जिद्दीच्या बळावर हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:च्या कर्तृत्वाचा खोल ठसा उमटवलेल्या दिग्दर्शक आणि निर्माते ताहिर हुसेन यांचे घराणे मुळचे अफगाणिस्तानातले, पश्तुन वंशाचे. मौलाना अबुल कलाम आझाद यांच्याशी हुसेन यांच्या घराण्याचे संबंध होते. महाविद्यालयात शिक्षण घेतानाच, त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश करायचा निर्णय घेतला होता. प्रारंभी मुंबईतल्या स्टुडिओत संवाद लेखक, सहदिग्दर्शक आणि अन्य कामे करीत करीत हुसेन यांनी चित्रपट निर्मितीचे […]
विजय अरोरा हे पुण्यातील फिल्म इन्स्टीट्यूट चे १९७१ सालचे अभिनयाचे गोल्ड मेडलीस्ट. त्यांचा जन्म २७ डिसेंबर १९४४ रोजी गांधीधाम येथे झाला. बी.आर.इशारा यांनी आपल्या ‘जरूरत’ या चित्रपटा द्वारे विजय अरोरा यांना पहिला ब्रेक दिला. त्याच वर्षी आशा पारेख यांच्या बरोबर ‘राखी और हथकड़ी’ मध्ये काम केले, पण विजय अरोरा यांना लोकप्रियता १९७३ साली आलेल्या ‘यादों की […]
संपदा जोगळेकर–कुलकर्णी अभिनेत्री, लेखिका, दिग्दर्शिका … तिची प्रतिभा छायाचित्रांतूनही जाणवते… अभिनय, निवेदक, सूत्रसंचालिका, आयोजक, साहित्यिक, कथ्थक नृत्यांगणा, गायिका, दिग्दर्शिका, कार्यक्रमांसाठीच संशोधनपर लिखाण करणारी लेखिका अशा नानाविध रूपांतून सहज वावरणारी आणि प्रत्येक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारी हरहुन्नरी कलावती म्हणजे संपदा जोगळेकर-कुलकुर्णी. ‘ऑल दि बेस्ट’ या नाटकाच्या पहिल्या संचात अंकुश चौधरी, संजय नार्केकर आणि भरत जाधक या […]
म.द. हातकणंगलेकर यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथे झाला. त्यांचा जन्म १ फेब्रुवारी १९२७ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण हातकणंगलेत झाले. वडिलांच्या अकाली निधनामुळे ते मामाकडे सांगलीत आले आणि सांगलीकर होऊन गेले. १९४४ मध्ये ते मॅट्रिक झाले आणि १९४६ साली त्यांनी विलिंग्डन कॉलेजात असताना इंटर आर्ट्सच्या परीक्षेत तर्कशास्त्र या विषयासाठी ठेवलेले प्रसिद्ध असे सेल्बी पारितोषिक मिळविले. नंतर, १९४८ […]
‘हिरो’ सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात करणा-या जॅकी श्रॉफ यांचा जन्म गुजराती कुटुंबात झाला होता. त्यांचा जन्म १ फेब्रुवारी १९६० रोजी झाला. जॅकी श्रॉफ यांचे पूर्ण नाव जय किशन श्रॉफ. सिनेमांत झळकण्यापूर्वी जॅकी यांनी काही जाहिरातीत काम केले होते. सुभाष घई यांनी जॅकी श्रॉफ यांना ‘हिरो ‘ या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये लाँच केले. या सिनेमात त्यांचे नाव जॅकी […]
‘श्रावणात घननिळा बरसला’ या गाण्यातील गोडवा अथवा ‘दिल चीज क्या है आप मेरी जान लिजीये’ या गाण्यातील ठसका योग्य वाद्यमेळाच्या आधारे खुलवून ती अधिक कर्णप्रिय करण्याचे कसब लाभलेले अनिल मोहिले यांना लहानपणापासून संगीताची आवड होती. त्यांना त्यांच्या वडिलांचे मार्गदर्शन आणि तरंगवाद्याचं बाळकडू मिळाले. वयाच्या १५ व्या वर्षी त्यांना अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची संगीत विशारद ही पदवी […]
‘शोले’ चित्रपटातल्या ‘इतना सन्नाटा क्यों है भाई ?’ हा संवाद अजरामर करणारे आणि अनेक चित्रपटांमध्ये वयस्कर वडील आणि आजोबांच्या व्यक्तिरेखांमुळे सर्वसामान्यांच्या परिचयाचे असलेले चरित्र अभिनेते अवतार किशन उर्फ ए.के. हनगल म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय व्यक्तिमत्त्व होते. त्यांचा जन्म १ फेब्रुवारी १९१७ रोजी झाला. जुन्या चित्रपटांमध्ये नायक किंवा नायिकेचे वडील म्हणजे ए.के. हनगल अशीच प्रतिमा चित्रपट रसिकांच्या […]
सिद्धेश्वरशास्त्री विष्णू चित्राव यांची ओळख महाराष्ट्रातील व्यासंगी-प्राच्यविद्यापंडित व मराठी कोशसाहित्यकार, महामहोपाध्याय अशी होती.डॉ. श्री. व्यं. केतकर यांच्या ‘महाराष्ट्रीय ज्ञानकोश मंडळा’त सहसंपादक म्हणून त्यांची १९२१ मध्ये नियुक्ती झाली. त्यांचा जन्म १ फेब्रुवारी १८९४ पुणे येथे झाला. महाराष्ट्रीय ज्ञानकोशातील वेदविद्या खंडाच्या संपादनकार्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. महाराष्ट्रात ऋग्वेदविषयक अध्ययनाचा पाया घालून त्यांनी संपूर्ण ऋक्संहितेचे मराठी भाषांतर प्रथम प्रकाशित केले […]
बहुरंगी आणि बहुढंगी अशा मिष्कील व्यक्तिमत्त्वाच्या मोतीराम गजानन रांगणेकर उर्फ मो.ग.रांगणेकर यांची १९२४ साली संपादक या नात्याने कारकीर्द सुरू झाली. त्यांचा जन्म १० एप्रिल १९०७ रोजी झाला. वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी एक कवडी नसतानाही स्वत:चे साप्ताहिक काढले. ‘तुतारी’, ‘वसुंधरा’, ‘चित्रा’, ‘आशा’ ही त्यांची गाजलेली साप्ताहिके, त्याचप्रमाणे ‘अरुण’, ‘सत्यकथा’, ‘नाट्यभूमी’ ही त्यांची गाजलेली मासिके होत. संपादक या नात्याने नाना […]