखितांमध्ये कविता, कथांसाठी चित्रे काढायला त्यांनी सुरुवात केली आणि त्यातूनच पुढे त्यांची कारकीर्द घडली. पु.ल. देशपांडे, जयवंत दळवी, रमेश मंत्री […]
गाईड, प्यासा, चौदहवीं का चाँद, कागज के फूल, साहिब बीबी और गुलाम, तीसरी कसम यांसारख्या सर्वोत्कृष्ट सिनेमांसाठी वहिदा रेहमान यांना ओळखले जाते. त्यांचा जन्म ३ फेब्रुवारी १९३६ रोजी तामिळनाडूतील चेंगलपेट येथे झाला. वहिदा रेहमान यांना डॉक्टर बनण्याची इच्छा होती. मात्र नशीबाने त्या बॉलिवूडमध्ये आल्या. वहीदा रहमान यांनी आपल्या बहिणीसोबत भरतनाट्यमचे धडे गुरु त्रीचुंबर मिनाक्षी सुंदरम पिल्लई […]
द्रमुकचे संस्थापक, तमिळनाडूचे राजकारणी व मुख्यमंत्री सी.एन. अण्णादुराई तथा कोंजीवरम नटराजन अण्णादुराई यांचा जन्म १५ सप्टेंबर १९०९ रोजी झाला. तमिळ भाषेतील एक निष्णात लेखक असलेले अण्णादुराई आपल्या भाषणशैलीसाठी देखील प्रसिद्ध होते. पेशाने प्रथम शाळा शिक्षक व नंतर पत्रकार असलेल्या अण्णादुराईंचा पेरियार ह्या द्रविडी चळवळकर्त्या नेत्यास पूर्ण पाठिंबा होता. अण्णादुराईंनी १९३७ साली पेरियारच्या द्रविडर कळघम ह्या पक्षामध्ये प्रवेश केला. […]
कूली यांच्याकडे १०० हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया सर्वप्रथम करण्याचा मान जातो. कूली निष्णात शल्यविशारद होतेच. वयाच्या पन्नाशीतच त्यांनी ५००० पेक्षा जास्त हृदयशस्त्रक्रिया व १७ हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्या होत्या. त्यांनी विपुल लिखाणही केले. त्यांची १२ पुस्तके व १४०० पेक्षा जास्त शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. […]
दिप्ती नवल यांच्या वडिलांना न्यूयॉर्कमध्ये नोकरी मिळाल्यावर त्या आपल्या कुटुंबासोबत अमेरिकेला गेल्या. त्यांचा जन्म ३ फेब्रुवारी १९५७ रोजी अमृतसर येथे झाला. न्यूयॉर्कच्या सिटी युनिव्हर्सिटीतून दिप्ती नवल यांनी शिक्षण घेतले. खरे तर अभिनेत्री होणे हे दीप्ति नवल यांचे लहानपणापासूनचे स्वप्न होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दीप्ति यांनी आपल्या आई-वडिलांकडे ही इच्छा बोलून दाखवली. पण दीप्ति नवल यांच्या वडिलाची […]
वयाच्या १२ व्या वर्षापासून अल्ला रक्खा खान यांच तबल्याशी नात दृढ झाल होते. त्यांचा जन्म २९ एप्रिल १९१९ रोजी फगवाल जम्मू येथे झाला. उस्ताद अल्ला रक्खा खान यांनी आपली कारकीर्द १९४० साली मुंबई आकाशवाणी चे स्टाफ़ आर्टिस्ट म्हणून केली. तेव्हा लोकांना तबला हे फक्त संगीतातील वाद्य आहे अशी धारणा होती. ही धारणा अल्ला रक्खा खान यांनी […]
रघुराम राजन यांचा जन्म भोपाळ, मध्यप्रदेश येथे तमिळ कुटुंबात झाला. त्यांचा जन्म ३ फेब्रुवारी १९६३ रोजी झाला. त्यांचे वडील भारतीय गुप्तवार्ता केंद्रात वरिष्ठ अधिकारी होते. राजन यांनी ७वी ते १२वी पर्यंतचे शिक्षण दिल्ली पब्लिक स्कूल मध्ये घेतले. त्यांनी १९८५ साली आय.आय.टी मधून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीची पदवी संपादन केली. १९८७ साली राजन यांनी आयआयएम अहमदाबाद इथून उद्योग व्यवस्थापनातील पदव्युत्तर […]